अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत दोघे ठार ! संपूर्ण गावावर शोककळा

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नगर- सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री शिवारात ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील बाळासाहेब बोरुडे (वय ५५) व बबन तरटे (वय-६०), रा. घोगरगाव हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात ३१ जानेवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, घोगरगाव येथील रहिवासी असलेले वरील दोघे नगरला कामानिमित्त गेले होते. सायंकाळी चारच्या सुमारास … Read more

Ahmednagar Breaking : शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला अहमदनगरमधून घेतले ताब्यात ! संगमनेरात फिल्मीस्टाईल थरार..

पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरण राज्यात गाजले. त्या खुनाचा थरार सीसीटीव्हीतही कैद झाला होता. भरदिवसा गोळ्या घालून जवळच्या माणसांनीच त्याचा खून केला होता. दरम्यान पोलिसांनी यातील काही आरोपींना ताब्यातही घेतले होते. परंतु यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे अद्यापही बाहेरच होता. परंतु आता पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. शरद मोहोळ … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री विखेंच्या घराजवळ बिबट्याचा धुमाकूळ ! ‘येथे’ शंभर बिबटे तरी असतील..लोक भयभीत..

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याचे वास्तव्य दिसते. मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण असते. त्यात लोणीमध्ये व सादतपूर मध्ये बिबट्याने हल्ले करून मुलांचा जीव घेतल्याच्या घटना ताजा आहेत. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावातील निवास्थानाजवळ बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने येथे दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. … Read more

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बॅंकेने पतसंस्थांना कॅश‌ क्रेडिट सुविधा द्यावी, अहमदनगरमधील शिष्टमंडळ सहकार मंत्र्यांच्या भेटीला

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ टिकणे फार गरजेचे आहे. आर्थिक सुस्थितीतील पतसंस्थांना ताळेबंदाच्या आधारावर जिल्हा सहकारी बॅंकेमार्फत कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध करून दिल्यास यामध्ये मोठा फरक पडू शकतो. हीच मागणी घेऊन व यास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व शिष्टमंडळाने सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांची भेट … Read more

विषबाधा झाल्याने १७० मेंढ्या मृत्युमुखी, अहंदनगरमधील धनगर बांधवांवर संकटांचा डोंगर

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील धनगर मेंढपाळ संतोष काळूराम बरकडे यांच्या १७० मेंढ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्या दगावल्याची घटना मंगळवारी (दि.३० जानेवारी) दुपारी घडली. या घटनेत या शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील संतोष काळूराम बरकडे हे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात भटकंती करत मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. तेथे मंगळवारी दुपारी १७० … Read more

पारनेर तालुक्यातील ‘ह्या’ रस्त्यांसाठी २५ कोटी मंजूर – आ. निलेश लंके

राज्य शासनाच्या नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील ३६ गावांमधील १०५ किलोमिटर अंतराच्या रस्त्यांसाठी २५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली. विविध गावांमधील शेतकऱ्यांकडून शिव पाणंद रस्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत … Read more

डाळ साखरेपेक्षा विकासकामे जनतेला फायदेशीर, मी १७०० कोटींची कामे केली – आ.नीलेश लंके

आजपर्यंत पारनेरमधील जनतेसाठी १ हजार ७०० कोटी रुपयांची विकासकामे दिली. निघोजसाठी सर्वाधिक ७० कोटी ११ लाखांची विकासकामे दिली. डाळ साखर वाटप करण्यापेक्षा जनतेसाठी विकासकामे नक्कीच फायदेशीर असतात अशी टिप्पणी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत आ.नीलेश लंके यांनी केली. मंगळवार (दि.३०) सायंकाळी सात वाजता निघोज परिसरातील २० कोटी ५१ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. नीलेश लंके … Read more

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची पोलखोल केल्यामुळे सरकारचे पितळ उघडे !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थित आयोजित जनाधिकार जनता दरबारात काल मंगळवारी (दि.३०) नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या, प्रश्न सुटल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटल्याचे दिसले. यावेळी ना. दानवे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची पोलखोल केल्यामुळे सरकारचे पितळ उघडे पडले. येथे आयोजित जनाधिकार जनता दरबारात काल मंगळवारी (दि. ३०) ४९३ अर्ज प्राप्त झाले. तर २१५ … Read more

Kopargaon News : कोपरगावात सकल हिंदू समाजाचा मोर्चा तेढ निर्माण करणारे तडीपार करण्याची मागणी; हाणामारीचे उमटले पडसाद

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर तडीपारची कारवाई करण्याची मागणी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. काल मंगळवारी (दि.३०) सकाळी मोर्चा काढुन याबाबत तहसीलदार व शहर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रजासत्ताक दिनी लहान मुलांच्या भांडणावरून झालेल्या हाणामारीचे तीव्र पडसाद कोपरगावात उमटले. शहरातील गांधीनगर भागातील त्या भागातील अनेक घरावर रात्री-अपरात्री दगडफेक करून दहशत निर्माण करणे, … Read more

राजकारण म्हणजे केवळ मतांची गोळाबेरीज नाही तर ती एक समाजसेवा – प्रतापराव ढाकणे

विकासकामे करताना आम्ही जात, पंथ, धर्म व मतांची टक्केवारी पाहत नाही. ही शिकवण आमची आहे. गेल्या पाच वर्षांत प्रभावती ढाकणे यांनी भालगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न केले. प्रत्येक गाव, वाडी, वस्तीला विकास निधी दिला. येळी ग्रामपंचायतला विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅड. प्रतापराव … Read more

Pikvima : बाजरी, मूग व कांदा उत्पादकांना विम्याचा लाभ द्या

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२०२४ च्या खरीप हंगामामधील सोयाबीन व मका, या पिकांना ज्या प्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अग्रीम रक्कम देण्यात आली, त्याचप्रमाणे बाजरी, मूग व कांदा, पीकउत्पादक शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील बाजरी, मूग व कांदा, या … Read more

तरुणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे आले पाहिजे – विवेक कोल्हे

आपल्याकडे उद्योग क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. उपलब्ध संधीचा लाभ घेत ग्रामीण भागातील तरुणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन कॉलेजच्या विकास समितीचे युवा सदस्य सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. येथील सद्गुरु गंगागीर कॉलेज मध्ये यशस्वी उद्योजक कसे व्हावे, या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते … Read more

Shirdi Airport Flights: शिर्डी विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढणार ! हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूसाठी पसंती

Shirdi Airport Flights

Shirdi Airport Flights : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करून आता १० महिने झाले तरी, परंतु वेळापत्रक आले नसल्याने तुर्तास धावपट्टीची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र आता हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूसाठी प्रत्येकी एक अशा अधिकच्या तीन विमानांच्या फेऱ्या एप्रिल महिन्यात वाढणार असून दिवसा ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या १८ … Read more

भाजपच्या महिला मोर्चाची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर ! ६ उपाध्यक्षा, ५ सरचिटणीस, १० सचिवांसह ४३ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात यांनी मंगळवारी (दि. ३०) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत ६ उपाध्यक्षा, ५ सरचिटणीस, १० सचिवांसह ४३ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षा-अश्विनी थोरात, उपाध्यक्ष मंगलताई ज्ञानदेव निमसे, रोहिणीताई अनिल फालके, मंगलताई हरिभाऊ कोकाटे, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्याच्या घराची झाडाझडती ! २८ लाखांची रोकड सापडली

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर कार्यालयातील वजन मापे निरीक्षक (वर्ग २) अशोक श्रीपती गायकवाड यांना विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्या पुणे येथील सिंहगड रोडवरील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (अॅन्टी करप्शन) पथकाने मंगळवारी (दि.३०) झाडाझडती केली. या झडतीत गायकवाड यांच्या घरी २८ लाख ५० हजार … Read more

Ahmednagar News : जीवघेण्या उसवाहतुकीचा हट्ट प्रवाशांच्या जीवाशी करतोय खेळ

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने अनेक महिने ऊसतोड सुरु असते. परंतु ही ऊसतोड सुरु असताना जी उसवाहतूक केली जाते ती मोठी समस्या सध्या नगरवासीयांसाठी बनली आहे. उसवाहतुकीसाठी अनेक नियम आहेत. वजनाचेही लिमिट आहे. परंतु उसवाहतूक करताना अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे वास्तव चित्र आहे. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वाहतूक … Read more

Ahmednagar News : मोठी बातमी ! नगर अर्बनच्या आरोपी संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या अनेकांची धरपकड सुरु आहे. यामध्ये आता आरोपी असणाऱ्या माजी संचालकांचाही समावेश आहे. तीन माजी संचालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता नगर अर्बनच्या आरोपी संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यातून येणाऱ्या पैशांतून ठेवी परत करण्यात येतील असेही समजत … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो पाणी जपून वापरा ! मुळा, भंडारदरात ‘इतकाच’ राहिला पाणीसाठा

अहमदनगर जिल्ह्यासाठी भंडारदरा, मुळा ही धरणे जीवनदायिनी आहेत. शेती असो की पिण्याचे पाणी सर्वच गरजा ही धरणे पूर्ण करत असतात. परंतु यंदा पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कारण या धरणामध्ये सध्या पाणीसाठा बराच कमी झाला आहे. अहमदनगरमध्ये यंदा कमी पाऊस पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यावरच सध्या सगळी भिस्त आहे. तसेच कमी पवासने धरणामध्येही पाणी कमीच होते. धरणांतील … Read more