नागवडे कारखाना निवडणूक : निकालानंतर कोण काय म्हणाले ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यांच्या किसान क्रांती पॅनेलने पाचपुते मगर गटाच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडवत आमदार बबनराव पाचपुते माजी उपाध्यक्ष केशव मगर यांच्या गटाचा धुव्वा उडवला.(Nagwade Sugar Factory Election)

या निवडणुकीत नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनेलने डॉ. प्रतिभा पाचपुते, माजी उपाध्यक्ष केशव मगर, खासदार विखे समर्थक अण्णासाहेब शेलार,

Advertisement

भगवानराव पाचपुते, जिजाबापू शिंदे, वैभव पाचपुते या दिग्गजांचा पराभव करत कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.

शनिवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत संध्याकाळी ७ वाजेपर्यंत श्रीगोंदे गटात नागवडे गटाचे – शिंदे सुभाष ९९७०, भोस बाबासाहेब ९८७४, बेलवंडी गटात लबडे भीमराव ९४३७ , रायकर लक्ष्मण ९९७०, काकडे दत्तात्रय ९९७३

टाकळी कडेवळीत गटात नागवडे गटाचे नेटके भाऊसाहेब ९८६०, दरेकर प्रशांत ९९५९, रसाळ सुरेश ९७२३ लिपणगाव गटात जंगले विठ्ठल ९५४८, गिरमकर जगन्नाथ ९८९२, शिपलकर प्रशांत ९३१४ हे विजयी झाले.

Advertisement

काष्टी गटात राजेंद्र नागवडे यांना १०५६३, राकेश पाचपुते यांना ९६८३ मते पडली तर सेवा संस्थेत राजेंद्र नागवडे यांनी २५ मते घेत विजय मिळवला.

काेळगाव गट : श्रीनिवास घाडगे ९८०८, शरद जगताप : ९७७७ हे विजयी झाले. महिला मतदार संघातून मेघा औटी ९६८८ , मंदाकिनी सातपुते ९३०७ मतांनी विजयी झाल्या. निवडणुकीचा कल पाहता नागवडे यांनी २१-० ने विजय मिळवल्याचे स्पष्ट झालेे.

या निवडणुकीत भाजपचे आमदार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विकास पॅनल मध्ये त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते १७७० यांचा मतांनी पराभव झाला. तर केशव मगर यांचा १८३४ मतांनी पराभव झाला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांचा २५६५ मतांनी पराभव झाला.

Advertisement

कारखाना माजी उपाध्यक्ष जीजाबापू शिंदे यांचा २९८६ मतांनी, संचालक तुळशीराम रायकर त्यांचा २९५१ मतांनी,भगवानराव पाचपुते यांचा ३०५३ मतांनी, मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष वैभव पाचपुते यांचा ३७०२ मतांनी पराभव झाला.

सोसायटी मतदार संघात बाजार समितीचे माजी सभापती प्रवीणकुमार (बाळासाहेब ) नाहाटा यांना अवघ्या ५ मतांनी पराभवास सामोरे जावे लागले. प्रशांत ९३१४ हे विजयी झाले. काष्टी गटात राजेंद्र नागवडे यांना १०५६३, राकेश पाचपुते यांना ९६८३ मते पडली तर सेवा संस्थेत राजेंद्र नागवडे यांनी २५ मते घेत विजय मिळवला.

काेळगाव गट : श्रीनिवास घाडगे ९८०८, शरद जगताप : ९७७७ हे विजयी झाले. महिला मतदार संघातून मेघा औटी ९६८८ , मंदाकिनी सातपुते ९३०७ मतांनी विजयी झाल्या. निवडणुकीचा कल पाहता नागवडे यांनी २१-० ने विजय मिळवल्याचे स्पष्ट झालेे.

Advertisement

मतदारांचा कौल मान्य – केशव मगर मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. कारखान्या भ्रष्टाचार झाला. तो आम्ही सभासदापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. कारखाना वाचवा यासाठी पॅनेल उभे केले. मात्र सभासदांनी नागवडेंवरच विश्वास ठेवला. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत राजकारणात सक्रिय राहू, असे सहकार पॅनेलचे नेतृत्व करणाऱ्या केशव मगर यांनी सांगितले.

बापूंच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या सभासदांचा विजय – राजेंद्र नागवडे नागवडे साखर कारखाना शेतकऱ्यांची कामधेनू आहे. परंतु तालुक्यातील विघ्नसंतोषी नेते मंडळींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांची कामधेनू हिसकावून घेण्यासाठी आमच्या विरोधात पॅनेल तयार करत आमच्यावर खोटे आरोप केले.

परंतु ही निवडणूक सभासदांनीच हातात घेऊन लुटारू टोळीला घरी बसवण्याचे काम केले. हा विजय बापूंच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या सभासदांचा आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र नागवडे यांनी दिली.

Advertisement

खऱ्या अर्थाने बापूंच्या विचाराचा विजय – अनुराधा नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी नागवडे कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन टीका टिपण्णी करत आरोप केले.

पण स्व. बापूंच्या विचारांवर विश्वास असल्याने आजचा विजय हा खऱ्या अर्थाने बापूंच्या विचाराचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी दिली.

Advertisement