संगमनेर ; बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

संगमनेर | तालुक्यातील पेमगिरी येथे यात्रेनिमित्त आलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना बुधवारी (८ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास पेमगिरी-नांदुरी शिवालगत घडली. सुदेशना रावसाहेब खैरनार (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. पेमगिरी येथील यात्रोत्सवाला सुदेशना खैरनार या मुलगा सूरजबरोबर दुचाकीवर येत होत्या. पेमगिरी व नांदुरी शिवालगत डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या … Read more

Breaking : स्कॉडा कार पलटी होवून अपघातात महिला ठार, चार जखमी

अहमदनगर :- औरंगाबादहून पुण्याकडे जात असलेल्या स्कॉडा गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉडा वेगाने पलटी होवून अपघाताची घटना घडली. हा अपघात जेऊर परिसरात लीगाडे वस्तीजवळ झाला. यात एक महिला जागीच ठार झाली तर चार जण जखमी झाले आहेत. लता दत्तात्रय ठाकूर (वय-60), रा. पुणे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

अहमदनगर ब्रेकिंग : जावयाला मैत्रिणीसोबत पकडल्याने सासू, सासर्याने केली बेदम मारहाण !

अहमदनगर : पतीला मैत्रिणीसोबत पकडल्यानंतर पत्नी, सासू व सासऱ्याने त्याची चांगलीच धुलाई केली आहे. ही घटना भिंगार येथील खळेवाडी परिसरात घडली.  याप्रकरणी संबंधिताने पत्नी, सासू, सासऱ्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी पतीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.याबाबत सविस्तर असे की, या घटनेतील पती पत्नी हे दोघेही भिंगारमध्ये राहतात. संबंधित महिलेचे … Read more

बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे आरोपी

अहमदनगर :- रस्त्याच्या कामावरून महानगरपालिकेतील शहर अभियंत्याच्या अंगावर बूट फेकल्याच्या गुन्ह्यात आणखी सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. आता या गुन्ह्यात 18 आरोपी झाले आहेत. शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह आणखी सहा जणांचा समावेश करण्यात आला. पोलिस … Read more

…तर विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू : अनुराधा नागवडे

श्रीगोंदा :- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवारी दिल्यास विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू. शरद पवार जेव्हा सांगतील, त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू, असे जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी बुधवारी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाल्या, पिण्याच्या पाण्यासाठी कुकडीचे आवर्तन सुटले आहे. मात्र, त्यातून संपूर्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्राईम पेट्रोल पाहून तिने प्रियकराचा बदला घेण्यासाठी केला त्याच्यावर ॲसिड हल्ला !

अहमदनगर :- प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये प्रेमप्रकरणातून युवकावर ॲसिड हल्ल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती.ह्या घटनेचा उलगडा आज झाला आहे प्रेमदान चौकातील ॲसिड हल्ला प्रकरणात संशयित म्हणून पकडलेल्या युवतीने हल्ला केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान आज सायंकाळी पोलिसांनी तिला अटक केली असून क्राइम पेट्रोल ही टीव्ही सीरिअल पाहून हे कृत्य केल्याचे तिने कबूल केले. अमीर … Read more

धक्कादायक : पित्याने नव्हे तर नराधम पतीनेच तिला अंगावर पेट्रोल ओतून मारले ? पारनेर तालुक्यातील निघोज प्रकरणाला वेगळेच वळण…

अहमदनगर :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलींग प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे.  अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानीया, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन … Read more

पालकमंत्री राम शिंदेनी घेतला पवारांचा धसका,विधानसभेची तयारी सुरु !

जामखेड प्रतिनिधी :-शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेनंतर आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अवधी असतानाच पालकमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. याचे कारण म्हणजे कर्जत, जामखेड तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने शरद पवार यांचे नातू … Read more

दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीर पणे उभे – पालकमंत्री राम शिंदे

कर्जत : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता मंत्र्यांचे  दुष्काळी दौरे सुरु झाले आहेत . पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर, श्रीगोंदा, कर्जत आणि  जामखेड या तालुक्यात दुष्काळी दौरा केला.  ‘दुष्काळात कोणत्याही प्रकारे उपायोजना करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही. पिण्याचे पाणी, तसेच पशूधन वाचवण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. टंचाईची स्थिती असली, तरी काळजी … Read more

लग्न करण्याच्या वादातून चक्क तिने प्रियकरावरच केला ॲसिड हल्ला!

अहमदनगर : आपण युवकाने युवती वर ॲसिड हल्ला केल्याचे बऱ्याच वेळा ऐकले असेल. पण नगर मध्ये मात्र युवतीने युवकावर ॲसिड फेकण्याची घटना घडली.  नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये युवकावर ॲसिड हल्ल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.  बुरखाधारी व्यक्तीने हा हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार … Read more

विवाहितेवर अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी!

कर्जत :माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कर्जत तालुक्यात घडली . एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली . या प्रकरणी महेश राजेंद्र धांडे (रा. धांडेवस्ती, कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अत्याचारानंतर जातीवाचक शिवीगाळ करून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही … Read more

पारनेर मध्ये “सैराट”, मुलीसह जावयाला पेटवलं

पारनेर : आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. यात मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली. त्यामुळे तिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ही घटना निघोज येथे घडली. निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग … Read more

आ. शिवाजी कर्डिले यांच्या पुत्राविरुद्ध शिवसेना आक्रमक

नगर : भारतात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु आहे. तथापि, नगर शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय अनाधिकृत फलक लावण्यात आले आहेत. असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. भारतात लोकसभा निवडणूक २०१९ मुळे आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू आहे. तथापि,  आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे … Read more

बूट फेक प्रकरणी अनिल राठोड व नगरसेवकांच्या जामिनावर उद्या सुनावणी

नगर: महापालिकेतील शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी नगरसेवक अशोक बडे व मदन आढाव यांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींनी मात्र न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती अर्ज सादर केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. बोल्हेगाव उपनगरातील रस्त्याचे काम बंद … Read more

मेव्हाण्यांणीच केला ‘त्या’ तरुणाचा खून

संगमनेर : वडझरी खुर्द येथील दगड खाणीत खून करुन टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आणि खुनाची उकल करण्यात पोलिसांना तीन दिवसांनंतर यश आले. दोघा मेव्हण्यांनीच खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. सुभाष शांताराम काळे (३५, मालुंजकर चौफुली, सुकेवाडी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सख्खा मेव्हणा अमर शिवाजी हासे (२०) आणि चुलत मेव्हणा … Read more

शरद पवारांचा दुसरे नातू विधानसभेच्या आखाड्यात !

पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून, अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. पवार कुटुंबातील असल्याने मोठं राजकीय वलय त्यांना आहे. … Read more

पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न

निघोज : पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली. पती-पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात असून गंभीर जखमी आहेत.  निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय १९) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे … Read more

अवैधरित्या पाणी उपसा करणारे कृषिपंप जप्त

संगमनेर : तालुक्यातील आंबीदुमाला येथील कोटमारा धरणातून अवैधरित्या पाणीउपसा सुरूच आहे. शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात मोहीम हाती घेत धरणात टाकण्यात आलेले शेतीचे वीजपंप ताब्यात घेतले. संगमनेर तालुक्यातील आंबी-दुमाला येथील कोटमारा धरणातून शेतीसाठी होणारा अवैध्य पाणी उपसा थांबवावा अशी मागणी बोटा येथील युवकांनी केली होती. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी साठ्याने तळ … Read more