अहमदनगर ब्रेकिंग : भाजपला मोठे खिंडार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  भाजपचे खंदे समर्थक, गेल्या अनेक निवडणुकीत नेहमी गडाखांच्या विरोधात असणारे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे जवळच्या नातेवाईकांनी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.(Ahmednagar Breaking)

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नेवासे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. ज्यांनी मागील विधानसभेला भाजपची धुरा सांभाळली असे तालुक्यातील अनेकजण गडाखांच्या तंबूत आले आहेत.

नेवासे बुद्रुक येथील प्रभाकर बोरकर यांच्या वस्तीवर मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Advertisement

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नेवासे बुद्रुक परिसरात होत असलेले परिवर्तन हे तालुक्यात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

नेवासे बुद्रुक येथे मंत्री गडाख यांनी खंडोबा देवस्थान व विविध कामासाठी माेठा निधी दिला आहे. यापूर्वी शनी शिंगणापूर, भानसहिवरा, शिंगवे तुकाई,

खुपटी, कुकाणे, नेवासेसह तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेतला आहे. या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मागील निवडणुकीत गडाख यांना विरोध केला होता.

Advertisement