श्रीरामपूरमध्ये खासदार पुत्राची बंडखोरी !

श्रीरामपूर :- शिवसेनेकडून इच्छुक असलेले खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, सेनेचा एबी फॉर्म भाऊसाहेब कांबळे यांना मिळाला आहे, तरीही लोखंडे समर्थक उमेदवारीबाबत आशावादी आहेत. शिवसेनेचा एबी फॉर्म मिळालेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्याकडे एबी फॉर्म आहे. मात्र, शिवसेनेने जाहीर … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर जिल्ह्यातील ह्या सहा नेत्यांना उमेदवारी जाहीर !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या याादीमध्ये 77 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातील पाच नेत्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे. अकोले – किरण लहामटे , कोपरगाव – आशुतोष काळे, शेवगाव – प्रताप ढाकणे, पारनेर – निलेश … Read more

क्रेन शेतातून आणल्याचा जाब विचारल्याने महिलेस मारहाण

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील माळवाडी, कोकमठाण परिसरात राहणारी शेतकरी महिला अलका मारुती लोहकणे, यांच्या शेतातील सिताफळ व रामफळाचे झाड क्रेन आणल्याने धक्का लागुन वाकले.  तेव्हा या शेताच्या रस्त्यातून क्रेन का आणला असे अलका लोहकणे या महिलेने विचारले असता ६ जणांनी लाकडी दांडा, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन पायावर मारुन फॅक्चर केले.  शिवीगाळ करुन जिवे ठार मारणयाची … Read more

कांद्यासाठी आंदोलन करणार्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

राहुरी – केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून कांदा निर्यातबंदी केली. याच्या निषेधार्थ काल नगर – मनमाड रस्त्यावर राहुरी बाजार समितीसमोर अन्यायाच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाची प्रतिकात्मक तिरडीसह अंत्ययात्रा काढली. घोषणाबाजी केली व रस्त्यावर आंदोलन करुन वाहतुकीस अडथळा केला.  या प्रकरणी काल हे.कॉ.प्रविण मकासरे यांच्या फिर्यादीवरुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे आंदोलक … Read more

माजी सभापतींनी डावलला ना. विखेंचा आदेश, …हे आहे प्रकरण

श्रीरामपूर – श्रीरामपूर बाजार समितीत गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची एकहाती सत्ता असताना ना. विखे यांनी सर्व संचालकांशी चर्चा करून एकमताने नवीन सभापती व उपसभापतींची निवड केली.  नेत्यांचा आदेश शिरसावंद्य मानून सभापती व उपसभापती यांच्या विरोधातील अपात्रतेच्या कारवाया थांबवणे अत्यावश्यक असताना त्या कारवाया तशाच सुरू ठेवल्याने एकप्रकारे बाजार समितीचे माजी सभापती दीपक पटारे … Read more

कै. ससाणेंच्या इच्छेप्रमाणे गद्दार कांबळेना कदापि निवडून देऊ नका!

श्रीरामपूर – भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभा करायचा किंवा नाही याबाबत विविध मतमतांतरे व्यक्त करण्यात आली. मात्र कांबळे यांना पराभूत करण्यासाठी प्रसंगी जो मातब्बर उमेदवार असेल त्याच्या मागे आपल्या संघटनेची ताकद उभी करावी, असा सूर ससाणे समर्थकांच्या आज दुपारी झालेल्या बैठकीत दिसून आला.  बैठकीत याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार करण ससाणे यांना देण्यात आले. … Read more

फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या प्रथम क्रमांक

प्रवरानगर दि २ आक्टोंबर २०१९ – नुकत्याच कोळपेवाडी येथे पार पडलेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या १४ वर्षें वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात पुणे संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळवून प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींच्या या संघाने फुटबॉल स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला असून या संघाची राज्यस्तरावर निवड झाली असल्याची माहिती संचालिका सौ.लीलावती … Read more

महिला पदाधिकाऱ्याविरोधात अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांविरोधात गुन्हा

संगमनेर: महिला पदाधिकाऱ्याविरोधात अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी (१ ऑक्टोबर) सकाळी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला. या वेळी शिवसेनेची एक महिला पदाधिकारी या कार्यक्रमासाठी येत असताना जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी महिला पदाधिकारी येत असल्याचे अरगडे यांना सांगितले, … Read more

मधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक डॉ. किरण लहामटेंना राष्ट्रवादीची उमेदवारी

अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघात मधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अकोले तालुक्यातील जनतेचा कौल जाणून घेऊन राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. किरण लहामटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. डॉ. लहामटे … Read more

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरातांकडे आहे इतकी संपत्ती पण चारचाकी एकही नाही !

संगमनेर :- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार थोरात कुटुंबीयांकडे जंगम व स्थावर अशी सुमारे बारा कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात दहा कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर सुमारे दोन कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. परंतु थोरात यांच्यासह त्यांच्या कुटुंबाकडे एकही वाहन नसल्याचे म्हटले … Read more

राधाकृष्ण विखेंना हरविण्यासाठी आ.बाळासाहेब थोरात आक्रमक

शिर्डी :- विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी थोरात गटाने व्यूहरचना आखली आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे शिर्डी विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार असतील असे संकेत युवा नेते सत्यजित तांबे यांनी दिल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी मंत्री विखे यांनी संगमनेर … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांना शिवसेनेचा मोठा धक्का

अहमदनगर :- संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. मात्र शिवसेनेने ही जागा आपल्याकडेच ठेवून मंत्री विखे यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपने मंगळवारी दुपारी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत संगमनेरचे नाव नाही. संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजपकडून तगडा … Read more

विखे व ससाणे गटाला धक्का.

श्रीरामपूर : काँग्रेसला जय महाराष्ट्र करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधत भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. आता पक्षाने एबी फॉर्म दिल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोेध करणाऱ्या विखे, ससाणे गटाला धक्का बसला आहे. आता या दोन्ही गटाकडून अपक्ष उमेदवाराला पाठबळ देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. … Read more

मकरंद अनासपुरे ची स्टाईल मारताना अर्ज भरायला गेला आणि पाच हजारांचा दंड भरून आला

अहमदनगर : ‘गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा’ या मराठी सिनेमातील मकरंद अनासपुरे यांनी साकारलेल्या ‘नारायणा’च्या भूमिकेचा नेवासा निवडणूक शाखेने सोमवारी अनुभव घेतला. देडगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून घेऊन आलेली चिल्लर त्यांच्या चांगलीच अंगाशी आली. चिल्लरसाठी आणलेली प्लास्टिकची पिशवी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नजरेत आली आणि त्यांना पाच हजार रुपये … Read more

आमदार मोनिका राजळे एकदा तुमचा सात-बारा तपासून बघा !

शेवगाव : भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, अशा कार्यकर्त्यांना आमदार झाल्यानंतर मोनिका राजळे यांनी खड्यासारखे वेचून बाहेर काढले व स्वत:च्या बगलबच्च्यांना महत्त्वाची लाभाची पदे दिली. भाजपचे निष्ठावान असे प्रमाणपत्र तुम्ही देण्याची गरज नाही. एकदा तुमचा सात-बारा व फेरफार तपासून बघा, म्हणजे कोण निष्ठावान हे जनताच ठरवेल, अशी टीका ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे यांनी … Read more

मुरकुटेंनी तालुक्याचे वाळवंट केले : गडाख

नेवासे: माजी आमदार शंकरराव गडाख यांनी शक्तिप्रदर्शन करत सोमवारी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज दाखल केले. आधी सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्याचे वाळवंट केल्याचा आरोप शंकररावांनी या वेळी केला. पक्षाच्या झेंड्याखाली काम करताना मर्यादा पडत असल्याने अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे सांगत मुरकुटे यांच्या … Read more

महायुती सरकारचा पराभव अटळ,भावी मुख्यमंत्री आघाडीचाच – बाळासाहेब थोरात !

संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत … Read more

विधानसभेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा !

मुंबई: भाजप आणि शिवसेनेने एक संयुक्त पत्रक काढून अखेर आज युतीची घोषणा केली आहे. या पत्रकात भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष हे महायुती म्हणून लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे फॉर्म्युल्याविषयीचा तपशील हा लवकरच जाहीर करण्यात येईल असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे जरी युती झाली असली तरी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्युला हा गुलदस्त्याच ठेवण्यात आला आहे . या पत्रकावर भाजपचे … Read more