बिग ब्रेकिंग : नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी पोलीस आता धडक कारवाई करत आहेत. या प्रकरणी आधीच चौघे अटकेत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही या प्रकरणी मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे.

बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर) यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केल्याची माहिती मिळाली आहे. आज सोमवारी पहाटेच्या दरम्यान ही कारवाई केली.

माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी या दोघांना नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानंतर आता माजी संचालकांकडे आपले लक्ष वळल्याचे दिसते.

बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आल्यानंतर आता तीन माजी संचालक अटक झालेत. हा २९२ कोटींचा घोटाळा असून, यामध्ये शंभरहून अधिक आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी एसआयटी देखील स्थापन केली असून पोलिसांनी तत्कालीन अध्यक्ष व संचालकांवर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे आता माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली असून यातील काही आरोपी फरार झाले आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानेयाचे फॉरेन्सिक ऑडिट केले गेले होते. त्यानंतर घोटाळ्यात कोणाचा कसा सहभाग आहे हे स्पष्ट झाले असल्याने तपासला आता वेग आला आहे. या माहितीच्या आधारे पोलीस कारवाई होत असून इतरही काही लोकांना अटक केली जाऊ शकते असे भाकीत वर्तवण्यात येत आहे.