खर्च ३२ रुपये भाव २७ रुपये ! किती होते दूध संकलन? काय आहे मर्केटधील स्थिती? दुधाचे भाव वाढण्यासाठी काय करणे अपेक्षित? पहा एक स्पेशल रिपोर्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milk News : सध्या दुधासह दर अत्यंत खाली आले आहेत. भाव कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुधाला सध्या २७ रुपये प्रतिलिटर भाव मिळत आहे. परंतु शेतकऱ्याला एकंदरीत येणारा खर्च आणि दुधाचे भाव याचे काहीच ताळतंत्र बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी जेरीस आला आहे.

खर्च ३२ रुपये भाव २७ रुपये

पशुखाद्यासह चाऱ्याचे दर वाढले आहेत. प्रतिलिटर दूध उत्पादनासाठी ३० ते ३२ रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. पशुखाद्याच्या ५० किलोच्या बॅगची किंमत १७५० रुपये म्हणजेच प्रतिकिलो ३५ रुपये. एका दुधाळ जनावराला एका लिटरसाठी ४०० ग्रॅम खाद्य द्यावे लागते.

म्हणजेच प्रतिलिटर सुमारे १४ रुपयांपर्यंत या खुराकाचा खर्च जातो. याव्यतिरिक्त एक लिटर दुधासाठी १० रुपयांचा चारा लागतो. इतर मेहनत मजुरी धरली तर

प्रतिलिटरला ३० ते ३२ रुपये खर्च होतो. परंतु दुधाला दर मिळत आहे केवळ २७ रुपये. दूध उत्पादकांना प्रतिलिटर तीन ते चार रूपयांचा तोटा सध्या होत आहे. त्यामुळे शासनाने दुधाचा दर ३४ ते ३५ रुपये द्यावा अशी मागणी होत आहे.

सध्या ३.५-८.५ डिग्री दुधाला काही दुधसंकलन केंद्रात २७ रूपयांचा भाव दिला जात आहे. उत्पादन खर्च व विक्री दर यामध्ये प्रतिलिटर ३ ते ६ रुपयांची तफावत असल्याने दूध व्यवसाय तोट्यात चालला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात किती होतेय दूध संकलन?

अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर दररोज ४२ लाख लिटर दूध उत्पादित होते. हे जिल्हाभरातील लहान मोठ्या २५०० केंद्रांवर संकलित होते. दिवसेंदिवस दूध उत्पादनात वाढ होत चालली होती. परंतु आता दुध दरातील घसरणीमुळे दुध उत्पादक पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.

 दूध पावडरचे गणित बिघडले?

आंतरराष्ट्रीय बाजारात दूधापासून बनवल्या जाणाऱ्या पावडरला मागणी असते. परंतु आता हेच दर घसरले असल्याचे समोर आले आहे. या आधी २५ किलो पावडरच्या बॅगच्या किमती २८० रुपये होते. आता हे दर २२० रूपयांपर्यंत घसरले आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यावर दुधाचे अनुदान हवे

दुधाच्या किमती कमी झाल्याने राष्ट्रीय डेरी विकास बोर्डचे सदस्य राजेश परजणे यांनी असं सुचवले आहे की, विदर्भ मराठवाड्यासाठी सुरु असणाऱ्या मदर डेअरीचा प्रयोग एनडीडीबीच्या माध्यमातून राज्यात राबवावा. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर दुधाचे अनुदान द्यावे असे त्यांनी सुचवले आहे.