अपहरण झालेले उद्योजक करीम हुंडेकरी यांची सुखरूप सुटका !

अहमदनगर :-  आज सकाळी पिस्तूलाच्या धाकाने अपहरण झालेले शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीम हुंडेकरी यांना पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद-जालना रोडवरुन सुखरुपपणे ताब्यात घेतले असून उद्योजक हुंडेकरी यांना सव्वातीन वाजता नगरमध्ये आणण्यात आले आहे. शहरातील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले होते. या घटनेुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून … Read more

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार – आ. कानडे

श्रीरामपूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळींनी मला साथ दिली आणि त्याला मतदारराजानेदेखील पसंती दिली. शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून मी मतदारसंघात कामे करणार आहे.  शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देऊ, असे श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांनी सांगितले. आमदार कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी शनिवारपासून आपला दौरा सुरू केला. … Read more

नागवडे साखर कारखान्याच्या अजब फतव्याने सभासदांत तीर्व नाराजी 

File Photo

श्रीगोंदे –  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ महिन्यांवर येऊन ठेपली असताना कारखाना प्रशासनाने एका वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन ज्या सभासदांचे शेअर्स अपूर्ण आहेत, त्यांनी डिसेंबरअखेर पूर्ण करावेत, अन्यथा मतदानास वंचित राहावे लागेल असा फतवा काढल्याने सभासदांमध्ये नाराजी पसरली आहे.  नागवडे कारखान्याची उभारणी सुमारे ४५ वर्षांपूर्वी झाली, त्यावेळी सभासदत्व शुल्क ३ … Read more

‘या’ कारणामुळे तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा बंद !

राहुरी शहर – गेली दोन वर्षे सुरळीत चाललेला डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा उसाच्या टंचाईमुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी कमी पावसाने राहुरीतील ऊसक्षेत्र घटण्यास कारणीभूत ठरले.  तनपुरेच्या कार्यक्षेत्रात १५ लाख टन ऊस असतो, मात्र यंदाच्या गळीत हंगामात राहुरी तालुक्यात केवळ‌ २ लाख टन ऊस उपलब्ध आहे. नवीन लागवडीसाठी बेणे म्हणून त्यातील … Read more

सलग चौथ्या दिवशीही शिर्डी विमानसेवा ठप्प!

काेपरगाव : ढगाळ वातावरणामुळे अपेक्षित दृश्यमानता नसल्याने गेल्या चार दिवसांपासून शिर्डी विमानतळावरील विमानांचे उड्डाण बंदच आहे.  त्यामुळे येणारी ५६ व जाणारी ५६ अशा ११२ विमानांची सेवा बंदच राहिली. त्यामुळे देश-विदेशातून साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण झाली आहे. साेमवारीही ही सेवा सुरू हाेईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त हाेत आहे. विमानतळ प्रशासनाकडूनही त्याबाबत सांगण्यात आले नाही. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी यांचे सिनेस्टाईल अपहरण

अहमदनगर :- नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज सकाळी राहत्या घराच्या जवळून अपहरण झाले.  चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना लाल रंगाच्या गाडीत घालून पळून नेले. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज पहाटे करीम हुंडेकरी हे नमाज पठन करण्यासाठी घराबाहेर पडलेले असताना ते मशिदीत पोहोचण्यापूर्वीच चार … Read more

अहमदनगर मध्येही महाशिवआघाडी : आ. संग्राम जगताप व माजी आ.अनिल राठोड येणार एकत्र ?

अहमदनगर :- राज्य स्तरावर महाआघाडी समीकरण यशस्वी होत असून यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे नेते एकत्र काम करताना दिसणार आहेत. यामुळे नगर शहराच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप व माजी आ. राठोड यांच्या समन्वय करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यात यश येईल, असा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी रविवारी केला आहे. राज्यातील बदलत्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेस बेदम मारहाण करत उसाच्या शेतात नेऊन बलात्कार !

श्रीगोंदा – तालुक्यातील कोळगाव येथील विवाहित महिलेस उसाच्या शेतात नेत अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी नितीन शिवाजी मोहारे याच्या विरोधात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इच्छे विरोधात त्या महिलेस बेदम मारहाण करत उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. तालुक्यातील कोळगाव परिसरात राहणार्‍या पीडित महिलेला शेतात कुणी नसल्याचे पाहून जवळ जाऊन … Read more

तलवार हल्ला प्रकरणास वेगळे वळण … त्या तरुणावरही गुन्हा दाखल !

पारनेर :-  शहरातील बंडू ऊर्फ सौरभ मते याच्यावरील हल्ला प्रकरणाने वेगळे वळण घेतले. डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झालेला हल्लेखोर संग्राम कावरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून जखमी सौरभ याच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १६ नाेव्हेंबरला गणेश व संग्राम कावरे बंधूंनी सौरभवर तलवार व चॉपरने वार केल्याने त्याच्यावर नगरच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. … Read more

पारनेर मध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

निघोज :-  पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यात अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी आढळला. ३५ वय असलेल्या या महिलेच्या अंगावर लाल काळा रंगाचा सलवार व कुर्ता असून पांढऱ्या रंगावर काळे ठिपके आहेत. मृतदेह कुजला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी मृतदेह कुंड परिसरात पुरण्यात आला.

कंटेनरने दिलेल्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

केडगाव :- कंटेनरने दिलेल्या धडकेत कर्तव्य बजावणाऱ्या राज्य महामार्ग पोलीस दलातील हवलदार शहाजी भाऊराव हजारे यांचा मृत्यू झाला.  येथे महामार्ग पोलिस केंद्रात कार्यरत चिचोंडी पाटील येथील पोलिस नाईक शहाजी भाऊराव हजारे (४७) यांचा रविवारी कंटेनरची (आरजे १४ जीएस ७०५५) धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण शिवारात नगर-सोलापूर रस्त्यावर देवनारायण ढाब्यासमोर … Read more

अ.नगर ऐवजी अहमदनगर नाव वापरण्याची मागणी

श्रीरामपूर : अ.नगर ऐवजी अहमदनगर या नावाचा वापर करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष फहीम शेख यांनी श्रीरामपूर आगारप्रमुखांकडे केली आहे.   आगारप्रमुखांना दिलेल्या पत्रात शेख यांनी म्हटले आहे की, बसस्थानकात अहमदनगर या नावाऐवजी अ.नगर असा जिल्ह्याच्या नावाचा उल्लेख होत आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या नावाचा उल्लेख करताना अहमदनगर, असा करण्याचे … Read more

दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

नगर –  कॉलेज तरुणीने दोन तरुणाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात घडला.  सविस्तर माहिती अशी की,  नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात वैष्णवी राजेंद्र पवार, वय १८ वर्ष, रा. जळकेवाडी, ता. कर्जत हिला दोघा आरोपींनी कॉलेजला येता – जाता नेहमी त्रास … Read more

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर – शहरात विवाहितेस मुलगी झाल्याने वारंवार छळ करून तसेच पैश्याची  मागणी करत बेकायदेशीर तलाक दिल्याप्रकरणी पतीसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की,  श्रीरामपूर शहरात वार्ड नं. १, आदर्शनगर येथे लग्नानंतर सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सबिया अझहर पठाण, वय २८, हल्ली रा. अशोकनगर फाटा, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपुर … Read more

पिसाळलेला व्यक्ती आल्याची खोटी माहीती शोशल मिडीयावर टाकणार्यांवर कारवाई करा

लोणी : सोशल मिडीयावर लोणी बुद्रुक परिसरात पिसाळलेला माणुस दिसला असुन त्याने काही नागरीकांना चावा घेवून जखमी केले असल्याचा खोटा मजकुर प्रसारित केलेल्या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेतली असुन  खोटा मजकुर प्रसारित केरणार्यांवर  कारवाई करणार असल्याचे ग्रामपंचायतीने प्रसिद्धी पत्रक काढुन स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी नगर शहर आणि परिसरात पिसाळलेल्या माणसाने मोठी दहशत … Read more

शिक्षिकेच्या गळ्यातील गंठण लांबविले !

संगमनेर : शहरातील पार्श्वनाथ गल्ली येथील राखी महेश कासट या शिक्षिकेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठन ओरबडून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलीवरून धूमस्टाईलने पोबारा केल्याची घटना स्वामी समर्थ मंदिराजवळ शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे महिलांमध्ये भूतीचे वातावरण पसरले आहे. एकूण ६६ हजार रुपये किंमतीचे हे गंठन होते. याबाबत शहर पोलिसांनी … Read more

माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे स्वीय सहायक येमुल यांचे निधन

नगर : राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात सहायक पोलिस निरीक्षक असलेले नगरचे गणेश सुदर्शन येमुल (वय ४०) यांचे पुणे येथे ह्यदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.  गणेश येमुल हे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे प्रतिनियुक्तीवर स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते. गणेश येमुल हे २००२ मध्ये नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. खात्यांतर्गत परिक्षा देऊन ते … Read more

खोटे सोने पतसंस्थेत तारण ठेवून सव्वाआठ लाखांची फसवणूक !

जामखेड :  तालुक्यातील धर्मात्मा मल्टिस्टेट क्रेडिट संस्थेच्या शाखेत आठ जणांनी ५८० ग्रॅम खोटे सोने खरे असल्याचे तारण ठेवून संस्थेची सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक केली. यासाठी संस्थेच्या सोने मुल्यमापकाने त्यास मदत केली यावरून एकंदर नऊ जणांवर संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकांनी जामखेड पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. याबाबत … Read more