अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या २४ तासात जेरबंद !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : एमआयडीसी परिसरात गुरुवारी (दि.७) सकाळी उघडकीस आलेल्या परप्रांतीय कामगाराच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या चोवीस तासांत यश आले असून, खून करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी तपोवन रोडवर पाठलाग करुन पकडले आहे. विश्वास नामदेव गायकवाड (वय २४, रा. श्रीस्टाईल चौक, एमआयडीसी), अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट (वय २३, रा. पिंपळगाव कौडा ता.नगर), … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण लवकरच होणार शंभर वर्षांचं ! असा झाला होता भंडारदरा धरणाचा जन्म…

Bhandardara Dam

Bhandardara Dam : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेषा असलेले भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत चालले असून घरणाला आज ९७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अकोलेच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रवाईच्या डोंगरातून ऊगम पावणाऱ्या अमृतवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या प्रवरा नदीवर सन १९१० ते १९२६ या दरम्यान ब्रिटीशांनी शेंडी गावाजवळ दोन टेकड्या अडवुन प्रवरेचा खळखळ वाहणारा प्रवाह अडवला आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उसाचा ट्रक उलटल्याने महिलेचा मृत्यू

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावानजिक उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे रस्त्यालगत चाललेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाल्याची घटना काल शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की उसाने भरलेला १० टायर ट्रक (एमएच १२ एचसी ९६६६) श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे ६ वाजण्याच्या सुमारास जात होता. खंडाळ्यातील … Read more

नवीन वर्षात दुसरी दिवाळी साजरी करा ! खासदार सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं…

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामे सातत्याने सुरू आहेत. मागील दीड वर्षाच्या काळात आपले सरकार आले, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वातखाली किमान शंभर कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आजदेखील घोटण गावात दहा कोटी … Read more

खर्च ३२ रुपये भाव २७ रुपये ! किती होते दूध संकलन? काय आहे मर्केटधील स्थिती? दुधाचे भाव वाढण्यासाठी काय करणे अपेक्षित? पहा एक स्पेशल रिपोर्ट

Milk News

Milk News : सध्या दुधासह दर अत्यंत खाली आले आहेत. भाव कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुधाला सध्या २७ रुपये प्रतिलिटर भाव मिळत आहे. परंतु शेतकऱ्याला एकंदरीत येणारा खर्च आणि दुधाचे भाव याचे काहीच ताळतंत्र बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी जेरीस आला आहे. खर्च ३२ रुपये भाव २७ रुपये पशुखाद्यासह चाऱ्याचे दर वाढले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! पोलिसांवर सुरी-काठीने हल्ला, पहा कोठे घडली घटना

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : वडील व मुलाचे जीवघेणे भांडण सुरु होते. पुढील काही अनर्थ ओढवू नये यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी आले. परंतु त्यांच्यावरच बाप- लेकाने सुरी-काठीने हल्ला केला. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील काशीद मळ्यात घडली. ९ डिसेंबरला रात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला. जखमी पोलिसांवर सध्या रुग्णालयात उपचार … Read more

Ahmednagar News : दारूवरून वाद झाला, डोक्यात दांडके टाकून निर्घृण खून केला..एमएडीसीतील मर्डरचा 24 तासात उलगडा

Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरात एका परप्रांतीय इसमाची निर्जनस्थळी नेऊन त्याचा निघृण खून करणार्‍या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वास नामदेव गायकवाड (रा. श्रीस्टाईल चौक, एमआयडीसी नगर), अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट (वय-23 रा. पिंपळगाव कौडा ता. जि. नगर), राहुल अशोक धोत्रे (वय-26 रा बजाजनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव … Read more

ब्रेकिंग ! माजी मंत्री राम शिंदेंच्या सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल, नोकरीच्या आमिषाने उकळले पैसे

Ahmednagar News : माजी पालकमंत्री व तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज राधाकृष्ण कोकाटे (भिस्तबाग चौक, सावेडी, नगर) असे या सचिवाचे नाव आहे. तलाठ्याची नोकरी लावून देतो असे सांगत त्याने २०१६ मध्ये मुंबईतील युवकाची ५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. सुमित बबन डबे (रा. सायन, बृहन्मुंबई) असे फिर्यादीचे नाव … Read more

अंगणवाडी सेविकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार – आ. सत्यजीत तांबे

Satyajit Tambe

येणाऱ्या काळात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंगणवाडी सेविकांचे योगदान अमूल्य ठरणार आहे. मात्र, बालशिक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपावर गेल्या असून ही बाब अत्यंत चुकीची आहे. ३ ते ७ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची सुविधा अंगणवाडी सेविकाच करतात. त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी भूमिका आ. सत्यजीत तांबे यांनी … Read more

Ahmednagar MIDC : एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा !

Ahmednagar MIDC

एमआयडीसी परिसरत कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात काम करत असून या परिसरातील नागापूर चौक ते निंबळक रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळे दळणवळणासाठी नागरिकांचे हाल होत आहे. या रस्त्यावर दुभाजक नाही तसेच पथदिवे नसल्याने अंधारात प्रवास करताना या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात होत असून त्यात काहींचा मृत्यू देखील झाला आहे, मनमाड महामार्गावरील नागापूर चौकातील बंद … Read more

काकडे यांच्यामुळेच दुष्काळी भागाला ताजनापूरचे पाणी मिळणार !

हर्षदाताई काकडे

ताजनापुर लिफ्ट टप्पा क्र.१ या बंद असलेल्या योजनेतून वरुर आखेगाव सह ९ गावांना पाणी मिळावे यासाठी हर्षदाताई काकडे यांनी शासन दरबारी सर्वतोपरी केलेल्या प्रयत्नाला व संघर्षाला आम्ही गावकरी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ताजनापूरचे पाणी या दुष्काळी भागाला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे वरील ९ गावातील आम्ही शेतकरी सदैव त्यांच्यासोबत खंबीरपणे राहणार … Read more

Radhakrishna Vikhe Patil : पिंपरी निर्मळ गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी ! त्याचे समर्थन होऊ शकत नाही

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणाने पिंपरी निर्मळ गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचे समर्थन होऊ शकत नाही. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून गावातील सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पिंपरी निर्मळ गावात मागील दोन दिवसांपासून घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात … Read more

Ahmednagar News : धरण उशाला असुनही १५ दिवसाला पाणी पुरवठा होणारे हे देशातील पहीलेच शहर !

Pani Tanchai

शेवगाव शहराला होणारा अनियमित पिण्याच्या पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी श्रीमती वसुधा सावरकर, राजश्री रसाळ व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी व नागरिकांनी शेवगाव नगरपरिषदेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेत घोषणाबाजी करत नगरपरिषदेचा निषेध केला. गेल्या कित्येक दिवसांपासून शेवगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, अनेक भागांत दहा ते दिवसांनी पाणी येत … Read more

MP Sujay Vikhe : अहमदनगरमधील ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १६ कोटीचा निधी मंजूर

MP Sujay Vikhe

नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्ग ६१ (जुना २२२) वरील अहमदनगर ते खरवंडी कासार या १०.६५ किमी पर्यंतचा खराब झालेल्या रस्त्याच्या कामासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (जुना२२२) वरील मेहकरी ते फुंटेटाकळी येथील ५२ किलो … Read more

मतदार संघातील रस्त्यांसाठी 43 कोटीचा निधी : आ. राजळे

MLA Monika Rajle

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर २०२३ मध्ये ४३ कोटी ६२ लाख रुपये किंमतीच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. या कामामध्ये राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणा करण्यात येणार आहेत. शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचा समावेश या मंजूर कामामध्ये सामावेश असल्याची … Read more

Ahmednagar News : कमाल निसर्गाची..साथ वैज्ञानिकांची ! संगमनेरी शेळीला झाली तब्बल पाच करडे

Ahmednagar News

Ahmednagar News : निसर्गाची किमया अनोखी आहे. निसर्गातील काही थक्क करणाऱ्या घटना पाहिल्या की मग कळत निसर्गाची ताकद किती आहे. जर याच ताकदीला वैज्ञानिकांची साथ मिळाली तर? तर अनेक फायदेशीर परिणाम दिसून येतात. याचच एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील हिवरगाव पावसा येथे घडले आहे. संगमनेरी शेळीला झाली पाच करडे राहुरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये संगमनेरी शेळी … Read more

दुष्काळसदृश मंडळातील शेतकऱ्यांनादेखील भरपाई मिळावी – आमदार आशुतोष काळे

MLA Ashutosh Kale

कोपरगाव मतदारसंघात चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळामुळे खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून दुष्काळ जाहीर झालेल्या मंडलातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ज्या मतदारसंघात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, तेथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच दुष्काळसदृश मंडळातील शेतकऱ्यांनादेखील भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार आशुतोष … Read more

Radhakrishna Vikhe Patil : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

Radhakrishna Vikhe Patil : समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमातून सर्व योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन आज राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील … Read more