बिबट्याचा थरार! उसाच्या शेतातून बाहेर पडत वृद्धावर हल्ला, 3 तरुण जखमी

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर जवळील कोहंडी शिवारात रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. ऊस तोडण्यापूर्वी शेतकऱ्याने उसाचे क्षेत्र जाळल्याने, त्यात लपलेला बिबट्या अचानक धावत बाहेर आला. समोर झाडाखाली बसलेल्या यशवंत रामा कचरे (वय ६५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पुढे पळाला, मात्र परत माघारी फिरत त्याने राजू रामचंद्र परते (वय २५), कैलास प्रकाश … Read more

नगर तालुक्यात धर्मांतर करणारी टोळी सक्रिय ? रोख रक्कमेसह लग्न करून देण्याची दिली जाते हमी

१० मार्च २०२५ चिचोंडी पाटील: ग्रामीण भागातील अनेक तरूणांचे विवाह रखडलेले आहेत. त्याचसोबत अनेकजण आर्थिक विवंचनेत आहेत. नेमका याच संधीचा पुरेपुर फायदा घेत नगर तालुक्यात धर्मांतर करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. यांच्याकडून अशा तरूणांना त्याचा विवाह लावून देण्यासह आर्थिक मदत देण्याचे आश्वसन देत धर्मांतर करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर तालुका तसा … Read more

अहिल्यानगरमध्ये सात लाख रेशन बंद होण्याचा धोका ! तुमचं रेशन कार्ड वैध आहे का?

अहिल्यानगरमध्ये रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने १५ मार्च २०२५ ही अंतिम मुदत जाहीर केली असून, या तारखेनंतर ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. जिल्ह्यातील सुमारे ७ लाख १२ हजार ४८५ कार्डधारकांपैकी फक्त ६८ टक्केच लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी करणे आवश्यक … Read more

Ahilyanagar Breaking : गोरक्षकांना धमक्या; ठाकरे गटाचे साजन पाचपुते यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगाव येथे गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने १४ गोवंश जनावरांची सुटका केली. या जनावरांना कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, गोरक्षकांनी पोलिसांना माहिती देताच स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातला आणि जनावरे सोडण्यास विरोध केला. इतकेच नव्हे, तर गोरक्षकांना धमक्या देत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्यासह सात जणांवर गुन्हा … Read more

अकोले तालुक्यात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

१० मार्च २०२५ अकोले : अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०२३ मध्ये ५६ गुन्हे दखल झाले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ८५ वर पोहोचली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७९ गावे येतात. पोलिस ठाण्याच्या … Read more

अहिल्यानगर मध्ये थंडी संपली, आता उन्हाचा कहर सुरू! 10 मार्चपासून तापमान 40 अंशांवर

अहिल्यानगरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी शहरातील दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सियसवर पोहोचले, तर पुढील दोन दिवसांत ४० अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. तापमानात झपाट्याने वाढ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शहराचे दिवसाचे तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले होते. … Read more

मुलीचा बालविवाह रोखला, संतप्त नातेवाईकांनी कुटुंबावरच केला हल्ला!

पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे एका तरुणाने आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीच्या विवाहास विरोध केल्याने संतप्त झालेल्या तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी त्याच्या कुटुंबावर हल्ला केला. या घटनेत तरुणाची आई जखमी झाली असून, हा प्रकार १४ फेब्रुवारी रोजी अमरधाम रस्त्याजवळ बालसुधारगृहाच्या गेटजवळ घडला. या प्रकरणी ६ मार्च रोजी तरुणाने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मुलीच्या आई-वडिलांसह … Read more

पाथर्डी-शेवगाव महामार्गावर दुचाकीने घेतला महिलेचा जीव – नागरिकांमध्ये संताप!

पाथर्डी शहरात सायंकाळी वॉकिंगसाठी गेलेल्या एका महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मीना मधुकर नलवडे (वय ५७, रा. विजयनगर, पाथर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी वॉकिंग दरम्यान दुर्दैवी घटना पाथर्डी शहरातील विजयनगर भागातील काही महिला नेहमीप्रमाणे शुक्रवार, ८ मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या … Read more

अकोले बसस्थानक असुरक्षित ! महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न, अन्यथा, अकोल्यातही ‘स्वारगेट’….

अकोले, ८ मार्च २०२५: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, अकोले बसस्थानकात सुरक्षेच्या अत्यंत ढिसाळ स्थितीमुळे येथेही अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अकोले बसस्थानक हे आदिवासी भागातील महत्त्वाचे दळणवळण केंद्र असून येथे हजारो प्रवासी दररोज ये-जा करतात. … Read more

संगमनेर-पारनेर MIDC ते आश्वी अपर तहसील प्रस्तावाला विरोध ! आमदार तांबे विधान परिषदेत…

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या संगमनेर आणि पारनेर तालुक्यांचा औद्योगिक विकास आणि तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मोठी एमआयडीसी (औद्योगिक वसाहत) उभारावी, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली. संगमनेर-पारनेर औद्योगिक हब संगमनेर आणि पारनेर तालुके हे पर्जन्यछायेतील दुष्काळी भाग आहेत. तरीही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठ्या प्रमाणावर विकास साधला गेला आहे. … Read more

शिर्डी-सिन्नर महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा संताप, मोबदल्याशिवाय काम होऊ देणार नाही

Shirdi-Sinnar Highway : शिर्डी-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग (NH-160) चे काम अंतिम टप्प्यात असताना, झगडे फाटा येथे उड्डाण पुलाच्या निर्मितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे बाधित झाली आहेत. मात्र, त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. जर लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई देण्यात आली नाही, तर महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी … Read more

BREAKING: नगर जिल्ह्यात ४ बांगलादेशी तरुणींना अटक ! कोण देत होते आश्रय? मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता!

श्रीगोंदे तालुक्यातील बनपिंप्री येथे एका हॉटेलमध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी तरुणींना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरुणींनी भारतात येण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्र वापरले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात परकीय नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसे झाले उघडकीस नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना मिळालेल्या … Read more

अहिल्यानगर हत्याकांडातील ‘आका’ कोण ? वैभव नायकोडी खून प्रकरणातील ‘खरा मास्टरमाइंड’पोलिसांच्या रडारवर…

अहिल्यानगर : सावेडी भागात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी घडलेल्या वैभव नायकोडी अपहरण आणि खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरवून टाकला आहे. या खुनातील प्रमुख आरोपींना कोणाचा वरदहस्त आहे का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींना पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे आता आरोपींची पोलिस कोठडी … Read more

नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू

अहिल्यानगर, दि.७ – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी … Read more

बुरुडगाव कचरा डेपोमधील प्रकल्पात शॉर्टसर्किटमुळे लागली आग

महानगरपालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोतील प्रकल्पाजवळ शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग नियंत्रणात आणली आहे. आगीमध्ये प्रकल्पाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ठेकेदार संस्थेमार्फत लवकरच त्याची दुरुस्ती होऊन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. बुरुडगाव कचरा डेपो मध्ये असलेल्या एका … Read more

सुपा – पारनेर ‘एमआयडीसी’तील कंपन्यांच्या तपासण्या करून अहवाल सादर करावा – उद्योगमंत्री उदय सांमत

पारनेर येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या तपासणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, या समितीमध्ये महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करून तेथील सुरू असलेल्या उद्योगांची तपासणी करून अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. उद्योजकांना संरक्षण देणे हे आमचे प्रथम कर्तव्य असून त्यांनी उद्योगक्षेत्राचा विकास करण्यासाठी … Read more

प्राथमिक शिक्षकाच्या चौकशीसाठी नेमले पथक ; पारनेर तालुक्यातील प्रकार

७ मार्च २०२५ पारनेर : पारनेर तालुक्यातल्या एका प्राथमिक शाळेतल्या वयस्कर शिक्षकाने शनिवारी (दि. १) या दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा तक्रार विद्यार्थिनींनी पालकांकडे केली.त्याबद्दल वर्तमान पत्रांमध्ये गुरुवारी (दि. ६) हि बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाकडून याची दखल घेतली गेली त्यामुळे त्या शिक्षकाच्या चौकशीसाठी दोन विस्तार अधिकाऱ्यांसह … Read more

डॉ.पंकज आशिया असतील अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी ; जाणून घ्या त्यांची कारकीर्द

७ मार्च २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगरचे जुने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची पुण्याला साखर आयुक्त म्हणून बदली झाली आहे त्यांच्यानंतर आता त्यांच्या जागी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे नगरला जिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.डॉ. आशिया हे २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.ते या आधी नाशिक मध्ये उपविभागीय अधिकारी, तसेच जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी … Read more