Ahmednagar Breaking : शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला अहमदनगरमधून घेतले ताब्यात ! संगमनेरात फिल्मीस्टाईल थरार..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरण राज्यात गाजले. त्या खुनाचा थरार सीसीटीव्हीतही कैद झाला होता. भरदिवसा गोळ्या घालून जवळच्या माणसांनीच त्याचा खून केला होता. दरम्यान पोलिसांनी यातील काही आरोपींना ताब्यातही घेतले होते. परंतु यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे अद्यापही बाहेरच होता.

परंतु आता पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि कुख्यात गुंड गणेश मारणेला संगमनेर परिसरातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तो ओला-उबेर गाडीतून जात असतानाच पोलिसांनी आपली कार्यवाही केली.

गणेश मारणेचा पाठलाग करून अगदी फिल्मी स्टाईल शोभेल असा थरार करत त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभर गाजलेल्या शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केलेली असून गणेश मारणे हा मात्र मागील काही दिवसांपासून पसार होता.

गुन्हे शाखेचे पोलिस त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठलागावरच होते. नाशिक या ठिकाणावरून पोलिसांनी मारणे याचा पाठलाग सुरू केला होता. पोलिसांनी 3 वेगवेगळी पथके मारणे याच्या पाठलागावर आली. अखेर त्याला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह इतर साथीदारांना पकडलं आहे.

या हत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळेल? :- आतापर्यंत या खून प्रकरणातील मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी समजला जात होता. परंतु पुढे पोलिसांच्या तपासात विविध गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे आता इतरही अनेकजण पोलिसांच्या रडारवर आले असून पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी गणेश मारणे याला अटक केली असल्याने आता या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पूर्वी तब्बल 24 आरोपी अटकेत :- शरद मोहोळ हत्येप्रकरणी 24 जण अटकेत आहेत. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके आदींसह अनेकांना अटक केलेली आहे. शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशीच त्याची हत्या करण्यात आली होती. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.