कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात चाललंय काय?

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.  त्यातच महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात सध्या कायदा – सुव्यवस्था अक्षरश वाऱ्यावर असलेली दिसून येत आहे.  संगमनेर शहरातील एका मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या खोलीमधून अज्ञात … Read more

पाच डिसेंबरपासून शिर्डी विमानतळ सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – येत्या 5 डिसेंबरपासून शिर्डीसाठी एकाच वेळी दिल्ली, हैदराबाद व बंगळुरूसाठी हवाईसेवा सुरू करण्याची तयारी स्पाईस जेट कंपनीने केली आहे. प्रवासी वाहतुकीसह कार्गो सेवाही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. कोविडच्या छायेतच साईबाबांच्या शिर्डी येथून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या पाच डिसेंबरपासून स्पाईसजेट दिल्ली, हैदराबाद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैशाच्या वादातून एका तरुणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- शिर्डी जवळील डो-हाळे गावामध्ये पैशाच्या घेण्यावरून एका तरुणाचा खून झाला आहे. या घटनेने शिर्डी डो-हाळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27 नोव्हेंबर) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान येथे घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक असणारे डोराळे या गावात एका तरुणाचा पैशाच्या घेण्यावरून … Read more

शाळेतील कर्मचारी कोरोनाबाधित; शाळा पाच दिवस बंद

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाल्यांनतर कालपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यातच अद्यापही काही ठिकाणी शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. नुकतेच पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शाळा पुढील पाच … Read more

या पर्यटन स्थळावरील हॉटेलवर विनविभागाची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- कोरोना लाॅकडाऊनची बंधने थोडी शिथिल होताच पुणे, मुंबई आणि नाशिक येथील पर्यटकांची व गिर्यारोहकांची गर्दी अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडावर वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती लक्षात घेऊन गावातील एका गटाने वन विभागाकडे तक्रार करून गडावरील पर्यटन थांबवण्याची विनंती केली. त्याची गंभीर दखल घेत वन विभागाने गिरीभ्रमण करणाऱ्यांचे आकर्षण … Read more

तीन दिवसात शंभरहून अधिक कोरोनाबाधित सापडले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यात तीन दिवसांत १२३ रुग्ण आढळल्याने कोरोना बाधितांची संख्या ५ … Read more

महिला वकिलासह एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-खोटे दस्तऐवज तयार करून मोटार अपघाताचा दावा कोपरगाव न्यायालयात दाखल केल्याप्रकरणी नगर येथील अॅड. मंगला राजेश कोठारी (श्रीरंग अपार्टमेंट, गुजरगल्ली) व नंदकुमार छोटुलाल खिच्ची (सावळीविहिर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एमएसीपी ३६९/२००२ या दाव्यात समाविष्ट फिर्याद, घटनास्थळ, पंचनामा आदी दस्तऐवज बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून दावा दाखल … Read more

मटका अड्ड्यावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे, कायद्याचे धाक न राहिल्याने अवैध धंदे देखील वाढू लागले आहे. पोलीस प्रशासनाकडून यावर कारवाईचा धडाका सुरु आहे. अशीच एक कारवाई नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाणे हद्दीत नदीपात्र शेजारी बहुचर्चित भुरका चौक पानगाव येथील मटका अड्ड्यावर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या तालुक्यात शासकीय कोविड रुग्णालय सुरु

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा वेग घेतल्याच्या दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन बेड सह इतर सुविधानियुक्त शासकीय कोविड रुग्णालय आज … Read more

अखेर कोपरगाव पोलीस ठाण्याचा पदभार यांच्या हाती

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला आज अखेर नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहे. आजपासून या पोलीस ठाण्याचा पदभार हर्षवर्धन गोविंद दळवी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. हर्षवर्धन दळवी यांची कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निवड झाली आहे. यामुळे गेले अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले हे पद अखेरीस भरले गेले आहे. दरम्यान … Read more

रिक्षा – दुचाकीच्या अपघातात रिक्षा चालक ठार

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-प्रवाशी रिक्षा व दुचाकींचा अपघात होऊन यामध्ये रिक्षा चालक ठार झाला आहे. हि घटनाला श्रीरामपूर येथे घडली आहे. दरम्यान या अपघातात रिक्षा मधील एक प्रवाशी महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथून रिक्षा प्रवांशी घेवून शहरात येत असताना समोरुन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज ३४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ९८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०९ ने वाढ झाली. … Read more

वीजबिल मुद्यावरून महसूलमंत्र्यांकडून ऊर्जामंत्र्यांची पाठराखण

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-सध्या राज्यात वाढीव वीजबिल मुद्दा चांगलाच तापला आहे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना आलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या मुद्यवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. अशातच एक धक्कादायक खुलासा कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा … Read more

दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण; मंत्री तनपुरेंनी दिले आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-डोंगरगण येथे मंत्री तनपुरे यांनी नुकताच जनता दरबार भरविला होता. यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा मंत्री तनपुरे यांच्यासमोर वाचून काढला. यावेळी पिण्यासाठी दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार डोंगरगण (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरेंकडे केली. जनता दरबारात दूषित पाणीपुरवठ्याविषयीच्या तक्रारीचे मंत्री तनपुरेंकडून तातडीने निवारण करण्यात आले. तनपुरे यांनी … Read more

त्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करणार

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर नगर परिषदेची शहर हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचे कॉन्ट्रॅक्ट एका ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेकेदार परवडत नाही म्हणून अर्धवट कामे सोडून गेल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली . यावर बोलताना श्रीरामपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी सांगितले कि, या … Read more

महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट ; माजी पालकमंत्र्यांचा हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, असं वक्तव्य माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेते आणि माजी मंत्री राम … Read more

भुलीच्या इंजेक्शनमुळे उपचारांदरम्यान महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- नुकतेच संगमनेर मध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. संगमनेर येथील भोलाणे हॉस्पिटलमध्ये संगीता अंकुश पठारे (३५, बिरेवाडी) ही महिला शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली होती. भुलीच्या इंजेक्शनमुळे तिचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलसमोर गर्दी … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार काळेंनी ठेकेदाराला झापले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू आहे. त्या परिसरातील रस्त्यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे. या महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान व खराब झालेल्या रस्ते दुरुस्तीकडे समृद्धी महामार्ग व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम … Read more