ज्या निलेश लंकेंची सेनेतुन हकालपट्टी केली त्यांच्याच मताने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री !

अहमदनगर :- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (शनिवार) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरीक्षा असणार होती. दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली आणि या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहिले. Ahmednagar … Read more

कन्या विद्यालयात रंगला नवसिताऱ्यांचा सन्मान सोहळा

श्रीगोंदा:अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंद्यातील राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात आयोजीत केलेल्या सोहळ्यात एम पी एस सी परिक्षेत यश व राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत झेंडा रोवणाऱ्या नव सिताऱ्यांचा सन्मान केला. आणि मुलींना गणवेश व सायकल भेट दिली भाग्यश्री फंड हर्षद जगताप धनश्री फंड पल्लवी हिरवे कोमल हिरडे पल्लवी पोटफोडे सोनल नवले शितल कांगुणे निकीता काटे … Read more

माजी आ. नरेंद्र घुलेंना विधानपरिषदेवर घेण्याचे मागणी !

शेवगाव :- राष्ट्रवादीची स्थापना करताना सर्वात प्रथम स्व.मारुतराव घुले पाटलांनी समर्थन दर्शवत शरद पवाराना पाठिंबा दर्शविला, आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहात घुले यांनी पवारांची साथ सोडली नाही. जिल्ह्याची वाताहत होत असताना घुले बंधुंनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आघाडीसाठी महत्वाची भूमिका बजावत जिल्ह्यात १२ /० चे गणित बदलवत ३/९ करुन पक्ष संघटनेचा पाया मजबुत केला. याच दरम्यान … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीत रंगणार निवडणुकीची रणधुमाळी !

अहमदनगर : येत्या वर्षातील जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहील. यात मुदत संपत असलेल्या आणि नव्याने झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेत प्रभागरचना, आरक्षण प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने काल शुक्रवार रोजी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी … Read more

महापौरांच्या प्रभागातच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ! 

अहमदनगर : प्रभाग क्र. १ मधील सिद्धिविनायक कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एका श्­वानास मागील काही महिन्यांपासून त्वचेचा विकार व जखमा झाल्या आहेत. या श्­वानामुळे आरोग्याचा प्रश्­न ऐरणीवर येऊन नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. महापौरांच्या प्रभागातील सदर प्रश्­न त्यांना सांगून देखील उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिद्धिविनायक कॉलनीत एका श्­वानाला काही … Read more

राजकारणातील बुलंद तोफ ढाकणे यांचे राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का?

पाथर्डी :- तालुक्याच्या राजकारणातील बुलंद तोफ आणि पक्ष व कार्यकर्त्यांसाठी संघर्षशील नाउमेद नेतृत्व म्हणून ओळख असलेले केदारेश्वरचे चेअरमन ॲड.प्रताप ढाकणे. यांचे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का? अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ढाकणे समर्थकांमध्ये सुरु आहे. ॲड.ढाकणे यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय ठरलेला आहे. सन १९९५,९६ ला त्यांनी राजकारणात सक्रिय होत तिसगाव गटातून … Read more

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; दोन जागीच ठार 

सुपा: नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील पळवे फाटा येथील हॉटेल जगदंब जवळ कारच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर) सकाळी  ७.१५ वाजता घडली. पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अहमदनगर कडे जाणाऱ्या महामार्गावरील पळवे फाटा हॉटेल जगदंब जवळ एम एच-०४,बी वाय-९६२२ हुंडाई कंपनीच्या कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले. पुलाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने जीवन संपविले !

अहमदनगर :- भिंगार येथे शेतातील विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने आपले जीवन संपविले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बादल हरिचंद्र वाल्मिकी (वय २६), बबली बादल वाल्मिकी (वय १९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाल्मिकी दाम्पत्य हे भिंगार … Read more

निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

राहुरी :- मतदारसंघातील जनतेने दोन वेळा निवडून दिले. त्यामुळे मतदारांवर आपण कधीच रोष व्यक्त करणार नाही. सरकार कुणाचेही असो, सामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू. जनतेशी जोडलेली आपुलकीची नाळ कदापि तोडणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते.  कर्डिले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत … Read more

महापालिका भरणार प्रदूषण मंडळाकडे एक कोटी रुपये

अहमदनगर : हरित लवादाच्या आदेशानुसार बुरुडगाव येथे बायोमिथेनायझेशन प्लांट अॉक्टोबरपर्यंत उभारण्यात महापालिकेला अपयश आले.  याप्रकरणी हरित लवादाने एक कोटींची परफॉरमन्स गॅरंटीची रक्कम प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे भरण्याचे आदेश महिनाभरापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले होते. पुढील महिन्यात लवादाची सुनावणी असून तत्पूर्वी १ कोटींची रक्कम भरणा करण्यासाठी आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा एक कोटीचा दणका बसला … Read more

आमदार रोहित पवारांची मंत्रिमंडळात वर्णी लावा

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा नगर जिल्ह्यातील सर्वात मागास व दुष्काळी मतदारसंघ आहे. या वेळी खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व रोहित पवार यांच्या रूपाने लाभले आहे.  मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रिमंडळात वर्णी लावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी केली. फक्त सत्ता असून उपयोग नाही, तर दृष्टिकोन विकासात्मक … Read more

आ. रोहित पवार यांच्याऐवजी आ.संग्राम जगताप यांना मंत्रीपद ?

अहमदनगर :- राज्यात नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्याला किती मंत्रिपदांचा लाभ होणार, याची उत्सुकता जिल्हाभरात आहे.  मंत्रिपदांच्या या शर्यतीत ज्येष्ठ नेते व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत-जामखेडचे नवे आमदार रोहित पवार  तसेच शिवसेनेला पाठिंबा देणारे नेवाशाच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांची नावे आघाडीवर आहेत. … Read more

भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल !

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करुन महाराष्ट्राचा लढवय्या इतिहास देशाला, जगाला दाखवून दिला आहे. याच महाराष्ट्राने अहंकारी दिल्लीवाल्या भाजपचा अहंकार उतरविला. महाराष्ट्र राज्य कोणा समोरही झुकणार नाही. भाजपवाल्यांनी शिवसेनेचे बोट धरुन महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढविला आणि आम्हाला संपवायला निघाले. भाजपने शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे त्यांना याची मोठी किंमत मोजावी … Read more

नवरा व सासऱ्याकडून विवाहितेचा दुचाकी, चारचाकीसाठी छळ !

नगर – जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण तसेच पुणे येथे सासरी नांदत असताना विवाहित तरुणी नंदिनी प्रविण खंदारे, वय ३० हिला नवरा व सासऱ्याने तुझा पगार आमच्याकडे दे, तुझे एटीएम आम्हाला दे, तुझी दुचाकी आम्हाला दे,  तुझ्या आई वडिलांकडून माहेरी चारचाकी गाडी घेण्यासाठी ५ लाख रुपये घेवून ये, असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून … Read more

BREAKING – ग्रामपंचायत कार्यालयातच महिला सरपंचाच्या साडीसोबत केले ‘हे’ कृत्य

नगर –  नगर तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातच महिलेच्या साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी बाळासाहेब शंकर शेळके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात एक ४२ वर्षाची विवाहित महिला सरपंच असून तेथे काल ९. ३० च्या सुमारास सदर सरपंच महिला कार्यालयात कामकाज करत असताना … Read more

घरात घुसलेल्या चोरट्यांचा प्रतिकार केल्याने चोरट्यांनी केला कुऱ्हाडीने हल्ला

श्रीगोंदे – घराचा दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरांवर प्रतिकार केल्याने चोरट्यांनी डोक्यात कुर्हाडीचा जबरी घाव घालून जखमी केले. ही घटना श्रीगोंदा परिसरात मांडवगण रोड, तरटे वस्ती, शाडूचा मळा येथे घडली. सविस्तर माहिती अशी की,  भगवान तरटे यांच्या बंगल्यात रात्री १. ४५ च्या सुमारास तोंडाला फडके गुंडाळलेले चोरटे घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. घरात सामानाची उचकापाचक … Read more

दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने ट्रकला लागली आग

नगर : दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करत होता. ट्रक आणि दुचाकीस्वाराचा वेग बरोबरच. यातच ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी सापडली. या अपघातात दुचाकीस्वार दुचाकीवरून लांब फेकला गेला. त्यामुळे सुदैवाने वाचला. परंतु दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्या घर्षणाने ट्रकला आग लागली. क्षणात ट्रक आणि त्याखाली सापडलेली दुचाकी जळून खाक झाला. या प्रकाराने नगर-पुणे रोडवरील वाहतूक दोन तास … Read more

वृद्ध महिलेस मारहाण करून गळ्यातील डोरले पळवले

अहमदनगर : एका ६० वर्षीय वृद्ध महिलेस हाताच्या चापटीने मारहाण करुन तिच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले बळजबरीने चोरुन नेले. ही घटना नगर तालुक्यातील बाराबाभळी परिसरातील मोरे वस्ती, कवड्याची खोरी येथे मंगळवार दि.२६ रोजी ७ वाजता घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेबीबाई भानुदास … Read more