शासकीय विश्रामगृहातून अल्पवयीन विद्यार्थिनीला दिवसा पळविले

संगमनेर – संगमनेर येथे एका शासकीय विश्रामगृहातून १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला काल भरदिवसा ४ च्या सुमारास अज्ञात आरोपीने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. याप्रकरणी आश्रम शाळेचे नोकरदार कर्मचारी गणेश यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन विद्यार्थिनीला विश्रामगृहातून पळवून नेणारा अज्ञात आरोपी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोनि भुसारे … Read more

महिलांसह तिघांनी ९ लाखाला फसविले

नगर – नगर शहरात जयहिंद सेल्स कॉर्पोरेशन गजानन कॉलनी नवनागापूर एमआयडीसी नगर येथे एका तरुणीस व इतर लोकांना २ महिला व एका पुरुषाने वेगवेगळे अमिष दाखवून  ९ लाखांची फसवणूक केली.  त्यांना पैसे भरायला लावून पावत्या देवून मशिन व कच्चा माल न देता तसेच शाखा सुरु करण्यासाठी तरुणीकडून व लोकांकडून वेगवेगळ्या रकमा घेवून त्यांना पावत्या देवून … Read more

दारुड्या पतीकडून छळ; पत्नीची रेल्वेखाली उडी

नगर :- परिसरात केडगाव भागात रेणुका देवी मंदिराच्या पाठीमागे राहणारी विवाहित महिला स्री, सारिका सचिन गायकवाड, वय ४३ वर्ष हिने आत्महत्या केली. सारिका तिच्या सासरी नांदत असताना तिचा पती आरोपी सचिन उर्फ जॉन अशोक गायकवाड हा तिला नेहमी दारु पिवून येवून त्रास द्यायचा, मारहाण करायचा, पती सचिन याच्या दारू पिण्याच्या व्यसनाला व मारहाण त्रासाला कंटाळून … Read more

नोकरीत फसवणूक झाल्याने युवकाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

राहुरी :- देवळाली प्रवरा येथील युवकाचा मृतदेह शुक्रवारी पाचोरा येथे रेल्वे रुळावर आढळला. आदिनाथ भिंगारे (२१) असे या युवकाचे नाव आहे.  त्याच्याजवळील ओळखपत्रामुळे रेल्वे पोलिसांना ओळख पटली. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याने आदिनाथने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  कारवस्ती येथील गरीब कुटुंबातील अत्यंत हुशार असलेल्या आदिनाथने आत्महत्या केल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली.  राहुरी फॅक्टरी … Read more

व्दारकामाईत भाविकांना दिसली साईंची प्रतिमा !

शिर्डी :- साईबाबांच्या व्दारकामाईत पुन्हा साईबाबांचा चेहरा दिसु लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी साईंची प्रतिमा बघण्यासाठी मोठी गर्दी केली असून साईनामाचा गजर सूरू आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी पुर्वसंध्येला शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती संपल्यावर साडेअकराच्या सुमारास व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा काही भाविकांना दिसला. याची खबर शहरात वार्‍यासारखी पसरताच … Read more

वेश्या व्यावसायिकांचा पोलिसांवर हल्ला !

अहमदनगर – पांढरीपूल परिसरात असणार्‍या एका हॉटेलच्या शेड मध्ये सुरू असणार्‍या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान ताब्यात घेतलेल्या महिलांची विचारपूस करणार्‍या पोलिसांवर चालकांने हल्ला चढविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्सार गफुर शेख, वाजिद नसीर शेख, मन्सूर रहमानभाई पठाण, बाबा निजाम शेख, गंगाराम जानकु काळे, रशिद सरदार शेख यांच्यासह … Read more

शौचालयाच्या टाकीत पडून मजुराचा मृत्यू

श्रीरामपूर :- बेलापूर येथील सुखदेव पुजारी यांच्या वस्तीवर शौचालयाच्या टाकीतील मैला साफ करताना एका मुजराचा गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास गुदमुरुन मृत्यू झाला. दुसरा मजूर अत्यवस्थ आहे. शौचालयाच्या टाकीतील मैला काढण्याचे काम बेलापूर येथील ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे (वय ३५, बेलापूर) व रवि राजू बागडे यांना देण्यात आले होते. अकरा वाजता हे मजूर टाकीजवळ गेले. पाच फूट … Read more

झाडे लावा…क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकणारा तो अधिकारी निलंबित

अहमदनगर :- ‘झाडे लावा…क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकणारे महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिले आहेत. महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक खासगी Whatsapp ग्रुप आहे. या ग्रुपवर देशमुख यांनी वादग्रस्त पोस्ट टाकली. ‘उन्हाळ्यात एक झाड लावा, ते वाढवा आणि हिवाळ्यात माझ्याकडून एक क्वार्टर मिळवा’ अशी ही पोस्ट … Read more

मुलाच्या लग्नाला दहा दिवस उरले असताना श्रीगोंद्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीगोंदे :- तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी रमेश बळीबा घोडके (वय ४५) यांनी गुरुवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घोडकेंवर पतसंस्था व सावकारांचे कर्ज होते. सकाळी त्यांनी घरचे दूध डेअरीला घातले. गॅसची टाकी आणली, किराणा मालही भरला. नंतर शेतात जाऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी आहे. धाकटा मुलगा पुण्यात शिक्षण घेत … Read more

…तर संगमनेरच्या कॉंग्रेस नेत्यांना फिरकू देणार नाही !

अकोले – भाषा सुधारा, अन्यथा अकोले तालुक्‍यात फिरकू देणार नाही, असा इशारा अकोले तालुका युवक कॉंग्रेस नेत्यांनी संगमनेर तालुक्‍यातील कॉंग्रेस नेत्यांना दिला आहे. प्रवरा नदीवर असणाऱ्या प्रोफाईल वॉलच्या वादाची याला किनारा आहे. अकोले तालुक्‍यातील नदीवरील प्रोफाइल वॉल (बंधारे) तोडून टाका, अशी भाषा करणाऱ्या संगमनेरी नेत्यांनी भाषा न सुधारल्यास तालुक्‍यात फिरकू देणार नाही, असा इशारा युवक कॉंग्रेसचे … Read more

नगरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर :- नगर शहरातील तपोवन रोड भागात वेश्या व्यवसाय करणार्‍या घरावर पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी छापा टाकत पाच पुरुष, एका महिलेस ताब्यात घेतले आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकण्यात आला. रात्री उशीरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील तपोवन भागात वेश्या व्यवसाय … Read more

दिपाली सय्यद म्हणतात खा.सुजय विखेंनी फसविले….

श्रीगोंदा :- तालुक्यातील 35 गावांसाठी जीवनदायी ठरणारी साकळाई योजना पूर्ण तत्त्वास व्हावी, या मागणीसाठी दि.9 ऑगस्ट रोजी जुन्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरील पटांगणात अमरण उपोषण करणार असल्याची माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली. साकळाई देवीचे दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली जाणार आहे. साकळाई योजनेचे आतापर्यंत निवडणूक … Read more

शिर्डी विमानतळाचा लवकरच होणार विस्तार !

शिर्डी :- विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करून तेथे नवीन टर्मिनल बांधण्याचे काम सुरू करावे. ही इमारत पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीने करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विमानतळ विकास … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांनी ‘त्या’ डॉक्टरला खडसावले

राहुरी :- अपघातात ठार झालेल्या तरुणाच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तब्बल १० तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याने ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील म्हैसगाव येथील सुरेश श्रीरंग नेहे (वय ३५) यांचा मंगळवारी रात्री १० च्या सुमारास म्हैसगाव-राहुरी मार्गावरील केदारेश्वर घाटात अपघात होऊन ते ठार झाले. नेहे यांचा मृतदेह रात्री पावणेअकरा वाजता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात … Read more

विवाहितेच्या घरात जाऊन तिच्याशी अश्लिल वर्तन

अहमदनगर :- घरात झाेपलेल्या विवाहितेच्या घरात जाऊन तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याची घटना स्टेशन रस्त्यावरील कोठी परिसरात मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आकाश मनोज पोळ (२२, कोठी परिसर) याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कोठे वाच्यता केल्यास मारहाण करण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली. या प्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास सोनार करत … Read more

विवाहितेचा विनयभंग,नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी

अहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

उड्डाणपुलाचे काम महिन्याभरात सुरू !

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात महिनाभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी मािहती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डाॅ. विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. याबाबत … Read more

नगरमध्ये ट्रक व एसटी बसच्या भीषण अपघातात बस जळून खाक, 28 प्रवाशी जखमी

अहमदनगर :- नगरमध्ये ट्रक व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात बस जळून खाक झाली आहे. बसमधील 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर मंगळवारी पहाटे दोन वाजता एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 2८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. बस चालक आणि वाहक या अपघातात … Read more