महाविकास सरकारने ‘ह्या’ मतदारसंघासाठी ३८.४४ कोटची भरपाई केली मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-अतिवृष्टीने खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून महाविकास सरकारने मतदारसंघासाठी ३८.४४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही तालुक्यात नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती माजी आमदार चंद्रशेखर घुले व केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॕॅड. प्रताप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-माहिती अधिकार कार्यकर्ते बबनराव कवाद यांच्या निघोज येथील घरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून सीसीटीव्ही कॅमरे, दारे, खिडक्या तोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्यामुळे कवाद यांचा मुलगा तसेच मुलगी जागे होऊन त्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तीन ते चार व्यक्ती … Read more

दिवाळी पाडवा स्नेहभेट रद्द – माजी आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-दिवाळी पाडवा हा आनंद द्विगुणित करणारा सण आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडीत परंपरा असलेला दिवाळी पाडवा स्नेह भेट व फराळ कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जात होता. मात्र या वर्षी कोरोनामुळे दरवर्षीचा फराळ व स्नेहभेट कार्यक्रम रदद करण्यात आला आहे, असे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more

खुशखबर! अखेर शिर्डीतील साईबाबांचा दरबार खुलणार

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यातच जगभर प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर देखील बंदच होते. मात्र आता साई भक्तांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून साईंच्या दर्शनपासून वंचित राहिलेले भक्तांना आता साईबाबाचे दर्शन घेता … Read more

चार कोटींची रोकड पळवणारी व्हॅन सापडली मात्र रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- मुंबईमधील विरारमध्ये गुरुवार रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारे वाहनच चक्क ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. दरम्यान या वाहनात तब्बल सव्वा चार करोड रुपये असून अर्नाळा पोलिसांनी नोकराने चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अखेर ही व्हॅन भिवंडी … Read more

खाकी ऑन ड्युटी! जनतेची सुरक्षा आणि कर्तव्य हीच आमची दिवाळी

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- आमच्यासाठी पोलिस व्हॅनवरील लुकलुकणारा दिवा म्हणजे आकाश कंदील… पोलिस व्हॅनचा सायरनचा आवाज म्हणजे फटाक्यांचा आवाज… संकटात सापडलेला आणि आम्ही वाचवलेला अत्यवस्थ हीच आमची दिवाळी… अशा पद्धतीने जनतेच्या सेवेची शपथ घेणाऱ्या खाकीची दिवाळी साजरी होत आहे. देशभर शासकीय, निम शासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरिकांची दिवाळी … Read more

इतिहासात प्रथमतः शनिशिंगपुरात घडली अशी घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाच्या वर्षी सर्वच सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातच देशभर प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर मध्ये प्रथमतःच अशी घटना घडली आहे. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून शनिशिंगणापुर येथील … Read more

आज २६७ रुग्णांना डिस्चार्ज तर १८५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार १०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८५ ने … Read more

डॉ.विखे पाटील, मॅककेअर व गरूड हॉस्पीटलमधील कॅन्सरयोध्दांस दिवाळी भेट

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कॅन्सर झाला की ती व्यक्ती व त्यांचे नातेवाईक खचतात कारण पहिला होणारा खर्च तसेच बर होणारा का? यामुळे आरंभ ही संस्था याकरीताच काम करत आहे. तुम्ही हसत रहा,खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, गोळया घ्या, पथ पाळा, बरे व्हा कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास संपर्क साधा वेदनेशी लढणाऱ्या चेहऱ्यांना … Read more

सामाजिक उपक्रमांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते -डॉ.रफिक सय्यद

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-देशाच्या स्वतंत्र्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या जीवनाचा बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र मिळवून दिले व स्वतंत्र्यानंतर जसाजसा काळ पुढे जात आहे व येणारी नवीन पिढला स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या विषयी गांभिर्य राहिलेले नाही हे दिसून येते. अशावेळी स्वतंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहाचे आयोजन करुन वेगवेगळे उपक्रम … Read more

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-आपल्या रोखठोक भाषणांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच चर्चेत राहतात. यातच राज ठाकरे यांनी सफाई कामगारांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. टेनिस खेळण्यासाठी शिवाजी पार्कवर आलेल्या राज ठाकरेंसोबत अनेकांनी फोटो काढले. मात्र यावेळी सफाई कामगारांसोबतच्या त्यांची फोटोची चर्चा सर्वाधिक आहे. गेल्या … Read more

ब्रेकिंग न्यूज! या दिवसापासून राज्यातील मंदिरे उघडणार

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळी पाडवा म्हणजे सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. अनेक राजकीय पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी … Read more

सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच ठेवली; फडणवीसांचा आरोप

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था आहे, पण मदत द्यायला सरकार तयार नाही. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले … Read more

पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली. आजचा भारत याच भक्कम पायाभरणी वरती उभा आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात … Read more

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा … Read more

पगाराअभावी येथील शिक्षकांची दिवाळी झाली बेरंग

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा कॉलेज अद्यापही बंदच ठेवण्यात आल्या आहेत. यातच जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील शिक्षकांची यंदाची दिवाळी पगाराविना बेरंग झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या, वेळेवर वेतन करण्याबाबतच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन सातत्याने विलंबाने होत आहे. ऐन दिवाळीत शिक्षक वेतनापासून वंचित राहिल्याचे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण … Read more

शेतकरी म्हणतात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-शहर असो वा गाव सर्वत्र अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनधिकृतपणे जागेवर कबजा करीत हे अतिक्रमण वाढवले जात असल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान पुणतांब्यात चक्क शेतकऱ्यांकडून केले गेलेल्या अतिक्रमणामुळे चक्क रस्ताच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणतांबा-जळगाव या अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर शेतकर्‍यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाचा झाला उलगडा… मित्रानेच चिरला होता मित्राचा गळा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- नगर – कल्याण बायपास जवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ एका वाहनचालकाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. दरम्यान नुकताच या खुनाचा उलगडा झाला … Read more