आत्महत्या केलेल्या त्या व्यक्तीची ओळख पटेना

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- साईंच्या भूमीत येऊन बंधिस्त विहिरीत दाढी, टक्कल करून व मिशा काढून आत्महत्या केलेल्या ४० वर्षे वयाच्या व्यक्तीच्या वारसांचा शोध कसा घ्यावा असा प्रश्न शिर्डी पोलिसांसमोर आहे. या तरूणाने कोणत्या हेअर सलूनमध्ये दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढले त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दि. २० फेब्रुवारी रोजी हॉटेल साईछायाच्या मागे असलेल्या गोंदकर … Read more

पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन बालकांना चावा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहाता तालुक्यातील चितळी येथे शाळकरी मुलांना पिसाळलेल्या कुत्र्र्याने चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. काल गुरुवारी (दि. २७) खेळणाऱ्या मुलांमध्ये अचानक येऊन तिघांना या कुत्र्याने चावा घेतला. याता शिवराज गणेश चौधरी (वय ५), संकेत संदीप भोसले (वय १४) व तिसऱ्याचे नाव समजू शकले नाही. या चिमुरड्यांना चावा घेतल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या आणखी दोन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवद्रोही श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने त्याचे पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. छिंदम निवडणुकीला … Read more

भगवान गडावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील भगवानगडावरील वास्तुसंग्रहालयातून भगवानबाबा यांनी वापरलेली २ बोअरची एक रायफल व तलवार चोरीला गेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गडावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित आरोपी दिसत असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही रायफल संत भगवानबाबा स्वतः वापरत होते. वस्तू वस्तुसंग्रहालयात … Read more

आश्वासन देणारे मंत्री प्रत्यक्षात कृती मात्र अन्यायाची करत आहेत…

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- सत्तेत आलेल्या मंत्र्यांनी देसवंडीच्या बंधाऱ्याच्या माध्यमातून एकाच्या तोंडातला घास हिसकावून दुसऱ्याचे पोट भरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की मंत्र्यांचे असा सवाल देसवंडीच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अन्यायग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा देसवंडी बंधाऱ्याला विरोध नसून त्याची जागा बदलल्यास अन्यायग्रस्त भागातील शेतकऱ्यांनाही या बंधाऱ्याचा फायदा होईल, … Read more

राज्यातील हे सरकार महाभकास’ आघाडी सरकार आहे !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / जामखेड :- जनतेच्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार व शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यातील हे सरकार महाभकास’ आघाडी सरकार आहे, असा आरोप माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.महाविकास आघाडीच्या विरोधात … Read more

संगमनेर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प सर्वांना दिलासा देणारा – नगराध्यक्षा तांबे

संगमनेर :- नगरपरिषदेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या १२८ कोटी ५१ लक्ष ५३ हजार रुपये रकमेचा अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सांगितले. नगरपरिषदेचा सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प सभागृहाची मान्यता मिळण्यासाठी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. यावेळी … Read more

सत्यजीत तांबे यांना खासदार करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्रातून रिक्त होणार्‍या राज्यसभेच्या खासदार पदासाठीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नगर मधील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत … Read more

तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

संगमनेर | संगमनेर खुर्द येथे सिद्धकला आयुर्वेदिक महाविद्यालयात जवळे-बाळेश्वर येथील शंकर विठ्ठल पांडे (८०) या वृद्धाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. पांडे हे सांधेवाताच्या उपचारासाठी मंगळवारी महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाले होते. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली. संगमनेर शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रमुख विश्वस्त डॉ. नैमेष सराफ यांच्याशी संपर्क … Read more

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ‘महिला स्वसंरक्षण’ कार्यक्रम संपन्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नगर: रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात सावित्री मैत्रेयी फोरम व क्रीडा विभागामार्फत विद्यार्थीनी व्यक्तिमत्व विकास, निर्भयता, सक्षमीकरण तसेच स्वसंरक्षणार्थ ‘महिला स्वसंरक्षण कार्यक्रम’ दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी महाविद्यालय प्रागंणात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व कराटे प्रशिक्षिका कु.राजश्री अल्हाट यांनी विद्यार्थीनीना महिला आयोग, महिलांना असलेल्या संवैधानिक व न्यायिक … Read more

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नातील प्रवरानगर येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स सेन्टर प्रकल्पाचे यश …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहता: विज्ञानाचे प्रयोग मुलांनी स्वत: करून पाहिले, तर ते त्यांना चांगल्या पद्धतीने समजून येतात. परंतु त्यासाठी मुलांना ते करून पाहण्याची संधी बालवयातच मिळायला हवी, या साठी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शिक्षणाच्या सर्व सुविधा परिपूर्ण पद्धतीने मुद्दाम खेड्यातच निर्माण करताना आणखी एक पाऊल पुढे टाकून खेड्यातील मुलांमधील कुतुहल आणि … Read more

काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीसपदी फिरोज शफी खान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नगर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीसपदी फिरोज शफी खान यांची नियुक्ती विभागाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र वक्फ बार्ड अध्यक्ष माजी आमदार एम.एम.शेख यांनी केली. फिरोज खान गेल्या सहा वर्षांपासून या विभागाचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत, त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन पक्षाने प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करुन त्यांना बढती … Read more

विविध मागण्यासांसाठी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाची निदर्शने अन्यथा लेखणी बंद आंदोलनाचा इशारा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  अहमदनगर : बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, उपाध्यक्ष निलेश उबाळे, रतन तुपविहिरे, सुनील सोयगावकर, पी.बी. गायकवाड, सचिन पैठणकर, संदीप महारनवर, बाळासाहेब गाडे, किशोर शिरसाठ, राजहंस देसाई, वासुदेव राक्षे, प्रकाशराव साळवे, अनिल जाधव, प्रभाकर दराडे, प्रभाकर उबाळे, … Read more

दिल्लीच्या हिंसाराचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : दोन महिन्यापासून शांततेने सुरु असलेल्या एनआरसी व सीएए विरोधात आंदोलनास दिल्ली मध्ये काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले असून, यामध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. पोलीसांकडून देखील आंदोलकांवर दडपशाही केली जात असल्याचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला. तर या मागील शक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर … Read more

सुनिल सकट यांना रयतरत्न पुरस्कार प्रदान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) व रयत प्रतीष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिमराव सकट यांना आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते रयतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे झालेल्या पाचव्या लोककला महोत्स वात सकट यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. … Read more

सामाजिक भावनेने रसाळ नेत्रालय रुग्णांना सेवा देत आहे -प्रा. श्रीकांत बेडेकर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  अहमदनगर : वैद्यकिय व्यवसाय फक्त पैश्यासाठी मर्यादित न ठेवता, सामाजिक भावनेने रसाळ नेत्रालय रुग्णांना सेवा देत आहे. प्रामाणिकपणे येथे रुग्णसेवा केली जात आहे. बरे झालेले रुग्ण हेच जाहिरातीचे ब्रँड अँबेसिडर ठरतात. डोळे व ह्रद्य बाबतीत रुग्णांनी जागृक राहिले पाहिजे. डोळ्यांच्या दृष्टीअभावी जगाचे सौंदर्य हरपते तर ह्रद्या अभावी जग सोडून जाण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डॉक्टरच्या शेतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी परिसरात भरदिवसा डॉक्टरच्या शेतात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आरोपी ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाचकर,वय २४ याने एका डॉक्टरच्या शेतात जावून तेथे असलेल्या अल्पवयीन १७ वर्ष वयाच्या गरीब तरुणीला तू माझ्यासोबत चल, शेतात काम आहे असे म्हणाला तेव्हा … Read more

इंदोरीकर महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा

संगमनेर : निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची विनाकारण बदनामी व चारित्र्यहनन करणाऱ्या विकृत व्यक्ती व शक्तींचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी वारकरी संप्रदायाच्या वतीने तहसीलदार अमोल निकम यांना देण्यात आले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काही विकृत … Read more