Ahmednagar News : नातेवाईकाकडे लपून बसला होता नगर अर्बनचा माजी अध्यक्ष कटारिया, पोलिसांनी जेरबंद केलाच..३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतील कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (वय ७२ रा. बाजारपेठ, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) याला सोमवारी पहाटे अटक केली. आळेफाटा (पुणे) येथून त्याला अटक केली. तो नातेवाईकाकडे लपून बसला असताना पोलिसांनी कारवाई केली. ३ फेब्रुवारीपर्यंत कटारियाला पोलीस कोठडीत ठेवण्याचे … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हे’ पहिलं गाव, सिलेंडर नव्हे पाइपलाइनद्वारे गॅस देण्यास सुरुवात

Ahmednagar News :  एलपीजी गॅस सिलेंडर जेव्हा गॅस टाकी मधून गावागावात आले होते त्यावेळी क्रांती झाली होती. सिलेंडर मिळण्यासाठी फार अडचणी यायच्या. आता श्रीगोंदा शहरात पाईपलाईन मधून घरापर्यंत पीएनजी गॅस मिळणार आहे. ही मोठी क्रांती आहे. या प्रकल्पाला प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी श्रीगोंदा शहरात पीएनजी गॅसचा प्रारंभ करताना सांगितले. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पहिले म्युझिकल फाऊंटन सुरु, ‘येथे’ होणार दुसरे म्युझिकल उद्यान

Ahmednagar News : अहमदनगर शहर झपाट्याने विकासाकडे वाटचाल करत आहे. नगर शहरात अलीकडलील काळात विविध विकासकामे केली जात आहेत. दरम्यान शहरात दोन म्युझिकल फाउंटन मंजूर झाले असल्याची माहीत आ. संग्राम जगताप यांनी दिली आहे. यातील एक बुरुडगाव रोड येथील साईनगर गार्डनमध्ये म्युझिकल फाउंटन बसवले आहे. आता लवकरच दुसरा म्युझिकल उद्यान सावेडी परिसरातील गंगा उद्यान येथे … Read more

विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार – राज्यपाल रमेश बैस

Ahmednagar News

Ahmednagar News : सन 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नातून व या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषि पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला. महात्मा फुले कृषि विद्यापीठात 37 व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी स्नातकांना राज्यपाल … Read more

Ahmednagar Politics : लोढा हाईट्सचा ताबा सोडवा.. खा. राऊतांनी ताबेमारीवरून झटकताच नगर राष्ट्रवादीकडूनही पलटवार, म्हणाले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर शहरात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ताबेमारी, गुंड शाही आदी गोष्टींचा उल्लेख करत आ. संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता टीका केली. आता याला राष्ट्रवादीकडूनही उत्तर देण्यात आले आहे. नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्सवर तुमच्या … Read more

बिग ब्रेकिंग : नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात !

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी पोलीस आता धडक कारवाई करत आहेत. या प्रकरणी आधीच चौघे अटकेत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही या प्रकरणी मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर) यांना … Read more

Ahmednagar News : ‘पाणी द्या, मते घ्या’ ! शेतकऱ्यांचा थेट मंत्री राधाकृष्ण विखेंशीच सौदा

Ahmednagar News :  शेवगाव तालुक्यातील वरूर-आखेगावसह इतर गावांमधील पाझर तलाव, बंधारे भरून द्यावेत अशी मागणी येथील शेतकरी अनेक दिवसांपासुन करत आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखे यांचीच भेट घेतली. वरूर आखेगावसह ९ गावांतील ग्रामस्थांनी ‘मोटार सायकल पाणी यात्रा’ काढून ‘पाणी द्या, मते घ्या’ अशी मागणी करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली. त्यावर … Read more

Ahmednagar News : शिल्पा शेट्टी शनी चरणी लिन ! चौथऱ्यावर जात शनिदेवास तैलाभिषेक

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनिदेवांचा महिमा अगाध आहे. त्यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. नेते मंडळी, अभिनेते येथे दर्शनासाठी रांग लावत असतात. काल रविवारी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने शनिशिंगणापूर येथे येत शनिदर्शन घेतले. अभिनेत्री शनी चरणी लिन झाल्याचे पाहायला मिळाले. शिल्पा शेट्टी हिने चौथऱ्यावर जावून शनिदेवास तेलाभिषेक केला. देवस्थान कार्यालयात … Read more

Ahmednagar Politics : नगरची अवस्था बिहारसारखी, नगरच्या आमदारांवर ताबेमारी, गुंडगिरीचा आरोप

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी नगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, नगरची राजकीय, सामाजिक व्यवस्था बिघडली आहे. नागरिक प्रचंड दहशतीखाली जगत आहे. नगरची अवस्था बिहारसारखी दिसते. येथील आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी … Read more

आरक्षण देण्याचा शब्द सरकारने पाळला – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षण देण्याचा प्रश्न प्रलंबित होता, तो आरक्षणाचा प्रश्न राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सोडवण्यात आला असून, महायुतीच्या सरकारने आतापर्यंत सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचे तंतोतंत पालन केले असून, राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी हिताचे असल्याचे … Read more

Ahmednagar News : पोलिसांना आरोपीकडून चिरडण्याचा प्रयत्न ! जीवघेणा थरार

आरोपींची मुजोरी, दहशत अहमदनगर जिल्ह्यात किती वाढली आहे याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना घडली. आरोपीकडूनच पोलिसांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पकडण्यासाठी गेलेल्या आरोपीकडूनच हा प्रयत्न झाला. सागर रमेश कर्डिले असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर (वय ३५) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी : … Read more

मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून नगर तालुक्याच्या विकासासाठी सव्वा कोटीचा निधी !

Ahmednagar News

Ahmednagar News : विकासात्मक भूमिका घेऊन शिवसेना वाटचाल करत आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन राज्यकारभार चालवला जात आहे. मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. त्यातून विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली. तर भुमरे यांनी नगर तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचे शिवसेनेचे … Read more

Ahmednagar Crime : बनावट सोने देऊन आठ लाखांची फसवणूक ! तिघांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : जामखेड शहरातील एका कापड व्यावसायिकाची बनावट सोने देत आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गणेश महादेव खेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी खेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे जामखेड शहरात भाजप पक्ष कार्यालयाशेजारी कापड दुकान आहे. कापड दुकानामध्ये सुमारे एक … Read more

Pathardi News : खरेदी – विक्री संघावर आ. मोनिका राजळेंचे पुन्हा वर्चस्व

Ahmednagar News

Pathardi News : पाथर्डी खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत सतरापैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या दहा जागा निवडून आल्या आहेत. पिंळगाव टप्पा येथील बाळु रावसाहेब शिरसाट हे पराभूत झाले. त्यांना अवघ्या दहा मतांवर समाधान मानावे लागले. तरीही शिरसाट यांनी निवडणूक लढविली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत ! पंधरा दिवसात तीन बालकांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला असून गेल्या पंधरा दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन लहान बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी ऊसतोड कामगारांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. उसाचे क्षेत्र मोठे असून उसाचे शेत हे बिबट्यांचे अधिवास बनलेले आहे. … Read more

Ahnednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात दोन गटांत राडा, दांडे, चाकू, तलवारीचा वापर,पाच जखमी

Ahnednagar News

Ahnednagar News : दोन गटात तुफान राडा झाल्याचे वृत्त आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कपरगाव येथे दोन गटात तुफान राडा झाला. या भांडणात दांडे, चाकू, तलवारीचा वापर करण्यात आला. शहरात तणाव निर्माण झाला होता. लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरु झालेला वाद दांडे, चाकू, तलवारी पर्यंत गेला. यामध्ये पाच जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. कोपरगाव शहरातील … Read more

महसूलमंत्री विखे, थोरातांच्या कारखान्यांना ‘अशोक’ च्या शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये !

Ahmednagar News

Ahmednagar News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे श्रीरामपूर तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात तसेच उसाच्यावाढीसाठी कोणतेही योगदान नाही. त्यामुळे ‘अशोक’च्या सभासद शेतकऱ्यांनी प्रवरा व संगमनेर कारखान्यास ऊस न देता आपल्या भागाची कामधेनू असणाऱ्या अशोक कारखान्यासच ऊस पुरवावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. मुरकुटे यांनी पत्रकात म्हटले, की … Read more

Ahmednagar Breaking: अहमदनगरमध्ये भीषण अपघात, कंटेनरने दुचाकीला चिरडले ! आई वडील बहीण भावाचा मृत्यू

Ahmednagar Breaking : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी (दि. २८) कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले सर्वजण पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील रहिवासी आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजी … Read more