राम शिंदे यांच्यासाठी खासदार उदयनराजे भोसले कर्जतला !

कर्जत ;- राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत -जामखेड विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे प्रा. राम शिंदे असा संघर्ष होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यावर पवार यांना शह देण्यासाठी नुकतेच भाजपमध्ये आलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना कर्जतला बोलविण्यात आले … Read more

तर मी खासदारकीचा राजीनामा देईन…

राहुरी ;- राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिलेला असून गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिला, तर संचालक पदाबरोबरच खासदारकीचा देखील राजीनामा देईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी आयोजित ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू, मात्र…

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. जगताप धक्कातंत्र वापरून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. त्यातच जगताप यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता शिल्पा गार्डन येथे पदाधिकारी व मोजक्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, हा … Read more

तेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात :रोहित पवार

जामखेड :- “काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीला शिकारीची हौस आलेली. आपल्या घरचं जनावर मरायला लागलं तर त्याला पाहूण्याच्या दारात नेऊन दावणीला बांधायचा सल्ला देणारेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात. असो, त्यांना कुणीतरी सांगा माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्या गोष्टी करतो.” अशी खोचक टीका रोहित पवार यांनी पालकमंत्री राम शिंदेंवर केली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी केंद्रीय दुष्काळ पाहणी … Read more

पालकमंत्री ना.राम शिंदेंकडून पवारांना जोरदार राजकिय धक्का

कर्जत: तालुक्यातील शेगूड येथे ना. प्रा राम शिंदे यांनी राज़कीय खेळी करून पाच दिवसांपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांची घरवापसी करवून घेतली. शेगूड येथे ना. शिंदे यांच्या सभेत अनेकांची भाषणे झाली. त्यानंतर उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत हे अचानक जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांना घेऊन दाखल झाले. हे पाहून उपस्थितांना … Read more

मोबाईल टावर उभारण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची तीस लाखांची फसवणूक

अहमदनगर : आपल्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे मोबाईल टावर बांधण्याचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्सुरन्स करावयाचे असल्याचे सांगून, शिवाजी घोरपडे यांना विविध बँकांमध्ये वेळोवेळी पैसे भरायला लावून,३० लाख ३५ हजार ५३१ रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत सविस्तर असे की, डॉ.शिवाजी … Read more

भीमानदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील भीमानदीपात्रातील बेटावर अंदाजे३५वर्षीय अनोळखी पुरुषाचा वाहून आलेला मृतदेह पोलिसांना सापडला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पोलिसांनी स्पीडबोटीच्या मदतीने हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल.परंतु सदरचा मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला असल्यामुळे जागेवरच पंचनामा करत पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली. या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत, त्यामुळे सदर इसमाचा मृत्यू पाण्यात … Read more

घुले बंधूंची भूमिका गुलदस्त्यात!

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या पक्षांतर्गत विरोधातील गटाने दि.३० रोजी भाजप व मित्र पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यात काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना भाजपची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी यापूर्वीही वरील कार्यकर्त्यांनी … Read more

पवार कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील !

अहमदनगर :- आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन दिवसातील राष्ट्रवादीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच राजकारण … Read more

रोहित पवारांचे डिपाॅझिट जप्त करून बदला घेणार !

जामखेड :- बारामतीची शिकार हातातून जाते काय असे वाटते, परंतु ही शिकार आपल्या हातूनच व्हावी, अशी इच्छा आहे, असे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी पवार यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणार आहे, असेही ते म्हणाले. सरपंच परिषद महामेळाव्यात शिंदे बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सारोळ्याचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा तरुण बनला मुख्यमंत्री !

राहुरी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ‘वेक अप महाराष्ट्र’ नावाने उपक्रम चालू केला. यातील एक भाग ‘मै भी नायक’ या स्पर्धेत राहुरी तालुक्यातील गुहा येथील अजिंक्य दिलीप बोरुडे हा विजेता ठरला. त्याला दोन दिवस पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्यासोबत राहून मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला. … Read more

राज्यात परत युतीचेच सरकार येणार : ना.राम शिंदे

जामखेड : गेल्या ५० वर्षांत जे काम झाले नाही ते तुमच्या आशीर्वादाने पाच वर्षांत करुन दाखवले. आता फक्त तरुण पिढीला कायमस्वरूपी हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी कर्जत तालुक्यातील सुत गिरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. आगामी काळात जामखेड तालुक्यातील एमआयडीसी व मोठ मोठे उद्योग येथे सुरू करण्यात येणार आहेत. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेत्वृत्वाखाली भाजपची सत्ता … Read more

पुणे – नगर महामार्गावर अपघातात एक ठार

पारनेर: तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावर पळवे शिवारात दि.२६ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास हॉटेल धनश्री हॉटेल समोर उभ्या असलेल्या कंटेनर (क्र.एम.एच. ४६ बी.बी.२५६४) ला पुण्याकडून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टेम्पो (क्रं.एम.एच१२ एफ.झेड.७९८६) ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने टेम्पो चालक जागीच ठार झाला. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पळवे शिवारातील हॉटेल धनश्री समोर रस्त्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बळीराजा दुहेरी संकटात

अहमदनगर :- शेवगाव तालुक्याच्या दक्षिण भागासह परिसरात बोंडआळी आणि आता रस शोषक किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यात मका बाजरी व ज्वारी पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके डोळ्या देखत नष्ट होत आहेत. त्यातच भर म्हणून की काय कांदा पिकाला हुमनीने पोखरण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या अक्षरक्षा तोंडचे पाणीच पळाले आहे. या भागात जूनच्या … Read more

नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे तालुक्याच्या पाणीप्रश्नाचे वाटोळे !

श्रीगोंदे :- तालुक्याचे नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे पाणीप्रश्नावर तालुक्याचे वाटोळे झाले. सामान्य शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. ही चूक सुधारण्यासाठी पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी करण्यासाठी संपूर्ण गावाने विजयासाठी एकोपा करून एल्गार पुकारला आहे. यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भगवानराव पाचपुते यांनी केले. तालुक्यातील काष्टी येथील राजयोग मंगल कार्यालयात गुरुवारी … Read more

राजीनाम्यानंतर अजित पवार कर्जतच्या अंबालीका साखर कारखान्यावर !

अहमदनगर :- माजी उपमुख्यमंत्री व शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकारणात खळबऴ माजली आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर अजित पवार यांचा मोबाईलही बंद आहे. दरम्यान अजित पवार नगरमधील कर्जत तालुक्यातील त्यांच्या अंबालीका साखर कारखान्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते नेमके … Read more

दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार : रोहित पवार

कर्जत – जामखेड तालुक्‍यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आगामी काळात आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी सांगितले. जामखेड तालुक्‍यातील झिक्री इथे बारामती ऍग्रो लिमिटेड आणि उत्कर्ष मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्‍ट यांच्यावतीने दुग्ध उत्पादकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला युवा नेते रोहित … Read more

विधानसभा 2019 : आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांसाठीची अधिसूचना शुक्रवारी जारी होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येतील. उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सार्वजनिक सुटी व्यतिरिक्त सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत … Read more