पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 2 योजना गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार जबरदस्त परतावा, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : अनेकजण आपल्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याच्या तयारीत असतात. काहीजण बँकेच्या FD योजनेत गुंतवणूक करतात तर काही लोक पोस्ट ऑफिस आणि एलआयसी मार्फत चालवल्या जाणाऱ्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात.

दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे.

कारण की, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा दोन योजनांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगल व्याज मिळणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजे SCSS आणि पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्किन म्हणजेच MIS योजनेबाबत माहिती पाहणार आहोत.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम : पोस्ट ऑफिसने सुरू केलेली ही बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत 60 वर्षांपेक्षा अधिकचे वय असणाऱ्या नागरिकांना गुंतवणूक करता येते. ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक शासकीय योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की यामध्ये किमान एक हजार रुपये आणि कमाल 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते. म्हणजेच गुंतवणूकदाराला तीस लाख रुपयांपेक्षा जास्तीचा पैसा यामध्ये गुंतवता येत नाही. तसेच एक हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येत नाही. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 8.2% या व्याजदराने व्याज दिले जात आहे. विशेष म्हणजे ही एक टॅक्स सेविंग स्कीम आहे. भारतीय आयकर विभागाच्या प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत योजनेत गुंतवलेल्या रकमेवर गुंतवणूकदारांना टॅक्स सूट मिळते.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम : ही देखील एक शासकीय योजना आहे. या योजनेत गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे. ही योजना देखील पाच वर्षांसाठी आहे. या योजनेअंतर्गत सिंगल आणि जॉईंट अकाउंट ओपन करता येते. सिंगल अकाउंट ओपन केल्यास गुंतवणूकदारांना नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट ओपन केल्यास गुंतवणूकदारांना 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 7.4% या व्याजदराने व्याज दिले जात आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत सिंगल अकाउंट ओपन करून नऊ लाख रुपये गुंतवले तर त्याला 5 हजार 550 रुपये मासिक व्याज मिळते. तसेच जर एखाद्याने या योजनेत जॉईंट अकाउंट ओपन करून 15 लाख रुपये गुंतवलेत तर त्याला 9 हजार 250 रुपये व्याज मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe