राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आखून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने उपाययोजना करणे अपेक्षित होते. राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला असून या निष्क्रिय सरकारला जनतेला होणाऱ्या अगणित त्रासाची कसलीच जाणीव राहिलेली नाही, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी केली. महाराष्ट्रातील शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  श्रीरामपूर शहरातील  ईश्वरी आनंद बावीस्कर या १४ वर्षांच्या विद्यार्थिनीने सोमवारी राहत्या घरात गळफास घेतला. सूतगिरणी भागात राहात होती व भि. रा. खटोड कन्या विद्यालयात शिकत होती. तिला तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले. ईश्वरी आठवीतून नववीच्या वर्गात गेली होती. तिच्या आत्महत्येचे कारण समजू … Read more

मुख्‍यमंत्री घरातून बाहेर पडत नसल्याने सरकारचा कारभारही फेसबुकवरच !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोवीड-१९ च्‍या संकटात राज्‍यातील जनतेला दिलासा देण्‍यात राज्‍य सरकार अपयशी ठरले असुन, सरकारचा कारभार फक्‍त फेसबुकवर सुरु आहे. मंत्रीच मुंबईत जावून बसल्‍याने शेतकरी आणि सामान्‍य माणसांच्‍या समस्‍या वाढण्‍यास सरकारच जबाबदार असल्‍याचा थेट आरोप करुन, केंद्र सरकारने जाहीर केलेल्‍या पॅकेजवर टिका करण्‍यापेक्षा राज्‍यातील जनतेला मदत जाहीर करा अशी मागणी माजीमंत्री … Read more

वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत जनतेला समजलेच नाही – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- गृह वि‍भागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्‍ता क्लिनचिट मिळवुन सेवेत पुन्‍हा रुजू झाल्‍यानंतरही वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत राज्‍यातील जनतेला समजलेच नाही अशी खोचक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. राज्‍यात लॉकडाऊनचा कालावधी जाहीर असतानाही वाधवान बंधुना लोणावळा ते महा‍बळेश्‍वर असा पास गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ … Read more

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढली, वाचा सविस्तर बातमी…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे तर दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे. निमोण येथील त्या व्यक्तीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेल्या रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेल्या रुग्णाचा आज मंगळवार दि.19 रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण येथील कोरोना संशयितांचा आज दि.१९ रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या त्या संशयितांचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप मिळाला नसल्यामुळे … Read more

महत्वाची बातमी : लॉकडाऊन-4’ संदर्भात नवे नियम जाहीर, वाचा काय असेल सुरु आणि बंद ?

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- ‘लॉकडाऊन-4’ संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार राज्यात रेड झोन, नाॅन रेड झोन आणि कन्टेनमेंट झोन असणार आहे. दरम्यान, नवीन नियमावली 22 मेपासून लागू होणार आहे. #WarAgainstVirus#Lockdown4 – काय सुरू राहाणार, काय नाही? What’s allowed and Not allowed in #Maharashtra pic.twitter.com/21hgLoFoIL — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पूनमचा टिकटॉकवर जलवा; जाणून घेऊया त्यांच्याविषयी

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  कधी कुणाच्या कलेला पंख फुटतील, किंवा कधी कोठे संधी मिळेल सांगता येत नाही. पण कलाकार या संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाही. असच काहीस झालंय श्रीगोंदे तालुक्यातील पूनम संजय तुपे यांच्या बाबतीत. पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या पूनम यांचा .. मी लय वेड्यावाणी करते हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ रस्त्याचे नाव ठेवले ‘कोरोना रोड’ !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- नगर तालुक्यातील मांडवा येथील गावकऱ्यांनी त्यांच्या गावातील रस्त्याचे नाव चक्क ‘कोरोना रोड’ ठेवले आहे. त्याच कारणही तसेच मजेदार आहे. या रस्त्याचे काम खूप वर्षापासून रखडलेले होते. परंतु नेमके लॉकडाऊनच्या काळातच या कामास मुहूर्त लागला आणि त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे त्यांनी या रस्त्याचे नाव ‘कोरोना’ रोड असे ठेवले … Read more

अबब !… एकाही परप्रांतीय मजुराचा प्रवास खर्च केंद्राने उचललेला नाही…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातून आपापल्या राज्यांमध्ये परतलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा एकही दमडीचा खर्च केंद्र सरकारने उचललेला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च केल्याचे माहिती देशाला दिली. देशवासियांना चुकीची माहिती देणाऱ्या सीतारामन या खोटारड्या असल्याचे, अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीचे किरण काळे यांनी म्हटले आहे. किरण काळे यांनी … Read more

पोलिस निरीक्षकाच्या प्रकरणात ‘मिटमामिटवी’ नेमके काय झाले ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पोलिस निरीक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेची काहीजणांच्या मध्यस्थीनंतर पोलीस निरीक्षकासोबत तडजोड झाली. प्रकरणात मिटवामिटवी झाल्यानंतर पोलिस निरीक्षकाने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. पोलीस निरीक्षकावर एका महिलेने शारीरिक अत्याचार करून गर्भपात केल्याचा आरोप केला होता. याबाबतची पोस्ट सदर महिलेने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर टाकली होती. ती … Read more

‘या’ कारणामुळे झाला पारनेरच्या त्या तरुणाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- मुंबईवरून पारनेर तालुक्यातील दरोडी मध्ये आलेल्या ३२ वर्षीय तरुणाचे रविवारी सायंकाळी नगर येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले होते त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचे त्याच्या मृत्युनंतर त्याची कोरोना चाचणी स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आले होते. या अहवालानंतरच तो तरुण ‘सारी’ आजाराने मृत्यु झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जलाशयात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  बेपत्ता इसमाचा मृतदेह शेवगाव तालुक्यातील दहिगावने जवळील जायकवाडी जलाशयात सोमवारी आढळला. शिरसगाव येथील रोहिदास कान्हू भगत असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  रोहिदास भगत हे १५ मे पासून घरुन बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती . सोमवारी घेवरी शिवारातील जायकवाडी जलाशयात मृतदेह तरंगताना … Read more

मुलीची गळफास घेऊन आत्महत्या 

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- श्रीरामपूर शहरात मुलीची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुतगिरणी रस्त्याजवळील मोरगे मळा वस्तीवर राहणाऱ्या जान्हवी आनंद बावीस्कर ( वय १५ ) या मुलीने राहत्या घरामध्ये छताला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही. घरातील नातेवाईकांना जान्हवीने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच तिला तातडीने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बलात्कार प्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेक वेळा बलात्कार केला व त्यातून गर्भधारणा झाल्याची फिर्याद पीडित तरुणीने सोनई पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शरद नवनाथ वाघमोडे ( पाचुंदे , ता . नेवासे ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदर्श गावाच्या सरपंचाना पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे रेशनच्या धान्य वाटपावरून दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर गावचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल जगन्नाथ गिते यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयातून पोलिसांनी अटक केली. रविवारी पाथर्डी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अस्मिता वानखेडे यांच्यासमोर हजर केले असता गीते यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फुगलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- नेवासे तालुक्यातील संत ज्ञानेश्वर मंदिरामागे चिंचबन शिवारात प्रवरा नदीत सोमवारी सकाळी नेवासे खुर्द येथील पप्पू अब्दुल पठाण (वय ३२) या तरुणाचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृताचा भाऊ आयुब अब्दुल पठाण याने पोलिसांना खबर दिली. १८ मे रोजी सकाळी अकरा वाजता भाऊ त्याच्या चार मित्रांबरोबर मजुरीच्या कामासाठी गेला होता, असे त्यात म्हटले … Read more