कर्जत-जामखेडमध्ये पवार-विखे सत्तासंघर्ष

कर्जत – जामखेड मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे व रोहित पवार यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीतील विजयानंतर प्रा. शिंदे यांची हॅट्ट्रिक होणार तर पवार यांचा विजय राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. या लढतीला विखे आणि पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचीही झालर आहे. त्यामुळे भाजप तसेच राष्ट्रवादीसाठी हा … Read more

पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते !

कर्जत :- सामान्य घरात जन्मलेल्या राम शिंदे यांना कर्जत-जामखेडच्या जनतेने नेता बनवले. ते लादलेले नेतृत्व नाही, तर घडवलेले आहे. समोरचा उमेदवार जरी धनधांडगा असला तरी लोकशाही धनधांडग्यांची नाही. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते.  मतदारांनी शिंदेंसारख्या सामान्य नेतृत्वाला संधी देऊन मावळच्या जनतेने जसे पार्थचे पार्सल परत पाठवले, तसे रोहितचे पार्सल … Read more

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दांडिया नाईट आणि फॅशन विक कार्यक्रमाचे आयोजन

नगर : रविवारी 13 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत दांडिया नाईट आणि फॅशन वीक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर मनमाड रोड वरील बंधन लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे पासेस निल गरजे (96 04 97 42 75) आणि आकाश मुनफन (97 62 53 62 97) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन … Read more

पंकजा मुंडे व माझ्यात मतभेद नाहीत : आ. राजळे

पाथर्डी :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मी बहीण आहे. पंकजा व माझ्यात मतभेद नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद व पंकजा मुंडे यांचे सहकार्य मी जन्मभर विसरू शकत नाही. पाथर्डी-शेवगाव दोन्ही तालुके मला कुटुंबाप्रमाणे वाटतात. फसवाफसवी हा आपला विषय नाही. लोकांना फसवल्यावर काय अवस्था होते त्याचा अनुभव विरोधकांनी घेतला आहे, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

डॉ. प्रकाश आंबेडकर यांची उद्या जाहीर सभा

जामखेड | वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण जाधव यांच्या प्रचारार्थ आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा रविवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता कर्जत येथील बाजारतळावर होणार असल्याची माहिती कर्जत तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी दिली. जाधव यांनी वंचित बहुजन जोडो अभियानाच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला आहे. … Read more

विकास कामांचा डोंगर उभा केला होता तर स्वतः मैदानात का उतरले नाहीत ?

काष्टी : कुकडी साखर कारखान्यावर प्रशासक नेमावा असा आदेश निघाला होता. त्यावर कोणी कुणाचे पाय धरले आणि काय तडजोड केली याचा भांडाफोड विधानसभा निवडणुकीच्या विजयी सभेत करणार आहे, अशी टिका भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी विरोधकांवर केली. काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे भाजप बुध कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी … Read more

कुत्र्याने कागद फाडल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेस कुऱ्हाडीने मारहाण

श्रीगोंदा : कुत्र्याने कागद फाडल्याचा जाब विचारल्याचा राग येवून, जाब विचारणाऱ्या महिलेस महिला व पुरूषांनी कुऱ्हाडीने बेदम मारहाण केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे घडली आहे.या मारहाणीत शकुंतला बबन धोत्रे वय ६२ या गंभीर जखमी झाल्या आहेत.याबाबत धोत्रे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे … Read more

जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार

कोपरगाव : केंद्रात महायुतीची सत्ता आहे. राज्यातही २०१९ ला महायुतीचीच सत्ता येणार असल्याने जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार आहे, असा टोला महायुतीच्या उमेदवार आ. स्नेहलता कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना लगावला. यांना अडीच किलोमीटर लांब ठेवा, असे विधान काळे यांनी केले होते. त्याला आ. कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले. राज्यात केलेल्या विविध विकास … Read more

संगमनेरातील जनतेने निवडणूक हातात घेतली,परिवर्तन अटळ

संगमनेर : संगमनेरातील जनतेने निवडणूक हातात घेतली असून जनतेच्या सहकार्यामुळेच संगमनेरात परिवर्तन अटळ आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांनी केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी संगमनेर तालुक्यातील मंगळापूर, चिखली, धांदरफळ बुद्रुक, कौठे धांदरफळ या ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावी जाऊन … Read more

मुळा नदी बारमाहीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले- पिचड

अकोले : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मुळा बारमाहीचे स्वप्न पहिले होते ते आज पूर्ण झाले असून, मुळा नदीमध्ये ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. अनेक धरणे बांधून शेवटच्या टप्यात पिंपळगावखांड हे धरण बांधून मुळा बारमाही केली. याचा मुळा खोऱ्यासह पठार भागातील गावांना लाभ झाला, असे वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे. अकोले विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर … Read more

कांदा @ ३५००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या वांबोरी येथील केंद्रावर पाच दिवसांच्या बंदनंतर काल कांद्याच्या मोंढ्यावर ३ हजार ३४७ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास ३५०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ३ हजार ते ३५०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्यास २ हजार २०० ते २ हजार … Read more

शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

अहमदनगर : नगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी महापालिकेमार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे याकाळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी (दि.१२) पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. शनिवारी बोल्हेगांव, नागापूर, सावेडी … Read more

मनपात १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर : मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रदीप पठारे यांनी एकूण १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले असून त्यामध्ये नगररचना विभागातील ९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. यामध्ये गणेश क्यातम (पाणीपुरवठा विभाग), सतिष दारकुंडे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), श्रीकांत दरेकर (प्रभाग समिती क्रमांक १), किशोर … Read more

शरद पवार दोषी नाहीत !

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही संस्थेमध्ये थेट नाहीत मात्र, त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी वेळप्रसंगी कायद्याची व्याख्या ह्या सरकारणे बदलली. शरद पवार व्यक्ती दोषी कसे? ते दोषी असतील तर मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा, पंतप्रधान यांनी जर घोटाळे केले असतील तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांना दोषी धरणार का? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट … Read more

पाच वर्षानंतर निवडणुकांपुरता लोकांसमोर येत नाही

करंजी : पाच वर्ष घरी बसायचं आणि निवडणूक लागल्या की काहीतरी भावनिक मुद्दे घेवून मतदारांसमोर जायची पद्धत आता बंद झाली. बीड जिल्ह्याला पाणी देण्याचा प्रश्नच नाही. परंतु राहुरीकरांची निवडणूकीपुर्ती सहानूभूती मिळवण्याचा उद्योग विरोधी उमेदवार करत असून, मी गेली पंचवीस वर्षापासून आमदार आहे. त्याचे कारण मी बाराही महिने सर्वसामांन्य जनतेमध्ये असतो. या निवडणुकीत फॉर्म भरण्याचीच मानसिकता … Read more

युती सरकारच्या धोरणांमुळे मंदी : आ.जगताप

अहमदनगर : नगर शहराचा आमदार म्हणून पाच वर्षे काम करतांना शहराच्या विकासात मोलाची भर घातली असून मोठे विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत. विकासकामे करण्याबरोबरच एमआयडीसीमध्ये धूळ खात पडलेल्या आयटी पार्कला पुनर्जीवित करून अनेक आयटी कंपन्यांना पाचारण करून शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकीकडे विरोधक दादागिरी व गुंडशाहीने कायनेटिकसारख्या मोठ्या कंपनीच्या मालकांना मारहाण करून … Read more

चॉकलेट, पॅड, घोंगते वाटप, विधानसभा ही काय लुटुपुटूची लढाई आहे काय ?

कर्जत : आपण गेली पाच वर्षे काम केले म्हणून काही चुका झाल्या असतील ज्यांनी कामेच केली नाहीत. त्यांच्या चुका कोणत्या होणार यांनी कोणती कामे केली तर फक्त काटा मारला, भाडे थकवले व आता कोणते कामे सुरू आहेत. तर चॉकलेट, पॅड, घोंगते वाटप, विधानसभा ही काय लुटुपुटूची लढाई आहे काय, असा प्रश्न उपस्थित करत ना.प्रा.राम शिंदे … Read more

मला संधी द्या मी संघर्ष करायला तुमच्या बरोबर राहील

राहुरी ;- वांबोरी चारीचे पाणीचे पाणी टेलपर्यंत पोहोचविण्याचे काम १० वर्षांत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना जमले नाही. ते काम खासदारांनी करून दाखवले. आता मला संधी द्या, वांबोरी चारीच्या प्रश्नावर मी संघर्ष करायला तुमच्या बरोबर राहील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. पाथर्डी तालुक्यातील मिरी, रुपेवाडी, केशव शिंगवे, चिंचोडी, शंकरवाडीसह … Read more