महिलादिनीच अहमदनगरमध्ये भयंकर घटना ! जबर मारहाण करत ७५ वर्षांच्या वृध्देवर अत्याचार,तोंडात बोळा कोंबून आरोपी फरार…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभरात मोठ्या धुमधडाक्यात जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच एका ७५ वर्षांच्या वृध्द महिलेवर अत्याचार केल्याचा अत्यंत दुर्दैवी व गंभीर प्रकार नगर तालुक्यातील आंबिलवाडी येथे घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की , काल सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . त्यातून महिलांची असलेली महती सांगितली जात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदिवासी समाजाच्या तरूणीचा मृतदेह सापडला,मृत्यूबाबत घातपाताचा संशय

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यात जागतिक महिला दिनीच गर्दणी, खानापूर येथे आदिवासी समाजाच्या तरूणीचा मृतदेह काटवनात सापडला. देवबाई पांडू गिऱ्हे (२४) असे या तरुणीचे नाव आहे. ही घटना म्हणजे आत्महत्या की खून, याबद्दल ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. लोणी येथील रूग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली. देवबाई शनिवारी सकाळी ११ वाजता शेळ्या चारण्यासाठी खानापूर शिवारात गेली होती. … Read more

कार्यकर्ते आमदारांच्या बेडवर, आमदार निलेश लंके मात्र झोपले सतरंजीवर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आमदार आणि मंत्र्यांचे कार्यकर्ते अथवा मतदारसंघातील सामान्य नागरिक मुंबईमध्ये येत असतात मात्र या लोकांची राहण्याची सोय नसल्याने ते आमदारांच्या निवासातच डेरेदाखल होतात. खोलीत एखादी जागा मिळाली तर तिथेच रात्रभर झोप काढतात. मात्र आमदाराच्या पलंगावर झोपण्याची हिंमत कोणीही करत नाही. मात्र  पारनेरचे आमदार निलेश लंके यांची गोष्टच वेगळी. आमदार लंके यांना आकाशवाणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हत्याराने वार करून तरूणाचा खून, मृतदेह कालव्यात फेकला

अहमदनगर लाईव्ह24 टीम/  शिर्डी : रहाता तालुक्यातील कोहाळे पांगरीमळा येथील तरूण सुनिल उर्फ सोनू अशोक मुर्तडक, वय – २५ या तरूणास अज्ञात आरोपींनी डोक्यात पारधार हत्याराने मारुन जिवे ठार मारले. खून केल्यानंतर मयत सुनिल उर्फ सोनू अशोक मुर्तडक या तरूणाचा मृतदेश पुरावा ना करण्याच्या उद्देशाने गोदावरी उजव्या कालव्याच्या पाण्यात नांदूखी शिवारात श्रीकृष्ण मंदिराजवळ कालव्यात फेकून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर शेतात बलात्कार, ५६ वर्षांच्या नराधमास अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील गाजदीपूर गावात अल्पवयीन मुलीवर मेंढ्या चारत असताना एका 56 वर्षीय व्यक्तिने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पारनेर पोलिसांनी अनिल खंडु गुंजाळ (रा.दैठणे गुंजाळ ता.पारनेर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि ऑक्टोबर 2019 रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई-वडिलांसोबत या परिसरात वास्तव्यास असताना आरोपी अनिल … Read more

नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा – आमदार संग्राम जगताप

नगर : नगरमध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या, घरफोडी, चेन स्नॅचिंग व मारहाणीचे प्रकार होत आहेत.  कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला  असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. नगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी  गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देऊन केली आहे. दरम्यान, ५ मार्चला अशी आढावा बैठक प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांसमवेत घेण्याची मागणी … Read more

इंदोरीकर महाराजांबाबत अमृता फडणवीस म्हणतात …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे काही व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. त्यात ते महिलांना काही प्रमाणात कमी लेखत असल्याचे दिसून आले. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. पण त्यांनी महिलांचा आदर कमी होईल, अशी विधानं करू नये, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या त्यांनी इंदोरीकर … Read more

तमाशा कार्यक्रमाच्या स्थळावरून झाला ‘राडा’!

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे कानिफनाथ यात्रोत्सवात तमाशा कार्यक्रमाच्या स्थळावरून वाद झाल्याने यात्रोत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला. यावेळी गावामध्ये तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. सालाबादप्रमाणे बारागाव नांदूर येथील कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी यात्रोत्सव समिती प्रयत्न करीत होती. दरम्यान, महाशिवरात्रीनंतर शेकडो तरुणांच्या … Read more

कोरोनाचा शिर्डीकरांना फटका, भाविकांच्या संख्येत झाली ‘इतकी’ घट !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडला असून, भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाबाबत भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. देशातील सर्वाधिक भाविक येत असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतही भाविकांची संख्या रोडावली असून, परीक्षांबरोबरच कोरोना हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या २० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेळ्या चारण्यासाठी गेल्या तीन मुली शेतात, दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे, पाडाळणे येथील खैरेवाडा बंधायात तीन अल्पवयीन शाळकरी मुली बुडाल्या. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक बचावली आहे. तिला नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आज दुपारी ही घटना घडली. याबबत सविस्तर माहिती अशी कि पाडाळणे गावच्या शिवारात खैरेवाडी बंधारा आहे. शनिवारी दुपारी … Read more

बाह्यवळण रस्‍त्‍याच्या कामासाठी २३४ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहाता :- दळणवळणाच्या दृष्‍टीने महत्वपूर्ण असलेल्या नगर मनमाड या मार्गावरील कोल्हार ते बाभळेश्वर तसेच बाह्यवळण रस्‍त्‍याच्या कामासाठी २३४ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. कोल्हार येथे प्रवरा नदीवरील नवीन पूल, बाभळेश्वर येथील उड्डाण पूल आणि बाह्यवळण रस्‍त्‍याच्या मजबूतीकरणाचे कामही आता या निधीतून मार्गी लागणार असल्याची माहिती माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील … Read more

मोबाईलची रिंग वाजताच खोकल्याचा आवाज आणि कोरोनाची सूचना

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  जिल्हयात सद्या कोणालाही मोबाईल लावा , रिंग सुरू होताच खोकल्याचा आवाज येतो त्यानंतर कोरोना संबंधी काळजी घेण्याची सूचना येते . केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मदत केंद्राचा नंबर दिला असून तो सांगितला जातो. त्यानंतर पुढच्या माणसापर्यंत रिंग पोहचते. त्यामुळे कोरोनाचा धोका रोखण्यासाठी आता मोबाईलच्या संपर्काच्या यंत्रणेचाच वापर होत असल्याचे कालपासून कोणताही मोबाईल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बसस्थानकावरच ऊस तोडणी मजूर महिलेची प्रसुती !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकावर एका उस तोडणी मजूर महिलेने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला. याबबत सविस्तर असे कि, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव केरू पोकळे हे व त्यांची पत्नी सलाबाई हे दोन लेकरांसह दौड शुगर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आले होते. सलाबाई या गरोदर होत्या. अशा परिस्थितीत पोटाची खळगी … Read more

पेट्रोलपंपावरच ट्रकने घेतला पेट …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोल्हार कारखान्यातून साखर घेऊन निघालेल्या ट्रकचा डिझेल टॅँक पेट्रोलपंपावरच शुक्रवारी सकाळी फुटल्याने ट्रकने पेट घेतला. साखरेची पोती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ट्रकचे अतोनात नुकसान झाले. सुदैवाने पेट्रोल पंप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. ही दुर्घटना नगर-मनमाड रस्त्यावरील कोल्हार येथील उद्योजक अजित कुंकुलोळ यांच्या रिलायन्स कंपनीच्या पेट्रोलपंपावर सकाळी दहाच्या सुमारास घडली. कर्जत तालुक्यातील अंबालिका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लॉजमध्ये चार वेळा बलात्कार नंतर दिली जीवे ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लॉजमध्ये बलात्कार करण्यात आला. ही घटना श्रीरामपूर व बेलापूर परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरात राहणारी २२ वर्षाची तरुणी हिला लग्नाचे अमिष दाखवून आरोपी अमोल ऊर्फ संतोष दासरजोगी (वय २५ रा . निपाणी वडगाव , … Read more

जन्मदात्या पित्याच्या अंत्यसंस्कारानंतर तिने दिली अग्निपरीक्षा आणि आता झाली डॉक्टर

उंबरे : आपल्या जन्मदात्या पित्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवास अग्निसंस्कार होऊन आपल्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला सारून व पित्याच्या विरहाचे दुःख मनात ठेवत केवळ पित्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने डॉक्टरकीची परीक्षा दिली. नव्हे तर तिची ती जणूकाही ‘अग्निपरीक्षा’ ठरली. काल या परीक्षेचा निकाल लागून ती चक्क महाविद्यालयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिचे डोळ्यात भरणारे यश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- घराशेजारील शेततळ्यात बुडून ११ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. ही घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. ऋतुजा अमोल कोकाटे (इयत्ता ५ वी) असे या मुलीचे नाव आहे. चिचोंडी पाटीलचे माजी सरपंच अमोल कोकाटे यांची ती कन्या आहे. कोकाटे हे मारुतीवाडी परिसरातील वस्तीवर राहतात. ऋतुजा दुपारी … Read more

मुलीचा प्रेमविवाह आईवडीलांना पडला ‘महागात’ ! ‘या’ मुळे झाला आई-वडिलांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- मुलीने प्रेमविवाह केल्याचे समजताच रागाच्या भरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, विषारी औषध प्राशन केलेल्या आई-वडिलांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी शुक्रवारी दिली. मुलीने प्रेमविवाह केल्याने रागाच्या भरात आई-वडिलांनी राहुरी तहसील कार्यालयात विषारी औषध प्राशन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलिस निरीक्षक … Read more