विखेंवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे पराभूत उमेदवारांनी आत्मचिंतन करावे !

शिर्डी  :- खा. डॉ. सुजय विखे व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून अवघे काही महिने झाले आहेत. असे असले तरी विकासाची कामे उभी करून त्यांनी जनहितासाठी नेहमीच योगदान दिले आहे. शासकीय योजना राबविण्यास नेहमीच प्राधान्य दिले.  असे असताना माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे कारणीभूत आहेत, असा आरोप काही कार्यकर्ते करीत … Read more

आमदार शंकरराव गडाखांसमोर ‘हे’ नवे आव्हान

नेवासे :-  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ ते २०१९ या काळात नेवासे मतदारसंघासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत बाराशे कोटींचा निधी आणून प्रत्येक गावातील पायाभूत सुविधांचा विचार करून रस्ते, पाणी, वीज, सभामंडपासाठी पैसे दिले.  यापेक्षाही मोठे काम करण्याचे आव्हान आमदार शंकरराव गडाख यांच्यासमोर आहे. नेवासे हे मोठे धार्मिक अधिष्ठान मानले जाते. श्रीक्षेत्र नेवासे, देवगड, शनिशिंगणापूर … Read more

आमदार रोहित पवारांच्या शाही मिरवणुकीवरील उधळपट्टी चर्चेत

 जामखेड :- ३० जेसीबी आणि पाच पोकलेनमधून गुलालाची उधळण करत व चार क्रेनच्या साहाय्याने हार घालत, फटाक्यांची आतषबाजी करत नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची शाही मिरवणूक शुक्रवारी जामखेड शहरात काढण्यात आली. सगळे रस्ते गुलालाने माखले होते.   जामखेड मतदारसंघात एकीकडे  पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे मिरवणुकीवरील उधळपट्टी हा चर्चेचा विषय झाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांनी मंत्री राम … Read more

आमदार बाळासाहेब थोरात होणार विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ?

मुंबई :- राज्यात निवडून आलेल्या २८८ आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचा मान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मिळण्याची शक्यता आहे.  नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्षपदी सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याच्या निवडीची प्रथा असते ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी विधिमंडळ सचिवालय राज्यपालांना सादर करते व त्यानंतर ते हंगामी अध्यक्षांच्या नावाची निवड करतात.  १४ व्या विधानसभेतील १० ज्येष्ठ … Read more

मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही….

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर, कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्ह्यात भाजपचे निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी केली आहे.गेंट्याल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवाराला प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना काही हजार मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अशा क्रमांक दोनच्या प्रतिस्पर्धी उमेदवारास प्रतिआमदाराचा दर्जा देण्याची मागणी व प्रस्ताव पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने मांडण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकित काही मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी … Read more

ट्रक – क्रुझरच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी

अहमदनगर :- गुरुवारी रात्री नगर – सोलापूर रस्त्यावर नगर तालुक्यातील साकत गावाजवळ मालट्रक व क्रुझर गाडीचा अपघात होऊन क्रुझरमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह पळून गेला आहे. क्रुझर जीपचालक नागेस गणपत आदलिंगे, श्रीधर शिवाजी माळी, कोमल श्रीधर माळी, महादेव हरिश्चंद्र माळी, अजित जनार्दन क्षीरसागर, तृप्ती अजित क्षीरसागर, कान्होपात्रा सुदर्शन यादव, सुदर्शन महावीर … Read more

जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार – आ. निलेश लंके

अहमदनगर – नगर तालुक्यातील निंबळक, देहरे व वाळकी गटातील जनतेनी माझ्यावर विश्वास दाखवला असून मोठे मताधिक्य दिले. त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. तालुक्याला स्वतंत्र आमदार नसल्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे. जनतेला पोरकेपणा जाणवू देणार नाही असे आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले. नगर तालुका दुध संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा … Read more

रोहित पवारांची विजयी मिरवणूक, तब्बल 30 जेसीबींमधून उधळला गुलाल!

कर्जत – जामखेड मतदार संघात राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार रोहित पवार यांची आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग होता. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार विजय झाल्यानंतर प्रथमच विजय रॅली जामखेड मध्ये काढण्यात आली.  कर्जत जामखेड मतदार संघात भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. या मिरवणुकीत तब्बल … Read more

पाण्यासाठी संघर्ष करणार : आमदार नीलेश लंके

पारनेर :- कान्हूरपठार व पठार भागावरील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करून रस्त्यावर उतरू आणि तरीही हा प्रश्न सुटला नाही तर सरकारशी दोन हात करू, पण आगामी काळात हा पाणीप्रश्न सोडवूच, अशी ग्वाही तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांनी दिली. कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे मंगळवारी झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदश्य विलास … Read more

आमदार आशुतोष काळेंचे अजित पवारांना साकडे

कोपरगाव : विधानसभा मतदारसंघात परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचनामे सुरू आहेत; मात्र सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून द्या, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांना घातले आहे. पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, … Read more

ह्रद्याचा ठोका चुकवित मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोरी व खांबावरच्या मल्लखांब स्पर्धेत खेळाडूंनी ह्रद्याचा ठोका चुकवित प्रात्यक्षिके सादर केली. अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन आयोजित जिल्हा मल्लखांब अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा बुरुडगाव रोड येथील श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन संचलित सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामावतार मानधना ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेस शहरासह जिल्ह्यातील शालेय खेळाडूंचा उत्सफुर्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्ज बाजारीपणाला कंटाळून तरुण शेतक-याची आत्महत्या !

राहाता :-  तालुक्यातील गोगलगांव  येथील तरुण शेतक-याने सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून   गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता.  रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत … Read more

कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने चिमुकलीला चिरडले

अहमदनगर – नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे भरधाव वेगात कल्याण कडून येत असलेली कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.  माधुरी बाबाजी भोसले असे या मृत चिमुकलीचे नाव असून. ही घटना घडल्यानंतर बसचालक तिथून पसार झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.  मिळालेल्या माहितीवरून … Read more

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा !

अहमदनगर : शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा.असे साकडे या शिष्टमंडळाने ठाकरे यांना घातले.राठोड यांच्याबाबत आपण विचाराधीन असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अशी माहिती सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखालील … Read more

रोहित पवार यांच्या विजयात आहे ‘ह्या’ व्यक्तीची महत्त्वपूर्ण भूमिका

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी विजय मिळवत या मतदारसंघावरील २५ वर्षांपासून भाजपची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीमध्ये पवार यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. पवार यांच्या प्रचारात आणि विजयात महाआघाडी तर अग्रेसर होतीच. मात्र, यामध्ये सर्वात पुढे होत्या त्यांच्या मातुश्री तथा बारामती … Read more

श्रीगोंद्यात रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

नगर : श्रीगोंदे तालु्क्यातील बेलवंडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. शतक मच्छिंद्र यादव (वय २०, रा. दुर्गळवाडी, ता. कोरेगाव, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे बुधवारी सकाळी बेलवंडी स्थानकात थांबली होती. यादव प्लॅटफॉर्मवर उतरला होता. रेल्वेत बसल्यानंतर काही वेळानंतर तो … Read more

धक्कादायक : अहमदनगरमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून !

जामखेड :- चार वर्षांपूर्वी उसने दिलेले एक लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून खर्डा येथे बाळु बजरंग पवार या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी एकूण पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. … Read more