होय ! कोरोनामुळे लग्नाळू शेतकरी मुलांचे ‘भाव’ वाढले …

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  कोरोनाचे संकट जगाला आपत्ती ठरत असले तरी लग्न लग्नाच्या फेऱ्यात न अडकलेल्या शेतकरी व व्यावसायिक मुलांना मात्र या काळात अचानक पसंती वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात लग्न न जुळणाऱ्या शेतकरी मुलांना कोरोना ही इष्टापत्ती ठरली आहे. विशेष म्हणजे लॉकड़ाऊनच्या काळात मोठ्या संख्येने हे विवाह उरकले आहेत. त्यामुळे आता नोकरदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज पुन्हा वाढले कोरोनाचे रुग्ण वाचा सविस्तर !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे ०२ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर १३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या चाळीस वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा. वाशी मुंबईहून शेवगाव येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर येथील खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या … Read more

आनंदाची बातमी : जिल्ह्यातील या १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  जिल्ह्यातील १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त. आज त्यातील १३ व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला तर २ व्यक्तींना पीएमटी लोणी येथून डिस्चार्ज देण्यात आला. यात, राहाता तालुक्यातील ०२, संगमनेर ०६, शेवगाव ०१, कर्जत – ०२, अकोले ०२, नगर शहर ०१, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. … Read more

मुंबईहून आलेले आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : लोणी खुर्दमध्ये मुंबईहून आलेले क्वारंटाइन केलेले आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली. लोणी खुर्दमध्ये एका शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. आता मुंबईहून प्रवरानगर येथे भावाकडे आलेली ३४ वर्षांची बहीण व तिचा १० वर्षांचा मुलगा पाॅझिटिव्ह असल्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहे तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात. राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि … Read more

त्या महिला डॉक्टरमुळे कोपरगावकरांचा जीव टांगणीला !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगाव येथील एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे स्त्राव शुक्रवारी नगर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्या पाचही जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शनिवारी आणखी ९७ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. राहाता तालुक्‍यातील लोणी येथील कोरोनाबाधित व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या कोपरगावच्या महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटीव … Read more

तब्बल अकरा महिन्यानंतर व्यापारी महिलेवर गोळीबार करणारा जेरबंद !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : मागील वर्षी जुलै महिन्यात कोपरगाव शहरातील एका व्यापारी महिलेवर रात्रीच्या वेळी गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेरव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) यास पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून तब्बल अकरा महिन्यानंतर जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही ताब्यात घेतल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more

जावयांमुळे अहमदनगर जिल्हा हैराण ! कोरोनाचा होतोय प्रसार …

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीरामपूर व आता शेवगाव तालुक्‍यात जावयांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे. अगोदरच रुग्णांची वाढती संख्या सर्वाची डोकेदुखी ठरत असतानाच जावयांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने जावयांच्या आगमनामुळे अहमदनगर जिल्हा हैराण झाला आहे. शेवगाव तालुक्‍यातील अधोडी येथील भाचेजावई असलेला ४५ यर्षीय व्यक्ती (मुळगाव मालेगाव,ता.गेवराई, जि. बीड) ठाणे जिल्ह्यातील कळव्याहून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मटकाकिंगला कोरोना आणि त्यानंतर संपर्कात आलेल्या….

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : संगमनेर शहरातील नवघर गल्लीतील एका मटकाकिंगला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्‍तीला देखील कोरोनाची बाधा झाली असतानाच आता त्यात आणखी तिघांची भर पडली आहे. त्यात मोमीनपुरा, नाईकवाडापुरा, सिन्नर तालुक्‍यातील दोडी येथील एका ५९ वर्षीय कोरोनाचे संक्रमणझाल्याचे जिल्हा रुग्णालकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले असल्याची … Read more

‘या’ नव्या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   पुणे-संगमनेर-नाशिक सेमी स्पीड मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिल्यानंतर या मार्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती खा. अमोल कोल्हे यांनी दिली. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे. दरम्यान, संगमनेर, अकोलेतून जाणार्‍या या रेल्वे मार्गामुळे … Read more

शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारले, सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील एका शेततळ्यात सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात इसमाने जाणूनबुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यातील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणीही दूषित झाले. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली … Read more

साई मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार!

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थान ११ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. सर्वाधिक गर्दीसाठी देशात पहिल्या क्रमांकावर असलेले शिर्डीतील साई मंदिर केव्हा उघडणार याबाबत साईभक्तांत उत्सुकता आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात या मंदिराचे दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर … Read more

जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगावच्या जनतेने निवडून देताना विकासाचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबबादारी खांद्यावर घेत मतदारसंघातील रेंगाळलेले पाणी, रस्ते विजेचे प्रश्न मार्गी लावत आहे. यापुढेही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१९/२० नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत … Read more

गावठी कट्ट्यांसह त्या दोघा जणांना अटक

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : श्रीरामपूर शहर पोलिसांनी अशोकनगर भागात शुक्रवारी रात्री १० वाजता दोघांकडून जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत केला असून याबाबत दोघांना अटक करण्यात आली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे. शुक्रवारी ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अशोकनगर भागात कारेगावकडून … Read more

महाविकास आघाडी सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक भागात झालेल्या शेती पिकांसह इतर नुकसानीची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना जास्तीची मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन मंत्री थोरात यांनी या वेळी दिले. तालुक्यातील आंबीखालसा, तांगडी, पाणसवाडी आदिंसह … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या पत्रकाराचा कोरोना अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : जिल्ह्यातील एका दैनिकाच्या वार्ताहरास कोरोनाच्या संशयावरून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवले असता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. निमोण येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील संगमनेरातील नवघर गल्ली येथील एका बाधिताच्या संपर्कात पत्रकार आल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नेले होते. शहरात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी 03 नवे कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : जिल्हा रुग्णालयातील सकाळी प्राप्त अहवालानुसार 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाच आज दुपारी पुन्हा 03 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे नगर मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दुपारी तीन वाजेपर्यंत 12 झाली आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 207 झाली आहे. कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील 02 व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याची … Read more

अन्यथा अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे. पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिका-यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा येथे सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारांटाईनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषदेचे … Read more