शिवसेना नेत्याच्या पुत्रावर जीवघेणा  हल्ला

अहमदनगर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मुलावर शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात मुलगा निशांत जखमी झाला आहे. अनिल माधव वैरागळ (टिळकनगर), शुभम दशिंग आणि दोन अनोळखी यांनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निशांत हा बसस्टँडजवळ चहा पित होता. त्या वेळी अनिल वैरागळ याने शिवीगाळ करत हुज्जत घातली. … Read more

शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नितीन शेळकेसह ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अहमदनगर : नगर – पुणे रोडवरील वाडेगव्हाण शिवारात दरोडा टाकल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना १४ ऑगस्टला घडली असून, १५ रोजी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. अविनाश सुभाष ढोरमले यांच्या फिर्यादीनुसार नितीन पांडुरंग शेळके, किशोर यादव, अजय शेळके, विजय शेळके, गणेश कोहोकडे, गोरख मोटे, राहुल यादव, अक्षय कचरे, संदीप चौधरी, सचिन पांडुरंग शेळके … Read more

कोयत्याचा धाक दाखवत मारहाण,दीड लाख लुटले

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे नगर पुणे रस्त्यावर हॉटेल गुरुकृपासमोर संदिप ज्ञानदेव चौधरी (रा.वाडेगव्हाण ता.पारनेर) व त्यांचे सहकारी संकेत सुरवसे या दोघांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर पिस्तूल रोखत, कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील गाडीच्या डिक्कीतील ७५ हजार रूपये रोख व ७५ हजारांची सोन्याची चैन असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना … Read more

श्रीगोंदा विधानसभेची भाजपची उमेदवारी मलाच – माजीमंत्री पाचपुते

श्रीगोंदा : सध्या तालुक्यात काही नेते भाजपमध्ये जाणार त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार अशा वावड्या उडवल्या जात आहेत. परंतु त्या सगळ्या अफवा असून, श्रीगोंदा विधानसभेची भाजपची उमेदवारी आपल्यालाच निश्चित असून मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आपल्यालाच असून, तयारीला लागण्यास सांगितल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात … Read more

राष्ट्रवादीला आघाडी न मिळाल्यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल – नितीन शेळके

पारनेर :- लोकसभा निवडणुकीत सुपे गटात राष्ट्रवादीला आघाडी न मिळाल्यामुळे त्या पक्षाचा विधानसभेचा तथाकथित उमेदवार आकसापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडत असल्याचा आरोप युवा सेनेचे तालुका अधिकारी नितीन शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये कामाच्या ठेक्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत दोन्ही गटांत … Read more

रोहित पवार यांच्या ‘सृजन तर्फे कर्जत मध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा !

कर्जत :- रोहित पवार यांच्या ‘सृजन’ या संस्थेच्या वतीने कर्जत-जामखेड परिसरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.  कर्जत तालुक्यातील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात रविवारी 18 ऑगस्ट आणि सोमवार 19 ऑगस्ट रोजी कुस्तीची ही स्पर्धा होणार आहे.  18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार असून 18 तारखेला कर्जत आणि जामखेड … Read more

त्यांनी काय दिवे लावले ?

श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले. काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते … Read more

रोहित पवारांचा धसका घेतल्याने पालकमंत्री शिंदेना मतदारसंघ सुटेना….

कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे. भाजप सरकार मध्ये मंत्री असूनही राज्यातील पूरग्रस्त भागात जाणे त्यांनी टाळले असून मतदार संघातच राहणे पसंत केले आहे.  कर्जत जामखेड मतदारसंघात कमी वेळ देणारे मंत्री शिंदे निवडणुका जवळ येताच मतदारसंघात रमायला … Read more

डॉक्टरांच्या मदतीमुळे वाचला गर्भवती महिलेचा जीव

राशीन :- मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूतिसाठी आली असता अचानक तिचा रक्तदाब वाढल्यामुळे प्रसुतीत अडचणी वाढल्या. तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा बांगर यांनी तत्काळ खासगी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. दयानंद पवार यांच्याशी समन्वय साधत सिझेरियनद्वारे प्रसुती पार पाडली. मंदा बबन घालमे (रवळगाव) असे या महिलेचे नाव आहे. डॉ. … Read more

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने ओळखीच्यानेच अल्पवयीन मुलीला पळवले

नगर – जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील डोरजा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीला सकाळी ७ च्या सुमारास पळवून नेले. ढोरजा गाव शिवारात बाळू वाणी यांच्या लिंबोणीच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला सदर विद्यार्थीनी उभी असताना तेथे दोरजा गावात राहणारा आरोपी अक्षय संतोष गोरे हा आला व तो विद्यार्थीनीला शाळेत सोडतो असे म्हणत तिला दुचाकीवर बसवून … Read more

जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार

पाथर्डी :- तालुक्यातील टाकळी टाकळीमानूर जिल्हा परिषद गट सातत्याने ढाकणे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांना याच गटाने राज्यात व केंद्रात पाठविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणता असेल, चिन्ह कोणते असेल, हे सांगता येणार नाही, पण तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर आगामी विधानसभा लढवणार असल्याने खंबीरपणे साथ द्यावी, असे प्रतिपादन श्री केदारेश्वर … Read more

नेप्तीत बिबट्याच्या संचाराने दहशत;विद्यार्थी व महिलांमध्ये घबराहट

अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती मध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने गावासह परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. नेप्तीत गडाख वस्ती, होळकर वस्ती, रानमळा, खळगा वस्ती येथे बिबट्या दिसून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे तर शेतीकाम करणार्‍या महिलांनी शेतात जायचे बंद केले आहे. या दहशतीपोटी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याची माहिती रामदास … Read more

नेप्तीत रॉबिन हूड आर्मीने केले गरजूंना अन्न-धान्याचे वाटप

अहमदनगर – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेप्ती (ता. नगर) येथे रॉबिन हूड आर्मीच्या वतीने दुर्बल घटक व वंचित घटकातील गरजू नागरिकांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य अरुण होळकर, मा.सरपंच विठ्ठलराव जपकर, सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच शिवाजी पाटील होळकर, सुभाष जपकर, जालिंदर शिंदे, रामदास फुले, राजेंद्र होळकर, बबन कांडेकर, बाळासाहेब होळकर, गोरक्ष फुले, … Read more

हर्षदा काकडे शेवगाव – पाथर्डीतून विधानसभेच्या रिंगणात !

शेवगाव :- लोकसभा निवडणुकीमध्ये मी आमदार संग्रामभैया जगताप यांचा प्रचार केला म्हणजे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे नाही. मी तालुक्यामध्ये जनशक्ती विकास आघाडी या संघटनेमार्फत गोरगरिबांची सेवा करते. मी अद्याप कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. चालू विधानसभेसाठी मी माझी योग्य भूमिका दिनांक १८ ऑगस्ट २०१९ च्या शेवगाव येथील मेळाव्यात जाहीर करील असे प्रतिपादन जनशक्तीच्या जि.प.सदस्या … Read more

सत्ता गेल्याने द्वेषापोटी अनुराधाताई आदिक टार्गेट

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरात अनिधिकत बांधकामे, सत्तेचा दुरुपयोग करता येत नसल्याने उपनगराध्यक्ष विरोधी नगरसेवकांचा तिळपापड होत आहे. सध्या आपल्या कार्यकाळात केलेल्या चुकीच्या कामांमुळे सगळीकडून गर्तेत आलेल्या विरोधकांनी सत्तेच्या काळात शहराचे लचके तोडलेले आहेत याची अनेक उदाहरणे येत्या अडीच वर्षात श्रीरामपूरच्या जनतेपुढे आलेली आहेत. कोणी पार्किंग गायब केल्यात तर कोणी मुतारी पाडून गाळे बांधलेले आहेत तर … Read more

आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदत जमा करण्याचे शहरात अभियान सुरु

अहमदनगर – आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने सांगली, कोल्हापूर मधील पुरग्रस्तांच्या मदत जमा करण्याचे अभियान सुरु करण्यात आले. शहरातील प्रत्येक भागात जाऊन मदत जमा करणार्‍या वाहनात जीवनावश्यक वस्तूची मदत देत या उपक्रमाची सुरुवात आ.संग्राज जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादी … Read more

निलक्रांती चौकच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर

अहमदनगर – दिल्लीगेट परिसरातील निलक्रांती चौक येथे रखडलेल्या गटारीच्या कामामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी दि.9 ऑगस्ट रोजी ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरत जाब विचारला. अडचणी दूर करुन कामाला तात्काळ गती न दिल्यास रास्तारोको आंदोलन सुरू करण्याचा इशारा माजी नगरसेवक अ‍ॅड.धनंजय जाधव व उपस्थित नागरिकांनी दिल्यानंतर रखडलेले काम वेगाने सुरू करण्यात आले. यावेळी जाधव … Read more

आर्ट ऑफ लिविंग प्राण व्यसनमुक्ती शिबिर नगर मध्ये

नगर : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्यामाध्यमातून समाजसेवेसाठी ‘प्राण’ या व्यसनामुक्ती शिबिराची निर्मिती करण्यात आली आहे, ज्याचे नगर जिल्ह्यातील केंद्रातलवकरच प्रारंभ होणार आहे. या शिबिराच्या माहिती फलकाच्या अनावरण नुकतेच नगर मधील संस्थेच्या, ज्ञान क्षेत्रातीलसामाजिक कार्यकर्ते अजित कुलकर्णी (सचिव अनामप्रेम नगर) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी … Read more