ओला दुष्काळ जाहीर करा; अन्यथा आंदोलन…

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरी सरसकट ५० हजार शासनाने जमा करावेत; अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी दिला. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर रासपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बाचकर म्हणाले, अतिवृष्टीमुळे पिके भुईसपाट झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आंदोलनात … Read more

माजी मंत्री शिंदे यांच्या दबावामुळेच भाजपला रामराम

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- माजी मंत्री राम शिंदे यांच्या एकतर्फी राजकारणाच्या दबावामुळे दमकोंडी झाल्याने मी राष्ट्रवादीत प्रवेश केला.जामखेड पंचायत समितीच्या पदाचा सभापती पदाचा मान मला मिळाला आहे. आता तालुक्यातील सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडावेत. अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पंचायत समितीचे सभापती राजश्रीताई मोरे यांचे पती सूर्यकांत … Read more

सोयाबीनला चार हजार रुपये भाव

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजार आवारात शासकीय हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला. वांबोरी मोंढ्यावर ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबिनची विक्री झाली. शासनाकडून सोयाबिनला प्रतिक्विंटल ३ हजार ८८० रुपये दर दिला जात आहे. वांबोरी येथील उपबाजार आवारात मागील आठवड्यात ४५० क्विंटल सोयाबिनला सुमारे ३३०० ते ३८०० … Read more

पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वस्व पणाला – आमदार नीलेश लंके

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची ग्वाही देतानाच शहराचा वर्षानुवर्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आपणच सोडवणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. पारनेर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते पार पडले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्षे उलटली … Read more

वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध घेतला, परंतु…

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कुकडी नदीच्या पुरात हात-पाय धुण्यासाठी गेलेला इसाक रहेमान तांबोळी (वय ३५, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा रिक्षाचालक तोल जाऊन पाण्यात पडल्याने वाहून गेला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमरास घडली. पोलिसांनी बुधवारी दिवसभर रिक्षाचालकाचा शोध घेतला, परंतु उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता. रांजणगाव गणपती येथील उषा सुरेश … Read more

अल्पवयीन मुलीला फूस लावून नेणाऱ्याला तत्काळ अटक करा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून नेणाऱ्याला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी तालुका पोलिस ठाण्यात ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करत तपास न लागल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. १७ ऑक्टोबरला मुलीला घरातून पळवून नेण्यात आले. आरोपीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या वडिलांसह काही ग्रामस्थांनी मंगळवारी … Read more

लॉकडाऊनमधील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करा : भाजप

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाऊन कालखंडात उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यामुळे घर व पाणीपट्टी भरणे जिकिरीचे झाले आहे. संगमनेर नगरपालिकेने या काळातील कर माफ करावा, अशी मागणी भाजपने मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्याकडे केली. पालिकेने घरपट्टीवर दंड व्याज आकारले आहे. मासिक २ टक्के व्याजाची आकारणी माफ करावी, घरपट्टी भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, आठ दिवसांत विशेष … Read more

ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने १४ ऊसतोड मजूर जखमी

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- इंडिकाने हुलकावणी दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटून १४ ऊसतोड मजूर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर गुंजाळवाडीत घडली. धांदरफळ येथून ऊसतोड करून ट्रॅक्टर ट्रॉली ऊस घेऊन कारखान्याकडे चालली होता. जखमींत दत्तू गिरे, कविता गिरे, सीता गिरे, संगीता गिरे, सुगंधा कतोरे, गोलम गिऱ्हे, रुपमा गिरे, छकुली … Read more

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तरुणाला अटक

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- फोन करून भेटण्यास बोलवण्याचा त्रासाला कंटाळून पावबाकी रोड येथील भारती सचिन पावबाके (२८) या तरूणीने सोमवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घारगावच्या सुनील भानुदास फाकटकर तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास उपनिरीक्षक राणा परदेशी करत आहेत. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवशी 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- बुधवारी जिल्ह्यात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८३३ वर गेली आहे. दिवसभरात नवे ३०४ पॉझिटिव्ह आढळून आले. १८ सप्टेंबरपासून रुग्ण व मृत्यूचे प्रमाण घटले होते. बुधवारी मात्र २० जणांचा बळी गेला. २४ तासांत रुग्णसंख्येत ३०४ ने वाढ झाली. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १७४० इतकी झाली … Read more

खडसेंनी त्या निर्णयाचा पश्चाताप होईल : राम शिंदे

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे हे भाजपात असताना त्यांना जी किंमत पक्षात मिळाली ती राष्ट्रवादीत मिळणारं नाही.’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) भाजपचा राजीनामा दिला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणारं असल्याची माहिती … Read more

या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कोरोना, अतिवृष्टी व आता चोरट्यांचा धुमाकूळ अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांमुळे जामखेडकर पुरते वैतागले आहेत. येथील शहरातील सदाफुले वस्ती, बोर्ले या ठिकाणी चोरी करून सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की,शहरातील मध्यवर्ती भागात आसलेल्या सदाफुले वस्ती येथील भास्कर झगडे हे झोपले असताना मंगळवार दि … Read more

दिखाव्यासाठी केली पोलिसांनी कामगिरी… मोठे सूत्रधार मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु आहे. या घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी देखील कारवायांना सुरुवात केल्या आहेत. मात्र पोलिसांच्या या कारवाया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. गुटखा कारवाई नंतर आता जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पोलिसांची एक कारवाई सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे मोठया प्रमाणात दारूचा अवैध … Read more

निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते…

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-राष्ट्रवादी काॅंग्रेसला ओहोटी लागली, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते. वेलकम एकनाथ खडसे साहेब ! असे ट्विट करून आमदार रोहित पवार यांनी एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज हे जाहिर झाल्यानंतर … Read more

खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सध्या सुरु असलेली गुटखा कारवाई चांगलीच चर्चेत आहे. यामुळे अनेक अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यातच आता खुलेआम बेसुमार गुटखा विक्री करणाऱ्या व्यपार्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. या कारवाईबाबत भीमशक्ती संघटना व दलित अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाच्यावतीने आज राहुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार व पोलीस … Read more

अननस घेऊन जाणाऱ्या ट्रकची कंटेनरला धडक… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात दरदिवशी वाहनांच्या अपघातांच्या घटना घडतच आहे. अशातच जिल्ह्यातील एका महामार्गावर ट्रक व कंटेनरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अननस घेऊन जाणाऱ्या ट्रकने कंटेनरला मागील बाजूने जोराची धडक दिल्याने वाहनासह कंटेनरमधील चार नवीन कारचे नुकसान झाले. दरम्यान या बाबत समजलेली अधिक माहिती … Read more

….बडा पछताओगे; खडसेंच्या राजीनाम्यानंतर माजी पालकमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचा राजीनामा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा देखील केली आहे. दरम्यान खडसेंच्या राजीनाम्यांनंतर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी खडसेंच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे तर … Read more

कोरोनाचा मुकाबला आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमध्ये शेतकर्‍यांना दिलासा हेच प्राधान्य नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला मनोदय

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :–जिल्ह्यातील प्रश्न लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने जिल्हा विकासासाठी कार्यरत राहू. सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली तर गेल्या अडीच वर्षाच्या काळात अहमदनगर जिल्हयात येथील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने आणि जिल्हावासियांच्या सहकार्याने चांगले काम करु शकलो, … Read more