पत्नीला औषध विषारी पाजून ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- घरवाली  बाहरवालीच्या नादातून आजवर अनेक खळबळजनक प्रकार घडले आहे. एकीसाठी दुसरीचा काटा काढण्याचा धक्कादायक प्रकार याआधीही तुम्ही ऐकले असतील, असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. प्रेम करण्यात अडसर ठरते म्हणून पत्नीला विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपावरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

तिसरीही मुलगी झाली, सासरच्यांनी सुनेला घराबाहेर काढले

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- आजही वंशाचा दिवा म्हणूंन समाजात मुलांना प्रथम स्थान दिले जाते. यामुळे आजही स्त्री जन्माचे स्वागत होण्याऐवजी त्यांची भ्रूण हत्या केल्याचे प्रकार घडत आहे. मुलगी झाली म्हणून सासरच्यांनी सुनेला थेट घराबाहेर काढल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. तिसऱ्यांदा मुलगी झाल्याने तिला थेट घराबाहेर हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार भिंगारच्या सैनिक नगर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून देशभर कृषी कायद्यावरून आंदोलने पेटली आहे. शेतकरी संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यातच या मुद्यावरून नगर जिल्ह्यामध्ये देखील निदर्शने करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी दिल्ली येथे मोठे आंदोलन उभा केले आहे. हळूहळू या पुकारलेल्या आंदोलनाची धग आता … Read more

बिहारच्या चोरट्यांना नगरमध्ये अटक

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच रस्तालुटीच्या घटनांमध्ये देखील काही दिवसांपासून वाढ होत आहे. अशाच काही वाहनचालकांना लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावर वाहनांचा पाठलाग करत वाहनचालकांची लुटमार करणाऱ्या बिहार येथील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलिसांनी मोहम्मद रियाज मनेसुरी, मोहम्मद … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार २४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६३ ने … Read more

तोकडे कपडे घालून साई मंदिरात येऊ नये; मंदिर प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभर धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली केली. यातच जगभर ख्याती असलेलं शिर्डीचे साईमंदिर देखील खुले केले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून येथे दर्शन सुरु करण्यात आले आहे. यातच कपडे परिधानावरून मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन … Read more

या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय चांगला भाव

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 नगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याच्या आवक मध्ये २ हजार गोण्याची घट झाली. गावराण कांद्याला भाव जास्तीत जास्त ४ हजार रुपये पर्यंत होता तर लाल कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव निघाले. काल गावरान कांद्याची ३७ हजार १९७ गोण्या आवक झाली. एक नंबर दर्जा असलेल्या … Read more

उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- सध्या नगर जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे. चोऱ्यांचे सत्र सुरु असताना आता खून दरोडे आदी घटनांमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथे अस्तगाव नांदूर रोडलगत ऊसाच्या शेतात अज्ञात पुरुष जातीचा बेवरस … Read more

रस्त्याची दुर्दशा पाहून मंत्र्यांचा रागाचा पारा चढला… पहा पुढे काय झाले

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. यातच मंत्री महोदय रस्त्याची दुर्दशा पाहून चांगलेच संतापले व त्यांचा रागाचा पारा चांगलाच चढला. हि गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर रागावलेल्या मंत्र्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्याला फोनवरच झापले. हे मंत्रीही दुसरे कोणी नसून मंत्री प्राजक्त तनपुरे हे होते. … Read more

त्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नेमणूक

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलिस … Read more

ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली, मात्र जनतेची इच्छापूर्ती झाली नाही !

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसान भरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून कोरोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज … Read more

लॉज वरील रूम मध्ये ‘ते’ कृत्य करताना त्यांना पकडले रंगेहात !

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरातील पर्वत लॉजमध्ये लॉज वरील रूम मध्ये चोरी करणाऱ्या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले अंकुश शिवहरी काळे व बापू शिवहरी काळे दोघे राहणार मल्हार चौक नगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मार्केट यार्ड परिसरात पर्वत लॉज मध्ये ही घटना घडली. आकाश नवनाथ कवडे … Read more

शेतकरी आंदोलनाला हजारे यांचा पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-यापूर्वी महाराष्ट्र सरकार चालले तर चांगले नाहीतर खटारा गाडी असे वक्तव्य अण्णा हजारे यांनी नुकतेच केले होते मात्र केंद्र सरकारबाबत अण्णा हजारे गप्प का आहेत असा सवाल विरोधक करत होते मात्र अण्णा हजारे यांनी चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारलाही फटकारले आहे. दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ … Read more

मोठी बातमी : आमदार निलेश लंके यांनी घेतला ‘हा’ निर्णय म्हणाले यापुढे ….

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- गरीब विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून होणारे सत्कार स्वीकारण्यास माझे मन धजावत नाही. त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये, सत्कार करायचाच असेल तर अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असं आवाहन पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी केलं आहे. लोकप्रतिनिधी … Read more

महिलांना काँग्रेस पक्षात काम करण्याची मोठी संधी – शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक महिला आहेत. त्या सतत विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात काम करत असतात. जुन्या – नव्यांचा मेळ घालत अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसमध्ये काम करण्याची मोठी संधी महिलांना काँग्रेस पक्षात असल्याचे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. नुकतीच शहरातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख महिला … Read more

नगर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘कोरोना लसीत’ योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-अहमदनगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी डॉ.उमेश शालीग्राम हे सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्युटमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. कोरोना लस बनवत असलेल्या सिरम इन्स्टिट्युटला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन पाहणी करुन कोरोनावरील लसीची माहिती घेतली. यावेळी सिरम इन्स्टिट्युटचे प्रमुख संचालक आदर पुनावाला व डॉ.उमेश शालीग्राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

शहर झपाट्याने वाढत असताना विकासात्मक व्हिजनने कार्य सुरु -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-शहर झपाट्याने वाढत असताना विकासात्मक व्हिजनने कार्य सुरु आहे. उपनगरांच्या विकासासाठी निधी खर्च केला जात असून, बोल्हेगाव उपनगर अत्यंत झपाट्याने विकसीत झाला आहे. प्रभाग 7 मध्ये नगरसेवक कुमार वाकळे यांच्या पाठपुराव्याने अनेक विकासकामे मार्गी लागून एक मॉडेल प्रभाग म्हणून पुढे आला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. बोल्हेगाव … Read more

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानप्रकरणी 2 डिसेंबरला सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-कीर्तनातून पीसीपीएनडीफ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. तेथे देण्यात आलेल्या प्रोसेस इश्‍यूच्या आदेशाला इंदुरीकरांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयाने या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असून त्यावर पुढील सुनावणी सुरू आहे. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या … Read more