अहमदनगर जिल्ह्यात खरंच 12-0 होणार का ?

नगर जिल्हा हा मोठ्या नेत्यांचा जिल्हा आहे. लोकसभेच्या निवडणुकीअगोदर सुरू झालेली पक्षांतरं अजूनही सुरू आहेत. भारतीय जनता पक्षात जाऊन राज्यात गृहनिर्माणमंत्री झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी जिल्ह्यात युतीला 12 आणि दोन्ही काँग्रेसला शून्य अशा जागा मिळणार असल्याचं जाहीर केलं असलं, तरी तसं होणं अशक्य आहे. त्याची कारणं या जिल्ह्यात पाय ओढीचं राजकारण, … Read more

चंद्रशेखर घुले यांना पक्षाने डावलले की त्यांनी माघार घेतली ?

शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत आ.राजळेंसाठी जनादेशा मागितला. त्यामुळे आ. राजळेंना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पक्षांतर्गत इच्छुकांची फिल्डिंग मात्र चांगलीच जोर धरत आहे. त्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केदारेश्‍वरचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव ढाकणे यांची उमेदवारी … Read more

भाजपा लहान मुलांसारखी चिडतेय !

अहमदनगर :- अवघ्या काही दिवसांवर येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने भाजपाला शरद पवारांची भीती असून भाजपा ही लहान मुलांसारखी चिडत असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर ठपका ठेवण्यात … Read more

तरुणाईचे मतदान ठरवेल नगर जिल्ह्यातील आमदार !

अहमदनगर :- जिल्ह्यातील राजकारण घराणेशाही पद्धतीचे असून त्याच त्या नेत्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणातील विविध पदांवर संधी मिळत असते. या नेत्यांचा हक्काच मतदार असल्याचे मानले जाते. विविध माध्यमांतून नेत्यांशी, त्यांच्या संस्थांशी बांधली गेलेली ही मंडळी आपल्या नेत्यांकडे पाहूनच मतदान करीत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे येथील निवडणूक लढविण्याची पद्धत, प्रचाराची पद्धतही त्यानुसार आखलेली होती. अलीकडे … Read more

‘आ. राजळेंनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये’ !

पाथर्डी :- आमदार मोनिका राजळे यांनी न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये, असे प्रतिपादन भगूरचे सरपंच वैभव पुरनाळे यांनी केले. आ. राजळे यांनी तालुक्यात गावागावात केलेल्या कामांची यादी प्रसिद्ध करून पत्रके वाटली. या यादीमध्ये भगूर येथील दोन विकासकामांचा उल्लेख आहे; परंतू भगूर येथे झालेली विकासकामे जि. प. जनसुविधा व समाजकल्याण विभागांतर्गत झालेली असून, ही कामे … Read more

सुजित झावरेंनी पक्षाशी गद्दारी केली !

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुजित झावरे यांना अनेक पदे दिली असताना झावरे यांनी पक्षाशी गद्दारी केल्यााचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी पत्रकार परिषदेत केला. पारनेर येथे झालेल्या सुजित झावरे यांच्या संवाद मेळाव्यात झावरे यांनी राष्ट्रवादी पक्ष व नेत्यांवर टीका करीत भाजपवासी होण्याचे जाहीर केले. या मेळाव्यात माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे, … Read more

भीमसैनिकांचा रोहित पवारांना पाठींबा

जामखेड: आगामी कर्जत जामखेड मतदार संघात युवा नेते रोहित पवार यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी काळात तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय संकल्प मेळाव्यात घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाचा युवा नेतृत्व विकी सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली महावीर भवन येथे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक -कारच्या भीषण अपघातात चार ठार

अहमदनगर – नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात भिंगारचे तीन व वाळकीचा एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. नगर दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कार चक्काचुर झाली होती. कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत … Read more

खळबळजनक घटना – परळी-नगर रेल्वेमार्गासाठी चार कोटींचा मुरूम चोरला

बीड : बहुप्रतिक्षित नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी चक्क चोरीचा मुरूम वापरल्याची खळबळजनक बाब बुधवारी (दि.२५) समोर आली. रेल्वेमार्गाच्या कामावरील कंत्राटदार कंपनीने बिंदुसरा नदीतील सुमारे ४ कोटींचा १ लाख ब्रास मुरूम चोरून नेला.  जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या निनावी पत्राने या चोरीच्या प्रकाराला वाचा फोडली. या पत्राआधारे जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागविला. सत्यता आढळल्यामुळे पीव्हीआर कंपनीच्या संस्थापकासह चौघांविरुद्ध ग्रामीण ठाण्यात मंगळवारी … Read more

15 दिवसात अर्धी राष्ट्रवादी भाजपात आणणार !

जामखेड: जामखेड तालूक्यातील अर्धी राष्ट्रवादी भाजपात येण्याच्या मार्गावर असुन येत्या 15 दिवसात तालुक्यातील अनेक बडे नेते भाजपात आणणार असल्याचे पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरुमकर यांनी स्पष्ट केले. तसेच मी भाजपातच असुन ना राम शिंदे यांचेच काम करणार आहे, मुरुमकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपातुन राष्ट्रवादीमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. … Read more

या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली !

कर्जत : केंद्र व राज़्यातील भाजप सरकार हे शेतकरीविरोधी असून, या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. . कर्जत येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात पवार बोलत होते.  सभेपूर्वी अजित पवार यांचे मिरजगावपासून रॅलीने स्वागत करण्यात आले. जामखेडचे … Read more

तर मी उमेदवारी न करता पाचपुतेंचा प्रचार करेन : आमदार जगताप

श्रीगोंदे – नगर मतदारसंघात नागवडे-जगताप यांच्यापैकी एकच उमेदवार असेल. आम्ही शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांच्या तालमीतले असून सयाजीरावांना पुन्हा एकदा घरी बसवणार आहोत, असे आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता कुकडी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी सांगितले. बबनराव पाचपुते यांनी ३० ते ३५ वर्षे राजकारण केले. आमदार, मंत्री म्हणून … Read more

रोहित पवारांचे सर्जिकल स्ट्राईक ; पालकमंत्री राम शिंदे यांच्या पीएसह सभापती व भाजप नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश !

जामखेड :- पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे व पालकमंत्री राम शिंदे यांचे पीए अशोक धेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी जाहीर प्रवेश केला. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्धार मेळाव्यात भाजपचे अनेक नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. … Read more

मोटारसायकल घसरून पडल्याने एकाचा मृत्यू

अहमदनगर : भरधाव वेगातील मोटारसायकल घसरून पडल्याने मोटारसायकलस्वार अविनाश अप्पा गिरी (वय २८ रा.हंगा ता.पारनेर) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना १३ सप्टेंबर रोजी नगर पुणे महामार्गावर सुपा गावच्या शिवारारत काळूबाई हॉटेल समोर घडला. . याबाबत सविस्तर असे की, अविनाश गिरी हा नगर पुणे महामार्गावरून जात असताना तो सुपा गावच्या शिवारातील काळूबाई हॉटेलच्या शिवारात आला … Read more

पिचडांना शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक, सेनेसह भाजप नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

अकोले :- राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड-पुत्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, जि. प सदस्या सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड आणि त्यांचे … Read more

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले…

नवी दिल्ली : सौदी अरेबियामधील तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर जगभरात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात तेलाची टंचाई भेडसावत असतानाच सलग सहाव्या दिवशी देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत २९ पैशांनी पेट्रोल महागले असले तरी मागील सहा दिवसांत ही वाढ १.३१ रुपयांनी झाली आहे, तर डिझेल देखील २५ पैशांनी महागले आहे. मागील सहा … Read more

झेंडे बदलले, पण तेच नेते एकमेकांविरुद्ध !

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तरी अद्यापही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आघाडी झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही तर दुसरीकडे जागा वाटपावरूनच युतीचे घोडे अडले आहे. त्यामुळे शिलेदार कोण हे काही चित्र स्पष्ट झाले नाही. भाजप व शिवसेनेतील इनकमिंगमुळे झेंडे बदलले असले तरी चेहरे तेच आहेत. परिणामी गेल्या … Read more

उसा अभावी ‘नागवडे साखर कारखाना’ बंद राहणार

श्रीगोंदा : यावर्षी ऊस नसल्याने कारखान्याचा हंगाम बंद ठेवावा लागणार आहे. मागील हंगामातील उसाची बिले जिल्ह्यात सर्वांत अगोदर देण्याचे काम नागवडे कारखान्याने केले आहे. त्याचबरोबर कारखाना कार्यस्थळावर कमी खर्चात उसाचे बेणे देखील उपलब्ध करून दिले होते. असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले. नागवडे सहकारी कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा … Read more