Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदी प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती

Bhanudas Berad

प्रदेश भाजपच्या महाविजय-२०२४, या अभियानात अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली असून, नियुक्तीचे पत्र प्रा. बेरड यांना पाठवले आहे. तीन राज्यांतील निवडणूक यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी … Read more

Milk Price Issue : दुग्ध व्यवसाय अडचणीत ! शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे, का लागली दुग्ध व्यवसायाला घरघर ?

Milk Price Issue

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात शेतीपुरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला … Read more

दुधाला पाच रुपये अनुदान, पण लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? सर्वानाच लाभ नाही मिळणार? पहा सविस्तर

Milk Price

गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची घोषणा नुकतीच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (२० डिसेंबर) विधानसभेत केली आहे. त्यामुळे आता दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. पाठीमागेच राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर द्यावा असे आदेश दिले असतानाही बऱ्याच ठिकाणी दूध संघ दर २७ ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन वेगवेगळ्या अपघातात तरुणासह विवाहितेचा मृत्यू

Accident

दाढ बुद्रक ते कोल्हार रस्त्यावर मागील दोन दिवसांत झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी अपघातात एका ३२ वर्षीय तरुणाने तर एका ३१ वर्षीय विवाहित महिलेने जीव गमावला आहे. या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे एक अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याने हे गतिरोधक मृत्यूचे यमदूत आहेत का?, असा प्रश्न या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना भेडसावत आहे. संदीप भाऊसाहेब वाणी (वय … Read more

मुंबई-पुणे महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी आज ब्लॉक !

Ahmednagar News

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत पुणे वाहिनीवर मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गुरुवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने … Read more

Ahmednagar News : अधिकाऱ्याच्या मुलीचे लग्न, चोरटयांनी भरदुपारी मंगलकार्यालयातून दागिण्यासह रोकड लांबवली

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरात चोरट्यांचे प्रताप वाढत आहेत. आता थेट मंगलकार्यालयातून चोरटयांनी हात साफ करत दागिने व रोकड लांबवली आहे. सावेडी उपनगरातील बंधन लॉन्स येथून मुलीला लग्नात देण्यासाठी सासूने केलेले सोन्याचे गंठण, मंगळसूत्र तसेच रोकड असा 58 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रविवारी (दि.17) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. मुलीचे वडिल … Read more

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळा गाजणार, बडे राजकारणी अडकणार ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे देवस्थान अत्यंत पवित्र. देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. शनिदेवांचा महिमा आघात आहे. दरम्यान या देवस्थानच्या विश्वस्तांनी विविध घोटाळे घातले असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. त्यामुळे या देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली आहे. विशेषसा म्हणजे शिर्डी आणि पंढरपूर येथे जो … Read more

Shirdi News : सात दिवसांनी सापडलेल्या वडिलांना पाहून मुलाचे अश्रू अनावर !

Shirdi News

Shirdi News :  शिर्डीतून काही दिवसांपूर्वी हरवलेल्या वयोवृद्ध वडिलांच्या शोधात सैरावैरा फिरणारा ओरिसा येथील युवक रोज वडील पुन्हा भेटावे, यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करत होता. अखेर सातव्या दिवशी एक पत्रकार व रिक्षाचालकाच्या प्रयत्नाने ते सापडतात आणि दोघांच्याही अश्रुंचा बांध फुटतो. हा प्रकार नुकताच शिर्डी येथे घडला. पत्रकार व रिक्षा चालकाच्या माध्यमातून आम्हाला देवदूतच भेटले असल्याची भावना … Read more

अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित गावातील सरपंचासह शेतकरी करणार उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, पढेगाव, भेर्डापूर, मालुंजा व भामाठाण परिसरातील २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकरी गावातील सरपंचांसह मंगळवार (ता. २६) डिसेंबरपासून शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसील कार्यालयसमोर उपोषण करणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने काल मंगळवारी (ता.१९) तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांनी … Read more

Sangamner News : कारच्या अपघातात पाच जण बचावले ! कार विजेच्या सिमेंट खांबाला…

Sangamner News

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर वेगाने जाणारी इर्टीगा कार विजेच्या सिमेंट खांबाला धडकून अपघात झाला. तळेगाव दिघे गावा दरम्यान काल मंगळवारी (दि.१९) सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. शनिशिंगणापूर येथून शनिदेवाचे दर्शन घेऊन हे पाच भाविक इर्टीका कारगाडीतून घराकडे परतत होते. दरम्यान झालेल्या या … Read more

पाथर्डीत वधु-वर सुचक मेळाव्याचे आयोजन

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने २४ डिसेंबर २०२३ रोजी येथील विठोबाराजे मंगल कार्यालयात वधु- वर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, युवक, युवती व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने राज्याचे प्रदुषण निर्मुलन संचालक दिलीपराव खेडकर यांनी केले आहे. क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खेडकर … Read more

पाईपलाईनच्या कामात डुप्लिकेट पाईपचा वापर ! शासनाचा मोठा निधी वाया जाणार

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी – तिसगाव प्रादेशिक नळयोजनेच्या नवीन पाईपलाईनचे काम सध्या सुरू असून, संबंधित योजनेच्या कामासाठी काही ठिकाणी आयएसआय ट्रेड मार्क असलेले पाईप वापरले जात आहेत तर काही ठिकाणी आयएसआय ट्रेडमार्क नसलेले वेल्डींगने जॉईंट केलेले पाईप वापरले जात असून, या मुख्य पाईपलाईनसाठी ठेकेदाराकडून काही ठिकाणी डुप्लिकेट पाईपचा वापर … Read more

अहमदनगरचे ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ नामांतरणाबाबत सरकार किती गंभीर? केवळ मलमपट्टीच आहे का?

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अहमदनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. अनेक संघटना हे नाव बदलावे अशी मागणी करत आहे. अहमदनगर हे नाव बदलून काय नाव असावे यासाठी अनेक नवे समोर आली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरमध्ये येत एका सभेत अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करू असे सांगितले. तेव्हापासून … Read more

Nilesh Lanke :पारनेर नगर मतदारसंघातील पशुवैद्यकीय दवाखान्याला मंजुरी !

Nilesh Lanke

Nilesh Lanke : पारनेर-नगर मतदारसंघातील निमगाव वाघा, ता. नगर येथे खास बाब म्हणून पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजुरी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना दिली. यासंदर्भात आ. नीलेश लंके यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निमगाव वाघा येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यासंदर्भात निवेदन सादर … Read more

पत्रकारांचे विविध प्रश्न सरकारने तातडीने मार्गी लावावे : आमदार सत्यजित तांबे

MLA Satyajit Tambe

लोकशाही मधील पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य विषयक, याचबरोबर वेतन, मानधनासह अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांनी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र त्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसून तातडीने याबाबत बैठक घेऊन पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावावी, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या … Read more

प्रवरा नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह

Ahmednagar News

कोल्हार-भगवतीपूर परिसरात प्रवरा नदीपत्रात सोमवारी एक अनोळखी मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचे वय ६० ते ६५ असून त्याचा मृतदेह पाण्यात वाहून तरंगताना आढळून आला. यामागे घातपात आहे की काय, याची शहानिशा लोणी पोलीस करीत आहेत. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हारच्या भगवतीपूर हद्दीत वसंत नानासाहेब खर्डे यांच्या शेतीलगत असलेल्या कोल्हापूर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ मंदिरातील चोरीची उकल !

Ahmednagar News

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांचे गुन्हे उघडकीस आणून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मद्देमाल जप्त करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. दि. २ डिसेंबर २०२३ रोजी पिंपळगाव माळवी ता., जि. अहमदनगर येथील श्री. संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या डोक्यातील मुकुट व रुक्मिणीच्या गळ्यातील मणीमंगळ सुत्रातील … Read more

निळवंडेचा कालवा फोडण्याचा प्रयत्न ! शेतीपिकांचे नुकसान ; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Nilwande Dam

निळवंडे जलाशयातून डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनामुळे कालव्याच्या लगत असणाऱ्या निळवंडे ते कळस या सर्व गावात कालव्यांचा पाझर अती प्रमाणात झाल्यामुळे शेकडो हेक्टर शेती नापीक झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान अती प्रमाणात झाले आहे, त्यामुळे निळवंडे कालव्याचे पाणी त्वरीत बंद करा. या मागणीसाठी काल जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुनीता भांगरे व जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे … Read more