.. म्हणून अकोले व संगमनेर व तालुक्यातील ‘ती’ ११ गावे बंद ..! दूध दरवाढीसाठी सलग सहा दिवसांपासून उपोषण

Ahmednagar News : Ahmednagar News : राज्यात एकीकडे वाढत असलेले पशुखाद्याचे दर तर दुसरीकडे कमी होत असलेले दुधाचे दर यामुळे दूध व्यवसाय करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. याबाबत वारंवार आवाज उठवून देखील सरकार सकारात्मक पावले उचलत नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अकोले तालुक्यातील गणोरे बाजारतळ येथे दूध दरासंदर्भात तरुण … Read more

जिल्ह्याच्या १६ लोकप्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे समान वाटप होणार: पालकमंत्री ना . विखे पाटील

Ahmednagar News : जिल्हा वार्षिक योजना , अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनेंतर्गत २०२४-२५ साठी शासनाद्वारे ८२१.५२ कोटी एवढी कमाल नियतव्यय मर्यादा देण्यात आलेली होती. उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय झालेल्या बैठकीत वाढीव मागणीच्या अनुषंगाने ९३२.९३ कोटी इतका नियतव्यय शासनाने अंतिमत: मंजुर केला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात गेल्यावर्षी प्रमाणे विधानसभेचे १२ आमदार, २ विधान परिषदेचे … Read more

जिल्ह्यातील ‘त्या’ ९८ हजार शेतकऱ्यांना मिळाले ८२ कोटी… ! तुम्हाला मिळाले का ?

Ahmednagar News : राज्य शासनाने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर दि. ११ जानेवारी ते १० मार्च या पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ९८ हजारांहून अधिक दूध उत्पादकांना ८२ कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिली. राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध … Read more

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या की, घातपात. काय आहे मृतदेहाचे अकोले कनेक्शन ?

ghatpaat

सप्तशृंगी गडावरील पाट झाडीत गुरुवारी (दि.४) रोजी एका शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. शेतमालाच्या व्यापाऱ्याने या शेतकऱ्याचे अपहरण करून त्याचा खून केला असल्याचा आरोप शेतक-याच्या कुटुंबीयांनी केला आहे. जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने आपल्या कुटुंबियांना दबक्या आवाजात ऑडिओ व व्हिडीओ पाठवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चार दिवसांपासून रात्री अपरात्री ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे.विशेष म्हणजे ग्रामीण भागात या ड्रोनच्या घिरट्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटनाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले … Read more

मेंढपाळतांड्यामध्ये वेठबिगार असलेल्या मुलाची सुटका; पारनेर तालुक्यातील घटना

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी येथे एका मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्यासाठी वेठबिगार म्हणून ठेवण्यात आलेल्या बारा वर्षे वयाच्या मुलाची चाइल्ड लाईन व सहायक कामगार आयुक्त यांनी सुटका केली आहे. नाशिक जिल्ह्यातील गौरी या मुलीच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. गौरीच्या मृत्यूनंतर आदिवासी भागात मेंढपाळतांड्यामध्ये अनेक लहान मुले वेठबिगार म्हणून राबवले … Read more

प्रशासनावर कोणाच्या तरी दबावाखाली काम करतय – खा. निलेश लंके यांचा गंभीर आरोप !

nilesh lanke

आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. खा. लंके म्हणाले, गावागावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. आज मोठ्या संख्ये जनावरेदेखील या आंदोलनात आणण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मात्र प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप खा. लंके यांनी केला आहे. सरकारने चार महिन्यांपूर्वी अनुदान जाहीर केले. त्यातील दोन टक्के … Read more

अकोले तालुक्यात वरुण राजा बरसला, भंडारदऱ्यात धुव्वाँधार तर घाटघरला मुसळधार पावसाची हजेरी !

musaldhar paus

गेल्या २४ तासामध्ये भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. भंडारदरा धरणाच्या परीसरातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्टयात पावसाचे तांडव सुरूच आहे. घाटघरला पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. सतत कोसळत असणारा पाऊस व प्रचंड धुके यामुळे घाटघर गाव धुक्यामध्ये हरवले … Read more

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार बरसात ; शेतकऱ्यांच्या भातपिकाची लागवड सुरू तर पर्यटकांची … !

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान काहीशी उसंत घेतल्यानंतर पावसाने भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार बरसात केली. ओल्याचिंब झालेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांवरून पांढरे शुभ्र धबधबे कोसळू लागले आहेत. पावसाने चांगले आगमन झाल्याने एकीकडे आदिवासी शेतकऱ्यांनी भातपिकाची लागवड सुरू केली आहे. दुसरीकडे फुललेल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले परिसरात वळू … Read more

वीजबिल न भरल्याने शाळांचा वीज पुरवठा खंडित ; ऑनलाइन शिक्षणाचा बट्याबोळ

Ahmednagar News : सर्वांना शिक्षणाचा अधिकार, या धोरणानुसार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी सरकारने निर्माण केल्या आहेत. त्यामुळे कोणतेच मूल शिक्षणाअभावी राहणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मात्र, प्रशासकीय पातळवरील अकार्यक्षमतेमुळे तसेच प्रशासनाच्याच चुकीच्या निर्णयामुळे शिक्षणाच्या धोरणाला ब्रेक लावण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या स्पर्धेच्या युगात खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची … Read more

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

suiside

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील कनोली येथे समोर आली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दीपक दादासाहेब बलसाने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, आत्महत्या करण्यापूर्वी बलसाने यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. आपण फायनान्स कंपनीला पैसे दिले; मात्र … Read more

‘त्या’ ४२ गावातील नागरिकांसह वारकरी देखील तहानलेले ; १८जूनपासून पाणी योजनाच बंद …! शिवसेनेने केले आंदोलन

Ahmednagar News : सध्या आषाढी वारीमुळे नगर तालुक्यातील सोलापूर महामार्गावरून जवळपास ६० ते ७० हजार वारकरी पायी दिंडीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिंडीतील वारकरी मुक्कामाला राहत आहेत.आपल्या संस्कृतीनुसार घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण नाही तर कमीत कमी पिण्यास पाणी तरी देणे आवश्यक असते. मात्र मागील १५ ते २० दिवसांपासून नगर तालुक्यातील ४२ … Read more

बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला लवकरात लवकर मंजुरी द्या – खासदार भाऊसाहेब वाकचौरे 

bhausaheb vakchaure

१०२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाला केंद्रीय मंजुरी देऊन या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटिश काळात मंजुरी मिळून, या रेल्वे मार्गासाठी भूमि अधिग्रहण करून माती भरावाचे काम देखील झालेले आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर हा रेल्वे मार्ग … Read more

केवळ विरोधी पक्षातील आमदार आहे म्हणून…., आ. कानडेंनी अधिवेशनात मांडले गाऱ्हाणे !

lahu kanade

लोकप्रतिनिधी म्हणून आपण मंजूर केलेल्या कामाचे फलक लावून उद्घाटने खासदार अथवा अन्य पदाधिकारी करीत असल्याबद्दल आमदार लहू कानडे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी आ. कानडे म्हणाले की, माझ्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात केवळ विरोधी पक्षातील आमदार आहे म्हणून काही नवीन गोष्टी सुरू झाल्या आहेत. सभागृहात अंतरिम … Read more

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात २ कोटी ४८ लाख रुपये वर्ग !

संजय गांधी निराधार योजना

राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना जून २०२४ अखेर २ कोटी ४८ लाख ४ हजार ८०० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४० लाभार्थ्यांना ७७ लाख ७६ हजार ६०० … Read more

‘तनपुरे’ कारखाना कोण चालवणार ? ‘या’ दोघांनी नेल्यात निविदा

tanapure karakhana

Ahmednagar News : राहुरीच्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार २७ जून ते ५ जुलै या कालावधीत राज्यभरातून दोघांनी निविदा नेल्या आहेत. यात पुण्याच्या भुलेश्वर शुगर आणि बीडच्या मोहटादेवी शुगर यांचा समावेश आहे. दरम्यान, निविदा नेण्यासाठी आज ६ जुलै अंतिम मुदत असून आजपासूनच … Read more

खा. लंकेंच्या आंदोलनात महिलांनीही खोसला पदर ! कलेक्टर ऑफिस समोरच मांडल्या चुली, केल्या पिठलं भाकरी

lanke

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली, तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेत. नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत, या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत … Read more

मुलांच्या भांडणातून दोन समाजाच्या गटात हाणामारी, अहमदनगरमधील घटना

hanamari

Ahmednagar News : मुलांमधील मारहाणीच्या घटनेवरून बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये दोन समाजाच्या गटांत वाद झाला. या प्रकरणी दोन्ही गटांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले आहेत. यास्मिन अकिल शहा (वय ३१ रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आश्विनी दिनेश बुरकुले (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा यांचा … Read more