पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव – चोंडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव  अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी ( ता.जामखेड) हे गाव पर्यटनदृष्टया महाराष्ट्राच्या नकाशावर येऊ लागले आहे. आज चोंडीचा विकास पुढील ५० – १०० वर्षाचा विचार करून पुर्णत्वाकडे जात आहे. पुण्यश्लोक अहाल्यादेवी होळकर या आदर्श राज्यकर्त्या होत्या .त्या एक महिला असूनही त्यांनी चांगला राज्यकारभार केला. त्या एक उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख व्हावी … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुते शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवण्याचे काम करीत आहेत !

श्रीगोंदा : अधिकारी पाण्याचे नियोजन करत असताना त्यांना सहकार्य करणे योग्य की त्यात खोडा घालणे योग्य हे समजून घेतले पाहिजेत. पाणी प्रश्नी श्रेय मला मिळू नये म्हणून प्रत्येक वेळी आवर्तनात खोडा घालणारे पाचपुतेच खरे झारीतील शुक्राचार्य आहेत. अशी टीका आमदार जगताप यांनी केली. तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी अवर्तनाचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन फळबागांना … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांनी अतिक्रमण करुन बांधला बंगला !

अहमदनगर :- राज्याचे जलसंधारणमंत्री तथा नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जामखेड मध्ये अतिक्रमण करुन बंगला बांधल्याचे समोर आले आहे. मंत्री राम शिंदे यांचे वडिल शंकर बापू शिंदे यांनी मौजे चौंडी, रा. जामखेड, जि. अहमदनगर येथील सर्वे नं. 2/3 या जागेवर चौंडी ते अरणगाव रस्ता व चौंडी ते देवकरवस्ती रस्ता या दोन्ही रस्त्यांवर शासकीय जमीनीत … Read more

दिलीप गांधीना संपविण्यासाठी विरोधक सरसावले !

अहमदनगर :- माजी खा. दिलीप गांधी यांची खासदारकी गेली, आता त्यांच्याकडे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष पद आहे. तेही काढून घेण्याचे घाटत आहे. त्यानंतर अर्बन बँकेत पानीपत करण्याची तयारी गांधी विरोधकांनी चालवली आहे. नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. नगरमधील वैभवशाली आणि 109 वर्षाचा वारसा असलेल्या या बँकेचे नेतृत्व माजी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे असून त्यांच्या … Read more

विखे-थोरात यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र

‘अहमदनगर :- तुमच्‍यात बदल व्‍हावा म्‍हणून आम्‍ही सातत्‍याने संगमनेरला येतच राहणार. आता देश बदलत आहे, तुम्‍हीही बदला,’ असा सूचक सल्‍ला ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील व्‍यापाऱ्यांना दिला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्‍यापासून ते विजयापर्यंतच्‍या सर्वच घडलेल्‍या घडामोंडीचा मार्मिक आढावा विखे पाटील यांनी दिलखुलास गप्‍पांमधून व्‍यापाऱ्यांपुढे उलगडून दाखविला. यातील ‘संगमनेर’ची भूमिकाही त्यांनी सांगितली. … Read more

मुलीला पळवून नेण्याच्या वादातून मारहाण

अहमदनगर :- नगर तालुक्यातील हातवळण येथे मुलीला पळवून नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकाला मारहाण केली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंबादास सोन्याबापू जगताप (रा. मठपिंप्री, नगर) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रंगनाथ मेटे, सुमीत भानुदास जपे, दत्तात्रय कारभारी जपे, सागर दत्तात्रय जपे, सचिन … Read more

खासदार डॉ.सुजय विखे यांचा उद्या सत्कार

कर्जत :- नगर दक्षिण चे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांचा तालुका महायुतीच्या वतीने ३१ मे रोजी कर्जत येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी विविध विकासकामांचा प्रारंभही करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या … Read more

नगर शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. डॉ. प्रकाश कांकरिया यांना अटक

अहमदनगर – शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांना चेक बाउन्स प्रकरणी पोलिसांनी त्यांना माणिक चौक येथून अटक केली. दरम्यान कांकरिया यांना उद्या राहुरी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्याविरोधात राहुरी कोर्टाने 138 प्रकरणात अटक वॉरंट जारी केले होते. कोर्टच्या आदेशानुसार पोलीसानी आज बुधवारी (दि.29) … Read more

‘तो’ एक निर्णय घेतला आणि आ.भाऊसाहेब कांबळे यांची राजकीय कारकिर्दच संपली !

शिर्डी :- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ.भाऊसाहेब कांबळे यांचा दारूण पराभव झाला,अगदी स्वताच्या तालुक्यातील जनतेनेही त्याना लीड न देता नाकारले. शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघात लोखंडे यांनी सुमारे एक लाख २० हजारांहून अधिक मताधिक्क्याने आमदार कांबळे यांना हरवले. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात भाजपचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तब्बल २१ हजार ४५८ मतांनी तेथून आघाडी घेत कांबळे … Read more

भरदिवसा वृद्ध महिलेचे दीड तोळे सोने लुटले

श्रीगोंदा : तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे श्रीगोंदा- मांडवगण रस्त्यावर आज सायंकाळी पाच वाजता नातीसह घरी जाणाऱ्या ८० वर्षांच्या वृद्ध महिलेच्या गळयातील दीड तोळे सोन्याचे मणी हिसकावून नेले. चोरटयांनी ज़ोराचा हिसका दिल्याने रस्त्यावर पडून ही वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली आहे. लुटमार करणारा चोरटा पळताना दुचाकीला धडकल्यामुळे नागरिकांच्या तावडीत सापडला व लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात … Read more

माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा – सुजय विखे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसेच, … Read more

खुनाचा प्रयत्न करनाऱ्या आरोपींना 24 तासांत अटक !

अहमदनगर :- रस्त्यात वाद घालू नका, वाहतूक थांबलीय असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघांनी एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. स्टेशन रस्त्यावरील सगम हॉटेलसमोर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कोतवाली पोलिसांनी या तिन्ही आरोपींना २४ तासांच्या आत बलेनो कारसह ताब्यात घेतले. आदित्य ऊर्फ निरंजन श्याम अहिरराव (२६, राहणार काळेवाडी, पिंपरी चिंचवड), स्वप्निल राजेंद्र गाडे (२०, भीमनगर, … Read more

आमदार मुरकुटेंची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार

नेवासे :- लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोणाला कोणत्या गावात किती मतदान झाले, हे प्रसिद्ध झाल्यावर राजकारण पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापू लागले आहे. गडाख व मुरकुटे यांच्या गावांमध्ये विरोधी उमेदवारांना मताधिक्य मिळाल्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मुरकुटेंच्या गावात काँग्रेसला लिड, मुरकुटेंनी लोखंडेंचे काम केलेच नाही अशा चर्चेमुळे मुरकुटे व भाजपची बदनामी झाल्याप्रकरणी नेवासे पोलिसात दोन तक्रारी दाखल झाल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मुलीच भारी !

अहमदनगर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च -2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेचा निकाल काल जाहिर झाला. त्यात नगर जिल्ह्याचा एकुण निकाल 88.07 टक्के इतका लागला. या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारल्याने जिल्ह्यात यंदाही मुलीच हुश्‍यार ठरल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परिक्षेला नियमित आणि पुनर्परीक्षार्थी असे दोन्ही मिळून 64हजार … Read more

आ.बाळासाहेब थोरातांपुढे जिल्ह्यात कॉंग्रेस टिकविण्याचे आव्हान !

अहमदनगर :- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे यांच्या झंझावातापुढे साऱ्यांचाच पाला पालापाचोळा झाल्याचे चित्र निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे.  फक्त अकोल्याचा गड शाबूत राखण्यामध्ये पिचड पिता-पुत्रांना यश आले. हा अपवाद वगळता इतर सर्वच विधानसभा मतदारसंघांत विखे यांचा झंझावात विरोधी पक्षातील सर्वांना नेस्तनाबूत करून गेला, हे मान्यच करायला हवे. पंतप्रधान … Read more

शरीर संबंधास नकार करताच द्यायचा जीवे मारण्याची धमकी,लग्नाचे आमिष दाखवून वर्षापासून अत्याचार, करणाऱ्या आरोपीस अखेर अटक !

अहमदनगर : नगर शहरात सावेडीतील वैदवाडी परिसरातील एका स्त्रीवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी रोहन आल्हाट यास अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पीडित महिला व आरोपी आल्हाट या दोघांची ओळख होती. तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगत आल्हाट याने वेळोवेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेसह तिच्या मुलीवर अत्याचार,आरोपी रिक्षा चालकास अटक एक फरार…

अहमदनगर – नगर शहरमध्ये एका शासकीय नोकरदार विधवा महिलेवर रिक्षा चालकाने तर त्या महिलेच्या मुलीवर रिक्षा चालकाच्या मित्राने अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकाला पकडून न्यायालयात उभे केले असता पोलीस कोठडी मिळाली असून त्याचा मित्र फरार झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती माहिती अशी, नगरमध्ये शासकीय सेवेत … Read more

ब्रेकिंग : गच्चीवर खेळणाऱ्या बहीण-भावाचा शॉक बसून मृत्यू

कर्जत :- तालुक्यातील गवंडी गल्लीत घराच्या गच्चीवर खेळत असताना विजेचा धक्का बसून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. आयर्न विनय कुमार निषाद (वय ७ वर्ष) व जानवी विनय कुमार निषाद (वय ३) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि रात्री घराच्या गच्चीवर खेळत असताना आयर्न (वय ७ वर्ष) व जान्हवी(वय ३ वर्ष) या दोघांना विजेच्या … Read more