या प्रमुख नेत्यांची निवडणुकीतून माघार  

अहमदनगर :- श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने माजीमंत्री बबन पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून … Read more

शेतकऱ्यांच्या मुलांकडून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध

संगमनेर :- कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सुजय विखे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘पालकमंत्री साहेब, त्यांच्या सभेला (विरोधी उमेदवाराच्या) जाणाऱ्या लोकांची यादी काढा. त्यांच्या खात्यातही मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको? तुम्हाला … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

राहाता : शहरालगत भरलोकवस्तीत घुसून बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कार्ले वस्तीवर घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी गणेश कारखान्याचे अध्यक्ष नारायणराव कार्ले यांनी केली आहे. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कार्ले वस्तीवर अरुण बाबुराव कार्ले यांच्या गोठ्यात घुसून शेळी ओढून … Read more

४० वर्षांत कोल्हे परिवाराने तालुक्याची माती केली !

कोपरगाव : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या मसुद्याच्या वेळी कोण आमदार होते? कायद्याच्या मंजुरीच्या वेळी सरकार कोणाचे होते? तेव्हा कोल्हे यांनी विरोध का केला नाही? मी तर विरोधातील आमदार होतो.  मागील वर्षीच्या दुष्काळात पोलीस बंदोबस्तात आपल्या बंधाऱ्यातील पाणी खाली सोडण्यात आले. त्यावेळी राज्यात व देशात ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे. त्या तालुक्याच्या आमदार मुग गिळून गप्प बसल्या. आपल्या … Read more

भूलथापांना बळी पडू नका- आमदार स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : केंद्रात भाजप सरकार असल्याने राज्यातही भाजप सरकारला साथ द्या. पाणी, रस्ते, पथदिवे यांसह विविध नागरी सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.  ज्यांनी दहा वर्षांत विकास केला नाही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तालुक्यातील अंजनापूर, रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी, बहादरपूर, शहापूर, पोहेगाव व सोनेवाडी या भागात कार्यकर्त्यांसमवेत बैठकीत केले. … Read more

डेंग्यूचे थैमान ; दवाखाने हाऊसफुल्ल!

कर्जत : कर्जत शहरात डेंग्यूने थैमान घातले असताना नगरपंचायतचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील दवाखाने हाऊसफुल्ल आहेत.  नारिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपंचायतनेे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पावसाळयात साथ रोगांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे या काळात प्रशासनाने विशेष काळजी घेणे आवश्यक असते.  सध्या कर्जत शहरात सर्वत्र डेंग्यूचे … Read more

कट मारल्याच्या कारणावरून जबर मारहाण

अहमदनगर : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून एकास १० ते १५ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादीचे दोन हजार रूपये रोख व तीन मोबाईल असा एकूण १ लाख १० हजारांचा ऐवज गहाळ झाला आहे.  या मारहाणीत साकीन नौशाद सय्यद (रा.आलमगीर) हे जखमी झाले आहेत. ही घटना नगर तालुक्यातील कोल्हेवाडी कमानीजवळ घडली. सय्यद यांच्या … Read more

निवडणूक प्रशिक्षणात कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाना!

नेवासा : विधानसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान दारू पिऊन गोंधळ घालणारा कर्मचारी नंदकिशोर भीमराज नाबदे (रा. शिरसगाव, ता. नेवासा) याच्यावर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  सदर व्यक्ती पाटबंधारे विभागाचा कर्मचारी असल्याचे समजते.. याबाबत पोलीस हवालदार अंकुश पोटे यांनी फिर्याद दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरातील ज्ञानोदय हायस्कूल येथे प्रशिक्षण आयोजित केले होते.  सकाळी दहाच्या सुमारास … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटेंना धक्का, गडाख-घुलेंचे झाले मनोमिलन !

नेवासा :- राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी गडाख व घुले यांचे मनोमिलन होईल का? या राजकीय शंकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज सकाळी क्रांतिकारीचे उमेदवार शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी भेंडा येथे त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली . मागील निवडणुकीतील … Read more

‘हे’ आहेत नगर जिल्ह्यातील कोट्याधीश उमेदवार

नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या दिग्गज उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवारांकडे आहे. रोहित यांच्याकडे तब्बल ५४ कोटी ७८ लाखाची तर त्याखालोखाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे २४ कोटी ७८ लाखाची संपत्ती आहे.  भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक १७ कोटी ४० लाखांची सपत्ती आहे. गुरुवारी जिल्ह्यातील … Read more

नागवडे करणार पाचपूतेंचे काम; कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणात एकमकांचे परंपरागत राजकीय विरोध असलेल्या नागवडे व पाचपुते ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर श्रीगोंदाकरांना कधी नव्हे ते आता एकत्र दिसणार आहे. खा. डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यकर्ता सहविचार मेळाव्यात सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूकीत भाजपचे अधिकृत … Read more

राज्यात दोन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

पुणे ;- येत्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या अनेक भागांत तसेच कोकणात व गोव्यात ७ आणि ८ ऑक्टोबर या दोन दिवसांत पाऊस पडेल. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरी बरसतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेनुसार यंदा थंडीचे आगमन लवकर … Read more

घुले बंधूंच्या रणनीतीमुळे निवडणूक बनली अटीतटीची!

शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून वापरला गेलेला कास्ट पॉलिटिक्‍सचा फॉर्म्यूला राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही गवसल्याने विधानसभा निवडणूकीत रंगत वाढली आहे. सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक घुले बंधूंच्या रणनितीमुळे अटीतटीची बनली आहे. भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून ऍड. प्रताप ढाकणे यांना निवडणूक रिंगणात उतरून घुले बंधूंनी 1999 साली स्वर्गीय मारुतराव घुले यांनी वापरलेल्या … Read more

शहराचे आरोग्य धोक्यात, रुग्णालये हाऊसफुल्ल

नगर :- शहरात डासांचा उपद्रव व डेंग्यूसदृश आजाराचा ज्वर वाढला आहे. शहरातील आरोग्य धोक्यात असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेकडे केली जाते, परंतु डासांचे निर्मूलन करण्यात मनपाला अपयश आले आहे. सभागृह नेते स्वप्नील शिंदे यांच्या परिवारातील दोन सदस्य डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल आहेत. सत्ताधाऱ्यांची ही अवस्था असेल, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला … Read more

अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालणार

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सातभाई वस्ती (मळहद) परिसरातील नागरिकांनी नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी निवेदन प्रसिद्धीस दिलेले आहे. त्यात म्हटले आहे, की प्रवरा नदीच्या पलिकडील सातभाई वस्ती, मळहद, बागवान मळा हा भाग बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत येतो. तथापि, या भागात रस्ते, गटारी, … Read more

मला खासदार करण्यात नागवडे कुटुंबाचा मोठा वाटा- खा. विखे

श्रीगोंदा : जिल्ह्यात शब्दाला जगणारा माणूस म्हणजे कै.शिवाजीराव नागवडे होते. सध्या राजकारणात नैतिकता राहिली नाही. श्रीगोंद्यात काही लोक निवडणुकीच्या जीवावर आपली दुकानदारी चालवतात, विधानसभा निवडणुकीच्या जिवावर दिवाळीच्या खरेदीची तयारी केली आहे. निवडणूक लागली की मतांच्या बाजारावर अनेकजण आपली पोळी भाजतात. मला खासदार करण्यात नागवडे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचा गौप्यस्फोट विखेंनी केला. तालुक्याच्या राजकारणात रोज धक्कादायक … Read more

कर्डिले व तनपुरे यांच्या अर्जावरील हरकत फेटाळली

राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले व नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या अर्जावरील हरकत फेटाळत त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. छाननीत अन्य दोन उमेदवारांचे तीन अर्ज बाद झाल्याने ११ उमेदवारांचे १५ उमेदवारी अर्ज राहुरीत वैध ठरले. सोमवारी माघारीच्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. छाननीला शनिवारी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात सुरुवात झाली. यमनाजी आघाव यांचा … Read more

गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी ३० लाखांची मागणी

श्रीगोंदे :- अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यातून आरोपीला मुक्त करण्यासाठी महिलेच्या नातेवाईकाने ३० लाखांची मागणी केली. पैसे मागणारा जिवा घोडके याच्या विरोधात दादासाहेब लक्ष्मण नलगे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महिलेच्या फिर्यादीवरुन लखन काकडे, लक्ष्मण नलगे, सुधीर नलगे, शुभांगी नलगे, राहुल नलगे, कुमार काकडे, सुनीता काकडे, स्नेहल भोसले (सर्व सांगवी दुमाला) या आठ जणांवर … Read more