अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यापैकी पतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.(Ahmednagar Crime News)

सकिना योगेश भोसले असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज येथे १५ जानेवारी २०२१ रोजी घडली होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या गुन्ह्यात सात आरोपी होते, त्यापैकी चौघा जणांना पोलिसांनी तेव्हाच अटक केली होती. परंतु महिला फरार होती. 15 जानेवारी 2021 रोजी रात्री आमच्याविरुद्ध तक्रार का दिली म्हणून रस्त्यात अडवून दत्त्या,

नाडय़ा, योगेश्वर काळे, योगेश भोसले, नागेश काळे, सकिना भोसले, बजाज काळे (सर्व रा. वाळूंज, ता. नगर) यांनी सिद्धू, राहुल, प्रिया, सुचिता हरिदास चव्हाण, आशंका काळे यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी शीतल भोसलेने भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. मारहाणीत जखमी झालेल्या सिद्धू चव्हाणचा मृत्यू झाल्याने या गुह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले होते.