अकोले विधानसभा मतदार संघामधून चुरशीच्या लढतीत डॉ. किरण लहामटे 5556 मताधिक्याने विजयी! अमित भांगरे, वैभव पिचड पराभूत

kiran lahamate

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे व राज्यामध्ये या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर राज्यातील काँग्रेसचे … Read more

????अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघाचे निकाल वाचा एका क्लिकवर ! जाणून घ्या कोण झाले तुमच्या तालुक्याचे आमदार

आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला असून त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीला तब्बल 229 जागा मिळालेल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 46 आणि इतरांना 13 जागा मिळाल्या आहेत. महायुती मधील भारतीय जनता पक्षाला तब्बल 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 56 आणि अजित पवार गटाला 41 जागा … Read more

पारनेरमधून जिल्हा परिषद सदस्य पोहोचणार थेट विधानसभेत! लंके, दाते की कार्ले? श्रीगोंदा आणि नेवासामध्ये ही तीच स्थिती?

vidhan bhavan

Ahilyanagar News:- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपणास असे अनेक दिग्गज नेत्यांचे उदाहरण घेता येईल की त्यांचा राजकारणाचा प्रवास हा ग्रामपंचायत सदस्या पासून तर थेट विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारापर्यंत झाल्याचे दिसून येते. काही अपवाद सोडले तर बहुसंख्य नेत्यांचा प्रवास हा अशाच पद्धतीचा झाला आहे. आधी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणाहून देखील बऱ्याच … Read more

कर्जत जामखेड मधून प्रा. राम शिंदे की रोहित पवार? 27 फेऱ्यांमधून जाहीर होणार निकाल; उत्सुकता शिगेला

pawar and shinde

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. परंतु जर आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे विद्यमान आमदार रोहित पवार हे परत रिंगणात होते तर त्यांच्या समोर महायुतीच्या माध्यमातून राम शिंदे यांनी तगडे आवाहन निर्माण … Read more

कधी मिळणार कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन? नवीन सरकारच्या स्थापनेनंतर मिळेल का? जाणून घ्या माहिती

kukadi water

Ahilyanagr News:- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती व वीस तारखेला निवडणुकीसाठीची आवश्यक मतदान प्रक्रिया देखील पार पडली व आता उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु या निवडणुकीच्या कालावधीत मात्र जुन्नर तालुक्यातील रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक मात्र रखडली व ती … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढल्याने धाकधूक! कोणत्या लाडक्या उमेदवारांच्या पथ्यांवर पडणार हा वाढलेला टक्का?

voting

Ahilyanagar News:- काल संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले व अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या जिल्ह्यामध्ये नवमतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली होती व त्याचाच परिणाम हा एकूण बाराही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा वाढलेला टक्क्यांमध्ये झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वाढलेला हा टक्का नेमका कोणता उमेदवारांच्या पथ्यावर पडणार? याबाबत मात्र प्रत्येक मतदारसंघांमध्ये विविध चर्चा होताना दिसून येत … Read more

आपली फूल ना फुलाची पाकळी ! शिर्डीत काँग्रेसकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन…मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप सुरू असलेले व्हिडीओज व्हायरल

Shirdi News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा अनेक अर्थाने जितका महत्त्वपूर्ण आहे तितका हा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ असून त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाला तितकेच महत्त्व आहे. जर आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या ठिकाणहून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहा वेळा या मतदारसंघात करिष्मा दाखवला असून … Read more

जनतेची दिशाभुल करणा-यांना जागा दाखवा-मोनिका राजळे; शेवगावमध्ये मोनिका राजळे यांच्या रॅलीला व सांगता सभेस उत्फुर्त प्रतिसाद

monica rajle

गेल्या पन्नास वर्षातील विकासाचे प्रश्न दहा वर्षाच्या काळामध्ये ख-या अर्थाने मार्गी लावण्याचे काम केले आहे, पाणी प्रश्न कायमचा सोडविला आहे काम सुरु आहे, मतदार संघ विभाजन होणार नाही,ताजनापुर लिप्टचे काम वेगाने पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असुन गेल्या दहा वर्षाच्याकाळात मतदार संघात एकही दिवस न आलेले प्रतिनिधी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. माझया … Read more

उगवत्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका ! खा. नीलेश लंके यांचे विरोधकांवर शरसंधान

election campain

विधानसभा निवडणूक सुरू झाल्यानंतर काही उमेदवार मतदारांपुढे येत आहेत. हे उमेदवार भुछत्रासारखे आहेत. निवडणूकीनंतर ते पुन्हा मावळणार आहेत. ते परत येणार नाहीत. मी उगवता सुर्य आहे. उगवत्या सुर्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका. महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ अळकुटी गणाच्या वतीने अळकुटी येथे रविवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे … Read more

भक्तिमय वातावरणात आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराची सांगता, बाल वारकऱ्यांसमवेत ठेका धरत रिंगणात रंगले आ.जगताप

sangram jagtap

महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी सकाळी ऐतिहासिक हस्त बेहस्त महाल ते भिस्तबाग चौकापर्यंत प्रचार फेरी काढून करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून आ.जगताप यांच्या प्रचार फरीचे स्वागत केले. फेरीच्या अग्रभागी बाल वारकरी टाळ मृदंग वाजवत विठू नामाचा जयघोष करत सहभागी झाले होते. यावेळी आमदार जगतापही उभ्या रिंगणात टाळ व मृदंग … Read more

राहुरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता आ. तनपुरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळेल- राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाफनांनी व्यक्त केला विश्वास

tanpure

Ahilyanagar News:- या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांचेच वर्चस्व दिसून आले व त्यांनी ते दाखवून देखील दिले. मागच्या पंचवार्षिक निवडणुकांचा निकालाचा जर संदर्भ बघितला तर राहुरीकरांनी नेहमीच प्रत्येक आमदाराला दोन टर्म संधी दिली आहे व त्यातच आता आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये विकासाची अनेक कामे करून … Read more

संग्राम जगताप यांचे ‘हे’ आहे अहिल्यानगरच्या विकासाचे व्हिजन 2029! वाचा सध्या प्रगतीपथावरील कामे आणि येणाऱ्या काळात केली जाणारी कामे

sangram jagtap

Ahilyanagar News:- अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी काल सहकार सभागृहामध्ये कार्यक्रम घेतला व यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी शहरांमध्ये केलेली कामे म्हणजेच शहराचा भूतकाळ आणि बदलते भविष्य हे नागरिकांसमोर मांडले. ही विधानसभेची निवडणूक अहिल्यानगर शहराचे भविष्य ठरवणारी असून नगरकरांनी टाकलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही व येत्या पाच … Read more

कुकडी लाभक्षेत्रातील गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी आवश्यक असलेला डिंभे-माणिकडोह बोगदा प्रश्न मार्गी लावणार- विक्रम पाचपुते

vikram pachpute

Ahilyanagar News:- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी जोरदार प्रचार केला असून मतदार संघातील अनेक गावांमध्ये त्यांनी प्रचार सभांचे आयोजन केले होते व या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधण्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर भर दिला. अगदी याच पद्धतीने काल लोणी व्यंकटनाथ या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते व त्यावेळी त्यांनी डिंभे- … Read more

मोनिका राजळे यांना विधानसभेत पाठवा! माझी द्रोपदीची झोळी आहे, मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

nitin gadkari

ही विधानसभा निवडणुक महाराष्ट्राची दिशा ठरवणारी आहे. विकासाचे शिलेदार बनविण्यासाठी तुम्ही  मोनिका राजळेंना विधानसभेत पाठवा. मी राष्ट्रीय महामार्ग व तुमच्या मतदार संघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या सोबत आहे.  माझी द्रौपदीची झोळी आहे. तुमच्या मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शेवगाव येथील खंडोबा माळ येथे महायुतीच्या … Read more

आमदार मोनिकाताई राजळे यांनी एक लाख तीस हजार पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून दिला – आमदार महेश कासवाल

mahesh kaswal

केंद्र व राज्य शासन सर्वसामान्यांसाठी व जनतेच्या फायद्यासाठी विविध शासकीय योजना जाहीर करत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम स्थानिक आमदारांचे आणि खासदारांच्या असते. आज आमदार मोनिकाताई राजळे यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातील एक लाख तीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वत्र यंत्र राबवून त्यांचे अर्ज भरून … Read more

पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – आ. मोनिकाताई राजळे

monica rajle

निवडणूक आली की गावागावतला सामाजिक एकोपा बिगडतो. एकमेकांच्य सणवार व सुख दुःखात आपण सहभागी  होतो. मात्र निवडणूक आली की जातीचे विष पेरले जाते. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो.या गोष्टीचा विचार करुन निवडणुक काळात जातीचे विष पेरणा-याला थारा देवु नका. जाती-पातीतील सलोखा कायम ठेवा. ही निवडणुक आपल्याला विकासाच्या बाजुने घेवुन जायची आहे. जलसंधारण व मुख्यमंत्री सड़क योजना … Read more

मंत्री विखे पाटील यांची भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार! काय आहे नेमके प्रकरण?

Radhakrishan Vikhe Patil News

Ahilyanagar Poitics:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा जागा वाटपामध्ये आणि उमेदवारी निश्चितीमध्ये चर्चेचा मतदार संघ या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठरला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर आपण बघितले तर या ठिकाणी विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसचे तिकीट मिळेल व त्यांची उमेदवारी ही फिक्स मानली जात होती. परंतु काँग्रेसच्या माध्यमातून लहू कानडे यांना डावलून हेमंत ओगले यांना काँग्रेस … Read more

प्रलंबित प्रश्न सोडवण्याकरिता तनपुरेंनाच विधानभवनात पाठवा! महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री राहतील, खा.निलेश लंकेचा दावा

nilesh lanke

Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ जेऊर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके यांनी उपस्थिती यामध्ये महत्वाची होती व त्यांच्यासोबतच या सभेचे अध्यक्षस्थानी गोविंद मोकाटे हे होते. जेऊर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये खासदार निलेश लंके यांनी बोलताना … Read more