‘ते’ अनधिकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करा !

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्यात जुलै २०१७ पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणिक अर्हता नसलेले स्वतःला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत. ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांंवर कारवाई होऊन हे अनधिकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करावे, … Read more

दरोडेखोरांची टोळी जेरबंद,पहा अहमदनगर जिल्ह्यात कुठे…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- खैरी निमगाव येथील काही सराईत गुन्हेगार कारमधून हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळाली. पोलीसांनी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास संगमनेर रोडवरील एसटी कार्यशाळेजवळ ही टोळी पकडली. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय ऊजे, संतोष बहाकर, जालिदर लोंढे, पंकज … Read more

राज्याचा महाविकास आघाडी पॅटर्न प्रथमच अहमदनगर महानगरपालिकेतही !

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या राजकारणात स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी असल्याने दोन्ही पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ही निवडणूक हाताळली. शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कोतकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन सभा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

नगर शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी, तुमच्या भागात मोकाट कुत्रे असतील तर…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- नगर शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील एजन्सीची महापालिकेने नेमणूक केली. कुत्र्यांबाबत माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे क्रमांक जाहीर करून संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. नगरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. काही लहान मुलांना कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा … Read more

दिवसभरात ‘इतक्या’ जणांचा कोरोनाने बळी घेतला

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील बळींची संख्या ६६५ झाली आहे. दिवसभरात ७९० नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर २६.९३ टक्के आहे. गेल्या तीन महिन्यांत रुग्णवाढीचा दर दहा टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्याने शुक्रवारी ४० हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात नऊ जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे … Read more

पूर्ण भारतातील शेतकऱ्यांचे दिवस बदलणार आहेत. मात्र…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-मराठा आरक्षणासाठी शरद पवार अजून आक्रमक झालेले नाहीत. आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी अन्नत्याग का केला नाही, असा सवाल माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी करत पवारांचे अन्नत्याग म्हणजे खोटं रडणं आहे, असा टोला लगावला. नगर येथे शहर भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण व अभिवादन कार्यक्रमात तावडे बोलत होते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोहण्यास गेलेल्या होमगार्डचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. संदेश राजेंद्र विटनोर (वय २४, राहुरी) असे या मृताचे नाव आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी अकोले तालुका पोलिस ठाण्यात काही होमगार्ड नियुक्त केले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था अगस्ती मंदिर परिसरात करण्यात आली आहे. … Read more

आता या कारागृहातील कैदी आढळले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. एवढेच नाहीतर तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता कर्जत तालुक्यातील कारागृहातील कैदी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कर्जत तालुक्यात न्यायालयीन कस्टडीत व पोलीस कस्टडीत असलेल्या 49 कैद्यांपैकी 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती पोलीस निरीक्षक … Read more

जनरल स्टोअर्सला लागली आग ३० लाख झाले खाक

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील जायभाय कॉम्प्लेक्समधील तुलशी जनरल स्टोअर्सला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे स्टोअर्समधील ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान श्रीगोंदा पोलीस गस्तीवर असल्याने त्यांना ही आग लगेच लक्षात आली. त्यामुळे कॉम्प्लेक्समधील इतर दुकाने वाचली आणि कोटी रुपयांचे होणार नुकसान टळले. … Read more

यापुढे शेतात गांजा पिकवायचा का? शेतकरी संतप्त

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा अक्षरश सडला आहे. उर्वरित कांद्याला चांगला भाव मिळेल, सावकाराचं कर्ज फेडता येईल आणि कुटुंबाची गाडी रुळावर येईल, अशी स्वप्नं पाहत असतानाच कांदा निर्यात … Read more

कोरोना योद्धाच आता कोरोनाच्या विळख्यात सापडले !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारीचा भार ज्यांच्या खांद्यावर आहे, असे कोरोना योद्धाच आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. राहुरीच्या कारागृहातील 37 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापाठोपाठ आठ- दहा दिवसात कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी आजारी पडू लागले. चार दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आढळले. मागील दोन दिवसात आणखी चार जण … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले ‘त्यामुळे’मनातील भीती दूर होते !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सहजयोग ध्यान केल्याने निर्भयता वाढून मनातील भीती दूर होते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने गाव तेथे सहजयोग अभियानाच्या भीती फलकाचे उदघाटन आ. संग्राम जगताप यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सहजयोग परिवाराचे जिल्हा समन्वयक सुधीर सरोदे, गणेश भुजबळ, प्रकाश येनगंदुल, चंद्रकांत रोहोकले, अभय ठेंगणे, … Read more

…आणि मनोज कोतकर मनपा स्थायी समितीचे सभापती झाले !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नगरसेवक मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मनोज कोतकर यांची सभापती बिनविरोध निवडीमुळे पुन्हा एकदा आमदार संग्राम जगताप यांचे महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व सिद्ध झाले. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या सर्व गोष्टींवर लक्ष होते. आमदार संग्राम … Read more

अहमदनगर शहरातील त्या कोविड सेंटरला विनोद तावडे यांनी भेट कर्मचार्‍यांना म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम निमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनोद तावडे नगरला आले होते. यावेळी तावडे यांनी नटराज कोविड सेंटरला भेट दिली. तेथील कर्मचार्‍यांशी चर्चा करत स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, पी. डी. कुलकर्णी, … Read more

त्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध अद्यापही सुरूच

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेरच्या मांडओहोळ धरणालगत असलेल्या रुईचोंढा डोहात वाहून गेलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी गणेश दहिफळे यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. दरम्यान गणेशचे वडील, भाऊ, मामा हे सकाळपासून डोहोलगत बसून आहे. गणेश यांचा शोध लागत नसल्याने वातावरण संवेदनशील झाले आहे. तहसिलदार ज्योती देवरे या देखील घटनास्थळी तळ ठोकून आहेत. गणेश यांच्या शोधासाठी … Read more

‘ह्या’ तालुक्यातील तब्बल 27 कैदी कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कर्जत तालुक्यात उपकारागृहात असलेल्या ४८ कैद्यापैकी २७ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची तहसीदार नानासाहेब आगळे यांनी दिली असून, तालुक्यात ११६५ लोक आत्ता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कर्जत येथे उपकारागृहामध्ये एकूण ४८ आरोपी आहेत, यामध्ये४७ पुरुष एक महिला असून, यापैकी न्यायालयीन कोठडीत ४२ आरोपी आहेत तर सहा आरोपी पोलिस कस्टडीत आहेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज आढळले इतके रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती आणि आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७९० ने वाढ … Read more

या तालुक्यात कोरोना सुसाट

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते … Read more