७ मार्च २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगरचे जुने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची पुण्याला साखर आयुक्त म्हणून बदली झाली आहे त्यांच्यानंतर आता त्यांच्या जागी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे नगरला जिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.डॉ. आशिया हे २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.ते या आधी नाशिक मध्ये उपविभागीय अधिकारी, तसेच जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
२४ जुलै २०२३ पासून ते यवतमाळला जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. गुरुवारी (दि.६) शासनाने राज्यातील ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश काढले.म्हणून डॉ. पंकज आशिया यांची नगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि नगरचे जुने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची १५ दिवसांपूर्वी पुण्याला साखर आयुक्तपदी बदली झाली होती.बदली झाल्या नंतर सुद्धा ते दोन आठवडे कार्यरत होते.त्यामुळे त्यांची बदली रद्द होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

पण त्यांनी सोमवारी (दि. ३) पदभार सोडला. त्यानंतर नगरसाठी अनेक नावांची चर्चा होती.नंतर डॉ. आशिया हे गुरुवारी जिल्हाधिकारी म्हणून बदलून आले.यवतमाळ येथे शासकीय कामकाजात गतिमानता तसेच पारदर्शकता यावी यासाठी ई-गर्व्हनन्स उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले होते.
याचाच भाग म्हणून नगरपालिका आणि भूमिअभिलेख कार्यालयात अभिप्राय कक्षाची स्थापना त्यांनी केली होती. जिल्ह्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठीही त्यांचे योगदान महत्वाचे आहे.त्यांच्याच पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले.