अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप

अहमदनगर : नगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. नगर शहराच्या हद्दीतून … Read more

मोटारसायकलींचा अपघात; मुलीचा मृत्यू

अहमदनगर : दोन मोटारसायकलचा अपघात होवून यात प्रिती संतोष म्हस्के या १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू तर भानुदास केशव खराडे हे जखमी झाले आहेत. ही घटना दि.९ ऑक्टोबर रोजी कुळधरण गावच्या शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर घडला असून, याप्रकरणी महेश बबन कुलथे (रा.दुरगाव,ता.कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, भानुदास केशव खराडे हे … Read more

पोलिसास धक्काबुक्की

अहमदनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितल्याचा राग येवून त्यास शिवीगाळ केल्याची घटना जामखेडमध्ये घडली. याप्रकरणी नागेश अशोक गवळी, अशोक मारूती गवळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे सांगितल्याने नागेश अशोक गवळी व अशोक … Read more

मनपा आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच बसवण्यात येणार

अहमदनगर : महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव महासभेत दोन वर्षापुर्वी झालेला आहे. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. … Read more

नगर शहराला महानगर बनवणार : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- नगर शहर विकासाच्या संकल्पनेतून नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान केले. माझ्यावर आता शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. नागरिकांना बरोबर घेऊन मी शहर विकासाला चालना देणार आहे. उपनगरांच्या विकासाबरोबरच मध्यवर्ती शहराचे प्रश्न सोडवणार आहे.  विकासकामांबरोबर रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुकुंदनगरच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे … Read more

फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेल्याने नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

राहुरी :- कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने आलेल्या नैराश्यातून गडदे आखाडा येथील अविवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली. भारत बारकू गडदे (२४) याने दोन वर्षांपूर्वी फायनन्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. भारतने दोन सहामाही हप्ते व्याजासह भरले होते. मात्र, … Read more

५ वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या

श्रीरामपूर ;- तालुक्यातील वडाळा महादेव शिवारात राहणाऱ्या अश्विनी दीपक सोनुले (वय २६) या विवाहितेने आपल्या ५ वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. नेवासे रस्त्यावरील साक्षी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे मारुती राऊत यांच्या विहिरीत या महिलेने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलीसह उडी घेतली. लोकांच्या ही गोष्ट लक्षात येताच शोधमोहीम सुरू केली. दुपारी महिलेचा मृतदेह सापडला. मुलीचा … Read more

मिरवणुकीवर टीका झाल्यानंतर रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये गेले होते. मात्र दुसरीकडे रोहित पवारांची त्यांच्या मतदारसंघात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरुन रोहित पवारांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. विजयी मिरवणुकीवरुन टीका झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, … Read more

आयुक्तांच्या दालनाला चिकटवले निवेदन

नगर : संततधार पावसाने शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.  रस्त्याचे पॅचिंगचे काम मनपा प्रशासनाने लवकरात लवकर करावे अशी मागणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना देण्यासाठी मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले तेव्हा अधिकारी उपस्थित नसल्याने आयुक्तांच्या दालनाला निवेदन चिकटवून नगरसेवक योगीराज गाडे यांनी निषेध व्यक्त … Read more

आता कोण होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे.पालकमंत्रिपदासाठी शहर-जिल्ह्यात इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरेल. शहर अथवा जिल्ह्यातील इच्छुकांना संधी मिळाली, तर पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विधानसभेचा निवडणूक निकाल लागून आठ दिवस झाले तरी … Read more

जीवे मारण्याचा प्रयत्न,पाचपुते कुटुंबियांनमध्ये भितीचे वातावरण

अहमदनगर : डोक्यात तब्बल दगडाचे चार वार करुन जीवे मारण्याची घटना नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे दि.२१ऑक्टोंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे की, नगर जामखेड रोड वरील टाकळी काझी येथील पेट्रोलपंपासमोर सुनिल पाचपुते यांचे चहा व नाष्ट्याचे हॉटेल आहे. दि.२१ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ते रात्री दहाच्या सुमारास हॉटेल बंद करुन बाहेर पत्र्याच्या … Read more

पाणीप्रश्नावर सर्वांनी एकत्र यावे : आमदार प्राजक्त तनपुरे

पाथर्डी : मिरी -तिसगाव पाणी योजनेच्या कामात सुसुत्रता यावी, यासाठी अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी यांनी एकत्रीत येवुन काम करण्याची गरज आहे. आता राजकारणाचा भाग सोडा आणि पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर एकत्रीत या. अवैध पाणी घेणाऱ्यांना समज देवु आणि तरीही कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केले तर मग कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. … Read more

अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी आक्रमक पावले उचलणार !

श्रीरामपूर : नवीन सरकार स्थापनेनंतर श्रीरामपूर जिल्हा कृती समितीतर्फे जिल्हा विभाजनासाठी योग्यवेळी आक्रमक पावले उचलली जाऊन जिल्हा विभाजन चळवळ यशस्वी होण्यावर सविस्तर विचारविनिमय करून श्रीरामपूरच जिल्हा होण्याचा निर्धार करण्यात आला आहे.श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची बैठक नुकतीच समितीच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब औताडे यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, प्रतापराजे भोसले, विलास … Read more

माजी आ.मुरकुटेंनी दिला शेतकऱ्यांना धीर!

श्रीरामपुर: तालुक्यातील कमालपूर येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी सायंकाळी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तर पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धिर दिला. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आलेल्या दिवाळी सणावर अवकाळी पावसाचे सावट होते. शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने कमालपूर मधील शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. सोयबीन, कापूस, बाजरी, … Read more

वृद्ध महिलेची हत्या करणार्यास अटक

अहमदनगर : शहरातील लालटाकी भागातील भारस्कर कॉलनीत किरकोळ वादातून वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. ही घटना एप्रिलमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपी करण नारायण दिनकर (वय २०, रा. कसबा पेठ, पाथर्डी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डीतून ताब्यात घेतले.  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १० एप्रिल २०१९ रोजी दुपारच्या सुमारास लालटाकी भागातील … Read more

दोन गटात हाणामारी,पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : शहरातील घासगल्ली भागात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. कॉ. शहीद सलीम शेख गस्तीवर असताना त्यांना अनस मोहम्मद लुकमान खत्री (वय १९), मोहम्मद अबीद हारून खत्री (वय २१, दोघे रा. गोविंदपुरा), आकाश अरुण … Read more

अतिवृष्टीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – आ. गडाख

नेवासा :- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे आठ दिवसात सरसकट पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, नेवाशाचे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.  गुरुवारी सायंकाळी आदित्य ठाकरे यांच्यासमवेत शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. त्यात सेनेला पाठिंबा दिलेले आमदारही होते. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान … Read more

खड्ड्यांचे मोजमाप करा व १ हजार रुपये बक्षीस मिळवा !

राहुरी : नगर-मनमाड राज्यमार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले आहे. प्रशासन खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास तयार नसल्याने राहुरी फॅक्टरी येथील तरुणांनी एकत्रित येऊन ‘खड्ड्यांचे मोजमाप करा व बक्षीस मिळवा’ हे आंदोलन सुरू केले आहे. नगर-मनमाड राज्यमार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more