मनपा कर्मचाऱ्यांचा आज होणार पगार

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम होते. त्याची दाहकता काहीशी कमी झाली असल्याने सर्व कामकाज पूर्वरत झाली आहे. यातच या संकटमय काळात जनतेची सेवा करणारे मनपा कर्मचाऱ्यांसाठी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मनपाचे कायम कर्मचारी पगार, सानुग्रह अनुदान, सेवानिवृत्त … Read more

ऐन दिवाळीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- एकीकडे वर्षाचा सण दिवाळी दोन दिवसांवर आला आहे, तर दुसरीकडे अनेक सरकारी कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेतच आहे. पगाराअभावी कर्मचाऱ्यांची दिवाळी बेरंगी होणार असल्याने कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. यातच आता अकोले तालुक्यातील वीज कंपनीतील वीज कामगार ऐन दिवाळीत संपावर जाणार आहे. सानुग्रह अनुदान, बोनस,व पगारवाढीचा दुसरा हप्ता दिवाळी … Read more

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-भारतात क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यातच आयपीएल म्हणजे एखादा सण असल्यासारखाच वाटतो. मात्र मनोरंजनासाठी असलेल्या या खेळाचा वापर काही जणांकडून अवैध मार्गाने आर्थिक चलन मिळवण्यासाठी केला जातो आहे. यातच आयपीएल मध्ये सट्टा लावणाऱ्या दोघांना नेवासा मध्ये पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, एक कार … Read more

सभासद व कामगारांना बोनस व पगाराची रक्कम मिळून १४ कोटींचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी पगारासोबतच बोनस होणार कि नाही याबाबत अनेक ठिकाणी साशंक होते. मात्र जिल्ह्यातील सोनई मधील मुळा सहकारी कारखान्याच्या कामगारांची दिवाळी आनंदाने द्विगुणित होणार आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याने सभासदांची परतीची ठेव, ठेवीवरील व्याज आणि कारखान्याच्या कामगारांना बोनस … Read more

गरजू लाभार्थ्यांना मिळणार हक्काचा निवारा; १ हजार ३३३ घरकुले मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती-जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील चार वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. तसेच अनेक कामे सुरू आहेत, तर काही कामे पूर्णत्वाकडे जात असून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचला. त्याप्रमाणेच गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी खुल्या वर्गासाठी ११०७, अनुसूचित … Read more

‘त्या’ शेतकऱ्याना नुकसानीपोटी २.२० कोटी

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-खरीप हंगामातील हवामान अधारित पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख ८३ हजार ९३४ रूपयांचा पिक विमा मंजुर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली. शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्यानंतर त्यांनी उतरविलेल्या पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी आमदार नीलेश लंके यांनी कृषी मंत्री दादा … Read more

1 महिन्‍यात एमआरआय मशिन बसविण्‍याची कार्यवाही करावी.-मा.सभापती श्री.मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- मनपा स्‍थायी समितीच्‍या सभेमध्‍ये कल्‍याण रोड वरील वसाहतीमधील पाणी प्रश्‍ना संदर्भात वादळी चर्चा झाली असून नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे यांनी मनपा प्रशासनाला सांगितले की, शहरात दिवसाआड पाणी येते मग कल्‍याण रोडला 10 ते 12 दिवसांनी पाणी का दिले जाते. येत्‍या 10 दिवसात पाणी प्रश्‍न न सुटल्‍यास आयुक्‍त यांचे दालनात … Read more

इंग्रजांविरोधात बंड करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील या आजींचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- ब्रिटीश काळात भंडारदरा येथे जलाशयाचे काम सुरू असताना इंग्रज अधिकाऱ्यांकडून मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड करणाऱ्या पार्वताबाई महादू नवले (वय १०५) यांचे निधन झाले. अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहिरे गावात राहणाऱ्या या आदिवासी महिलेने ब्रिटीश काळात भंडारदरा धरणाच्या उभारणीच्या कामावर जाऊन मजुरी केली. त्यावेळी इंग्रज राजवटीला व … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणतायत अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहे

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अनेक नेत्यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून, अनेकजण संपर्कात आहेत. यामुळे राज्यात काँग्रेसची ताकद वाढण्यास त्यामुळे मदत होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले कि, काँग्रेस विचारांना मानणारा मोठा वर्ग राज्यात असून, हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण … Read more

गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शहरातील कापड बाजार येथे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने भुरट्या चोरीपासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी बाजारात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच एका राजकीय पक्षाने केली होती. यातच श्रीरामपूर येथील दोन महिला चोरांना नगरमध्ये अटक करण्यात आली आहे. या दोन महिलांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. मोराणा … Read more

तु पोलीस असला म्हणून काय झाले… हुल्लडबाजांकडून पोलिसास धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-नागरिकांच्या संरक्षणासाठी खाकीशी नाते जोडणारे पोलीस प्रशासन नागरिकांसाठी अहोरात्र सेवा बजावत असतात. कोरोनाच्या काळात देखील रात्रंदिवस आपले कर्तव्य त्यांनी बजावले. कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या या खाकीला आज शहरात धक्काबुक्की झाल्याची निंदनीय घटना घडली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणार्‍या पाच जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; १० जणांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचे संकट काहीसे कमी होताना दिसत असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात अवैध धंद्यांचा मात्र सुळसुळाट झालेला दिसून येत आहे. दरदिवशी पोलिसांकडून जिल्ह्यात धाड सत्र सुरूच आहे. यातच श्रीरामपूर शहर पोलिसांनी नुकतीच एका ठिकाणी छापा टाकून काही जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहर पोलिसांनी येथील … Read more

सावधान! महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोना पुन्हा होतोय सक्रिय

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. दरम्यान यातच महसूल मंत्र्यांच्या तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार अद्यापही कायम आहे. सुरुवातीच्या काळात सुसाट असलेला कोरोनाचा … Read more

अकरा दुचाकींसह तिघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. दरदिवशी चोरी, लुटमारी, दरोडा आदी घटनांमुळे नगरकर चांगलेच धास्तावले आहे. दरम्यान चोरट्यांविरोधात पोलीस प्रशासन चन्गलेच आक्रमक झाले आहे. नुकतीच संगमनेर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत सराईत वाहन चोरटे वाहन व्रिकीकरिता संगमनेरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या पोलिस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या !

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले. बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिकार्‍यांमध्ये कंसात त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण दिले आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे (शिर्डी), राकेश मानगांवकर (कोतवाली), अभय परमार (नियंत्रण कक्ष), मुकुंद देशमुख (संगमनेर शहर), हनुमंत गाडे … Read more

वर्षभरात त्यांचा एक रूपयाचा तरी निधी पारनेर शहराला मिळाला का ?

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- पंधारा वर्षांपूर्वीचे पारनेर व सध्याच्या पारनेरमध्ये झालेला बदल शहरातील जनतेच्या डोळयापुढे आहे. त्यामुळे शहरासाठी काय केले असे सांगून १७/० करण्याच्या वल्गना करणारांना धडा शिकविण्यासाठी शहराचा स्वाभीमान जागृत ठेउन एकदिलाने निवडणूका लढा, मी तुमच्यासोबत आहे, आपण सर्व जागा जिंकू असा विश्‍वास विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केला. … Read more

आज १९७ रुग्णांना डिस्चार्ज तर २५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ३५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५३ ने … Read more

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले !

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. … Read more