अवघ्या २४ तासाच्या आत एटीएम फोडणारी टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- अवघ्या २४ तासाच्या आत एटीएम फोडणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. ही कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी एटीएम फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच पाईप लाईन रोडवर एकाच दिवशी दोन एटीएम फोडले होते.त्यात परत शहरातील माळीवाडा परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकींग : तरूणाचा विहिरीत मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तरूणाचा मृतदेह अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आला. त्या तरूणाने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रसाद रघुनाथ साबळे (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान प्रसादच्या जाण्याने त्याच्या परिवारासह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप !

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे शेतीच्या पाट पाण्याच्या वादातून ज्ञानेश्‍वर नागरगोजे रा. भातकुडगाव या शेतकऱ्याचा खून झाला होता. या घटनेतील आरोपी चित्तरंजन रामचंद्र घुमरे (वय 31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे, वय 35 दोघे रा. भातकुडगाव, या दोघा सख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड अशी … Read more

कोरोनाचा विळखा होतोय घट्ट! नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! कोरोना रुग्णसंख्या…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोना संसर्ग नवीन वर्षांपासून झपाट्याने वाढल्याने अहमदनगर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला असून, आज पुन्हा नगर जिल्ह्यात कोरोनाचे ८४७ रुग्णसंख्या कोरोना बाधित आढळून आले आहे. मागील तीन दिवसांत जिल्ह्यात २ हजार १५२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. प्रशासनाकडून वारंवार नागरिकांनी कोविड नियमांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपला मोठे खिंडार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  भाजपचे खंदे समर्थक, गेल्या अनेक निवडणुकीत नेहमी गडाखांच्या विरोधात असणारे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे जवळच्या नातेवाईकांनी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.(Ahmednagar Breaking) नेवासे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. ज्यांनी मागील विधानसभेला भाजपची धुरा सांभाळली असे तालुक्यातील अनेकजण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामस्थांनी पकडले तीन चोरटे !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जामखेड तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा व वाघा परिसरात भरदिवसा घरफोड्या करुन तीन चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचा पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला होता. मात्र, वाघा येथील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगत याबाबत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून फोन करुन ग्रामस्थांना सावध करत अखेर दुचाकीवरील तीन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे वाघा … Read more

चिंताजनक : अहमदनगर मनपाच्या १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.(AMC News) त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यापैकी पतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.(Ahmednagar Crime News) सकिना योगेश भोसले असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज येथे … Read more

नागवडे कारखाना निवडणूक : निकालानंतर कोण काय म्हणाले ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनेलने पाचपुते मगर गटाच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडवत आमदार बबनराव पाचपुते माजी उपाध्यक्ष केशव मगर यांच्या गटाचा धुव्वा उडवला.(Nagwade Sugar Factory Election) या निवडणुकीत नागवडे … Read more

…तर शिवसेना इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजवू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- एक धार्मिक कार्यक्रमाला विरोध करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. हे प्रकार न थांबल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजवू दिला जाणार नाही, असा इशारा शिवसेनने पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! चोवीस तासांत भयानक रुग्णवाढ…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 847  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे – संगमनेर -27 अकोले -62 राहुरी – 29 श्रीरामपूर -52 नगर शहर मनपा -280 पारनेर -28 पाथर्डी -23 नगर … Read more

कोंबड्यांचे खताच्या गोण्यात भरले विदेशी दारूचे खोके… पोलिसांनी एकास ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील राक्षेवाडी परिसरात मद्य वाहतुक करणार्‍या टॅम्पोवर पोलीस पथकाने धडक कारवाई करून सुमारे 34 लाख 67 हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी, कर्जत – श्रीगोंदा रस्त्यावर एक आयशर टेम्पो विदेशी दारूची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती … Read more

दैव बलवत्तर…गळ्याचा फास त्या तरुणांच्या जीवावर बेतला असता

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर शहरात पतंगाच्या माज्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आदित्य झिने हा युवक जखमी झाला आहे. गळ्याचा फास जीवावर बेतला असता परंतू केवळ दैव बलवत्तर म्हणून हातावर निभावले. दरम्यान श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरही पंतगाच्या मांजाने एका तरुणाच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. अधिक माहिती अशी, आदित्य झिने … Read more

‘अशोक’ सहकारी कारखानासाठी आज होणार मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अशोक कारखाना संचालक मंडळासाठी आज रविवारी रोजी मतदान हाेत आहे. दरम्यान मतमाेजणाी साेमवारी थत्ते मैदानाजवळील गुजराती मंगल कार्यालय येथे हाेणार आहे. हि निवडणूक गाजणार आहे कारण कि, शेतकरी संघटना परिवर्तन करणार का पुन्हा एकदा मुरकुटे यांच्याकडे एकहाती सत्ता राहणार याचा निर्णय आज मतपेटीत बंद होणार आहे. अशोक सहकारी … Read more

जिल्ह्यात चाललंय काय? चोरटे दरोडेखोरांच्या दहशतीने नागरिक झाले हैराण नेवासा

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. चोरी, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये देखील दहशत पसरली आहे. यातच पोलीस यंत्रणा यामध्ये कुचकामी ठरू लागली आहे. नुकतेच  तालुक्यातील सलाबतपूर परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सलाबतपूर शिरसगांव गळनिंब आदी गावांमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. शिरसगाव व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात उद्यापासून सुरु होणार ‘ह्या’ शाळा !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  कोरोना निर्बंधांमुळे शाळा कॉलेजे बंद करण्यात आले आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Breaking) नगर जिल्ह्यात सोमवार, 17 जानेवारीपासून इंग्रजी शाळांचे वर्ग सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदन संघटनेने जिल्हा प्रशासनाला … Read more

न्यायासाठी तो पोलीस ठाण्यात आला पण पोलिसांनी फिर्यादींसोबत केलं असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संगमनेर तालुक्यातील पठारभागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातच वाहनातील डिझेल चोरीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका ट्रक चालकाला पोलिसांनी शिवीगाळ करीत हुसकावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व घटनांचा निषेध म्हणून शनिवारी घारगावकरांनी बंद पाळून पोलिसांचा निषेध नोंदविला. अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून घारगाव … Read more

बदलत्या हवामानाचा विचार करतांना शेतकर्‍यांनी पिकसंरक्षण समजून घ्यावे

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरडवाहू शेतीसाठी हरभरा हे शाश्वत पीक असले तरी शेतकर्‍यांनी पिकांचे उत्पादन तंत्र समजून घेत लागवड करावी. असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे कृषि विद्या विभागाचे शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि भारतीय कृषि अनुसंधान केंद्र नवी दिल्ली यांच्यावतीने कडधान्य उत्पादन वाढ अंतर्गत हरभरा समुह प्रथमदर्शक … Read more