प्रताप ढाकणे तुम्ही कोणत्याही पक्षात जा, तुमचा पराभव अटळ आहे.

पाथर्डी :- वंजारींना संधी देऊन राजळे कुटुंबाने समाजाचा सन्मान केला. आमदार मोनिका राजळेंभोवती जेवढ्या संख्येने वंजारी कार्यकर्ते आहेत, तेवढे तुमच्याभोवती किती मराठा कार्यकर्ते आहेत हे दाखवा. विक्रमराव आंधळे यांच्या पराभवासाठी पळणाऱ्यांना त्यावेळी जात का दिसली नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते सोमनाथ खेडकर यांनी प्रताप ढाकणेंवर निशाणा साधला. येळी येथे आमदार राजळे यांच्या हस्ते भाटेवाडी रस्त्याच्या … Read more

राहुरीच्या विकासासाठी विखे-कर्डिले ही जोडी कायम राहील !

राहुरी :- देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मागील ५० वर्षांत महाराष्ट्राला लाभला नाही, असे सांगत निळवंडे कालव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने ही जनादेश यात्रा असली, तरी जनतेने आभार यात्रा म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी केले. मी आमदार कर्डिंलेचे नाव कायम घेत असताना माझे नाव घेण्याची आठवण त्यांना … Read more

प्रताप ढाकणे यांना भाजप प्रवेश मिळाला तरी उमेदवारी नाही !

पाथर्डी :- पक्षात कोणाला यायचे तर या, पण उमेदवारी मात्र मोनिका राजळेंनाच असेल. काही जण शेजारी जातात (बीड जिल्हा), पण काही उपयोग नाही. खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांना मी अहवाल दिला आहे, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असले, तरी उमेदवारी मिळणार नसल्याचे … Read more

केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा : कर्डिले

अहमदनगर : राज्यातील व देशातील भाजप सरकारने भरीव विकासकामे करून राज्यात व देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत पारदर्शक कारभार केला, राज्य सरकारच्या माध्यमातून राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात केलेली विकासकामे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन युवानेते अक्षय कर्डिले यांनी केले. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बुऱ्हाणनगर येथे आयोज़ित नगर- पाथर्डी- राहुरी मतदारसंघातील तरुणांच्या … Read more

जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार हे नक्की

नगर : जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची पायाभरणी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून होणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २४ व २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी शहर भाजपाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. विखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो … Read more

कांद्याच्या बाजारभावात पन्नास रुपायांनी वाढ

राहुरी: राहुरी शहर रविवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याच्या बाजारभावात ५० रूपये वाढ झाली. वांबोरी उपबाजार समितीत एक नंबर कांद्याला १८०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. आवक कमी झाल्याने बाजारभावात किरकोळ वाढ झाली. वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर ६९४० गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १८०० ते २१०० रूपये क्विंटल भाव मिळाला. दोन नंबर कांदा १३०० ते … Read more

कार्यसम्राट म्हणणार्यांनी १४ वर्षात तालुका भकास केला – नीलेश लंके

पारनेर : स्वतःला कार्यसम्राट म्हणणार्यांनी १४ वर्षात तालुका भकास केला. नुसते सभामंडप बांधून विकास होत नसतो तर लोकांच्या मूलभूत गरजा ओळखायला पाहिजे. तालुक्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून तयार केलेले रस्ते तीनच महिन्यात उखडतात. हाच तो कार्यसम्राटांचा विकास आहे काय? असे सांगत कडूस ते वाळवणे रस्त्याची अवस्था आज काय … Read more

धरण पाहण्यास आलेल्या महिलेचा मोबाइल चोरला

राहुरी : मुळा धरण पाहण्यासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचा ६० हजार किमतीचा अ‍ॅपल आयफोन भामट्याने लांबवला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ते पाहण्यासाठी पूजा राजेश पेटकर (गोरेगाव, मुंबई) या कुटुंबासमवेत आल्या होत्या. पेटकर यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात ठेवलेला अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल भामट्याने हातोहात लांबवला. मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात येताच पेटकर यांनी शोध घेतला. … Read more

गटबाजी टाळून प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस कार्यरत

नगर –  गटबाजी टाळून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस कार्यरत आहे, असे शहरब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी नवीन कार्यालयाच्या निमित्ताने स्पष्ट केले. शहर काँग्रेसने यापूर्वी आणिआजही कोणताही विशिष्ट गट मानला नाही. तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसनेकार्य सुरु केले होते. ते स्वत: आज कार्यरत नाही, पण त्यांनी जी पक्षाची … Read more

या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय…

नगर : माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेना सोमवारी रस्त्यावर उतरली. पोलिस प्रशासनाचा धिक्कार असो, या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. खोटा गुन्हा तत्काळ मागे घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी … Read more

पारनेर पोलिस निरीक्षकांची शेतकऱ्याला धमकी

पारनेर – कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पारनेरच्या पोलिस निरीक्षकांविरुद्ध थेट मुख्यमंत्री सचिवालय व विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, वनकुटे येथील १८ एकर जमिनीच्या वादावर न्यायालयाने रोहिदास देशमुख यास शेतात जाण्यास निरंतर मनाई केली होती. … Read more

लोकप्रतिनिधींनी निवेदन देणे हे आपले दुर्दैव : क्षितीज घुले

शेवगाव : मुळा धरणाच्या पाटपाण्यावर शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क असून, जोपर्यत टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. तो पर्यत मुळा पाटपाणी आंदोलन तीव्र करणार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीलाच मुळा विभागात आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर त्यासारखे तालुक्याचे दुर्दैव नाही.असे मत शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनी व्यक्त केले.. ढोरजळगाव येथे … Read more

मुकुंदनगरच्या रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम केले -आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर परिसराचा विकासात्मक दिशेने कायापालट होत आहे. रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम केले असून, या भागातील विकास कार्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. मुकुंदनगर, प्रभाग क्रमांक 3 मधील शाह शरीफ दर्गा रोड व मुल्ला कॉलनी अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत … Read more

गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या वतीने लष्करी व पोलीस अधिकार्‍यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजौरी (जम्मू) येथे देश सेवेचे कर्तव्य बजावणारे सुभेदार विनोदकुमार चौहान आणि दामिनी पथकाच्या माध्यमातून युवतींच्या संरक्षणासाठी धाऊन येणार्‍या सहा.पो.नि. कल्पना चव्हाण यांचा गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सुभेदार चौहान … Read more

ग्रामपंचायत कर्मचार्‍याचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमधून 10 टक्के नोकर भरतीसाठी पात्र असतानाही डावलून अपात्र कर्मचार्‍यास नियुक्त केल्याच्या निषेधार्थ न्याय मिळण्यासाठी संजय डमाळे या ग्रामपंचायत कर्मचार्‍याने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले. तर ही भरती प्रक्रिया सदोष झाली असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या … Read more

पाणीवाटपाच्या वादातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

पाथर्डी :- तालुक्यातील दगडवाडी येथे टँकरच्या पाण्यावरून वाद होऊन ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ दशरथ वाकचौरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. दगडवाडीत भिषण पाणी टंचाई आहे. मिरी तिसगाव नळ योजनेचे पाणी नियमित व वेळेवर येत नसल्याने अधूनमधून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ग्रामपंचायत कर्मचारी वाकचौरे प्रत्येक चौकात उभ्या केलेल्या प्लास्टिक टाक्या पाण्याने भरून देत असताना माझ्या हौदात पाणी … Read more

इंडिकाची धडक बसून पाच वर्षांच्या मुलाच मृत्यू 

अहमदनगर – जामखेड तालुक्यातील साकत येथील कोमल व गोविंद चव्हाण हे रक्षाबंधनासाठी सारणी (ता. केज) येथे गेले असताना त्यांच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा इंडिका कारची धडक बसून जागीच मृत्यू झाला. अथर्व गाेविंद चव्हाण असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोमल व तिचे पती अथर्वसह नांदूर फाट्यावरून टमटमने सारणी फाट्यावर उतरले. त्याचवेळी केजकडून येणाऱ्या इंडिकाची रस्त्याच्या कडेला असलेल्या अथर्वला … Read more

जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व जनता स्वीकारेल, असे वाटत नाही !

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमधून लढण्याच्या तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना कोणाचेही नाव न घेता राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये कोणाला कुठे उभे राहायचे, हा ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मात्र, नगर जिल्ह्यामध्ये सक्षम मंडळी आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व येथील जनता स्वीकारेल, असे … Read more