‘ह्या’ठिकाणी पोलिसांचा छापा;अवैध दारू जप्त

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलिसांनी तीन ठिकाणी धाडी टाकत अवैध दारू जप्त केली आहे. यातील आनंद उर्फ छोट्या आहिरे हा आरोपी फरार झाला असून मंगेश नारायण पवार व बाबासाहेब चंदन भोजने या आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता शिर्डी पोलिसांनी छापा टाकत मंगेश नारायण … Read more

भूईकोट किल्ल्याच्या तटबंदीला धोका ; झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहराला अनेक ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा आहे. त्यात ऐतिहासीक भूईकोट किल्ला म्हणजे नगराचे भूषण. परंतु आता याच किल्ल्याची संरक्षक कठड्याची भिंत कोसळली असून तटबंदीलाही धोका निर्माण झाला आहे. हा ऐतिहासीक ठेवा जतन करण्याची मागणी हरियाली संस्थेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. राज्य सरकार व तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या पुढाकाराने 2011 मध्ये खंदकाच्या भिंतीवर … Read more

अर्सेनिक अल्बमची अजूनही प्रतीक्षाच; ‘त्या’विभागाकडून चालढकल

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम 30 हे औषध प्रभावी असल्याचे आयुष्य मंत्रालयाने सांगितले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी या गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाला या गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात हा निर्णय … Read more

राहुरीत कोव्हिड सेंटर; मंत्री तनपुरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोना महामारीमध्ये पहिले चार महिने जशी नागरिकांनी काळजी घेतली, त्याचप्रमाणे शासकीय निर्देशांचे पालन करून गर्दी न करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे व अनावश्यक बाहेर न … Read more

रब्बी आला तरी महाआघाडी सरकारने ‘तो’ शब्द न पाळल्याने शेतकरी संतप्त

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली. परंतु त्यानंतर दोन लाखांच्यावर पीककर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना मात्र, सरकारने वार्‍यावर सोडून दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीत गेले असून बँका दारात उभे करायला तयार नाहीत. त्यामुळे खरिपात देखील यांना नवीन कर्ज मिळालेले नाही. आता रब्बी तोंडावर आला आहे. त्यामुळे … Read more

काय सांगता ! मंत्री थोरात – पिचड- आ. लहामटे आले एकाच व्यासपीठावर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- 2019 ची विधानसभा कुणीही विसरणे अशक्य आहे. जी राजकीय परिवर्तन, उलथापालथ , पक्ष बदल आदी गोष्टी या कालखंडामध्ये घडल्या. या काळात एकाच पक्षातील सहकारी एकमेकांचे विरोधक बनले. संगमनेर-अकोले मधील माजी मंत्री पिचड, मंत्री थोरात , आ. लहामटे हे एकेकाळचे स्वपक्षीय विरोधक झाले. परंतु तब्बल वर्षभरानंतर हे लोक एकाच व्यासपीठावर … Read more

बंद शासकीय कार्यालय व शाळांचा वापर तळीरामांसाठी !

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जिल्हा परिषद शाळा ही तळीरामांचा अड्डा बनला आहे. शाळेच्या पडवीत बसून तळीरामांनी मोकळ्या बाटल्या टाकून दिल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे. दारू दुकाने सुरू झाल्याने अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. गावठी दारू व देशी, विदेशी दारूचा साठा केला जात आहे. … Read more

विहिरीत पडलेल्या त्या बिबट्याला जीवदान

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- विहिरीतील खोल पाण्यात पडलेल्या साडेतीन वर्षांच्या बिबट्याच्या मादीला बाहेर काढण्यात एक तासाच्या प्रयत्नांनंतर यश आले. उपस्थित शेतकऱ्यांनी वनविभाग कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे टाळ्या वाजवून कौतुक केले. शेळीची शिकार करून चाललेली बिबट्याची मादी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास सात्रळ येथील कैलास जगन्नाथ प्रधान यांच्या विहिरीत पडली होती. तिच्या डरकाळ्या एेकून परिसरातील शेतकऱ्यांनी … Read more

धान्याचा काळाबाजार थांबवा अन्यथा मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करू…..

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा धडाकाच सुरु आहे. प्रलंबित मागण्या, अनुत्तरित प्रश्न, समस्यां या लोकप्रतिनिधी, प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलन हाती घेतले जाते. दरम्यान सध्या शहरासह जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरु असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अन्नधान्याचा काळाबाजार थांबविण्यात यावा, अन्यथा जिल्ह्यातील मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा अहमदनगर … Read more

म्हतारपणाची काठी असलेल्या नातवाने केला आजी- आजोबांवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- आपल्या म्हतारपणाची काठी म्हणून मोठ्या लाडाने आजी आजोबा आपल्या नातवाला सांभाळत असतात. मात्र खुद्द नातूच आजी – आजोबांच्या जीवववर उठला असल्याचा प्रकार जिल्ह्यातील पारनेरमध्ये घडला आहे. वडीलांना दमदाटी करण्याचे कारण पुढे करून तसेच शेतामध्ये येउ नये यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे दोघा नातवांनी आजी आजोबांवर कोयत्याने … Read more

दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली. समजलेल्या माहितीनुसार कावेरी भाऊसाहेब गुंड (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. शेतातील विहिरीवर विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान या मृत महिलेचे कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. कर्जत … Read more

अर्थव्यवस्थेचा विचार करून तरी मंदिरे उघडा; विखेंनी साधला ठाकरेंवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- राज्यात अद्यापही कोरोनाचे संकट कायम आहे. आजच्या स्थितीला देखील रुग्ण आढळून येत असल्याने अद्यापही धार्मिक स्थळे खुली करण्यात आली नाही. याच मुद्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मंदिरे उघडण्यासाठी झालेल्या आंदोलनांतील भाविकांच्या भावानांचा नसेल तर किमान मंदिरांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेचा विचार … Read more

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची ओळख : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा बॅक ही कारखानादारापुरती मर्यादित न ठेवता केंद्र व राज्य सरकारच्या तसेच संचालक मंडळाने घेतलेले सर्व निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केल्यामुळे जिल्हा बँकेची ओळख ही शेतकऱ्यांची बॅक म्हणून झाली. पूर्वी बॅंकेला होणाऱ्या नफ्यातून कारखान्यांसाठी कर्ज वाटप करायचे. मात्र मी संचालक झाल्यापासून या गोष्टीला विरोध करीत जिराईत भागातील शेतकऱ्यांसाठी दूध … Read more

कोरोनामुळे बंद शाळेची झाली दुरावस्था…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता राज्यातील शाळा अद्यापही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र या कोरोनाच्या या संकटाच्या काळात विद्यार्थ्यांविना शाळांची दुरावस्था झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अद्यापही अनेक शाळांकडे गुरुजी, कर्मचारी हे फिरकले नाही. अशीच काहीशी अवस्था सोनई येथील जिल्हा परिषद शाळेची झालेली … Read more

गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी केली हि मागणी

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले असून, फक्त उसाचाच त्यांना आधार आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यांना उसाचा दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की कोरोनामुळे बळीराजा अडचणीत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक पिके वाया … Read more

आमदार मुलाच्या आईच्या कौतुकास्पद कामाची रंगलीय चर्चा

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-आपल्या कार्य कुशलता व जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणारे कर्जत- जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. मात्र आता आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री त्यांच्या सामाजिक कार्यामुळे कौतुकाच्या धनी बनलेल्या आहेत. आमदार पवार हे सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी आई सुनंदा … Read more

मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून… नागरिकांची झाली गैरसोय

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. व पावसाने पुन्हा एकदा आपली हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक समस्यां निर्माण झाल्या आहे. नुकताच जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने कोरेगाव, … Read more

गुंडेगाव मधील वनखात्याचा सातबारा बाहेर काढणार : माजी मंत्री शिवाजी कर्डीले

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-गुंडेगाव येथील वनखात्याचा सातबारा लवकरच बाहेर काढणार असून जो कामे करतो त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो फालतू लोकांना मी महत्व देत नसल्याची टीका माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी बाळासाहेब हराळ यांचे नाव न घेता केली. नगर तालुक्यातील रुईछत्तीसी, मठपिंपरी, हातवळण, गुणवडी, वाटेफळ, कौडगाव , खांडका , मेहकरी येथील शेतकऱ्यांना खेळते … Read more