अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत दोघे ठार ! संपूर्ण गावावर शोककळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Braking : नगर- सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री शिवारात ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील बाळासाहेब बोरुडे (वय ५५) व बबन तरटे (वय-६०), रा. घोगरगाव हे दोघे जागीच ठार झाले.

हा अपघात ३१ जानेवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, घोगरगाव येथील रहिवासी असलेले वरील दोघे नगरला कामानिमित्त गेले होते.

सायंकाळी चारच्या सुमारास नगरहुन घोगरगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीस जोराची धडक दिली. धडक जोराची बसल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी श्रीगोंदा पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले. दोघांचे मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या अपघाताची माहिती समजताच संपूर्ण घोगरगाव गावावर शोककळा पसरली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सरू होते.