मनसेच्या वतीने आयुक्तांना स्मरणपत्र सावेडीतील खड्डेमय रस्ते दुरुस्तीची मागणी

अहमदनगर – खड्डेमय रस्त्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत असताना सावेडी उपनगरातील रस्त्याची दुरुस्तीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. अनेक दिवस उलटून देखील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले नसल्याने मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, परेश पुरोहित, अविनाश क्षेत्रे, सुनील धीवर, निलेश खांडरे आदि … Read more

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांकडून तब्बल पाच महिने लैंगिक अत्याचार

अहमदनगर –  श्रीगोंदे – गरीब कुटुंबातील १४ वर्षांच्या मुलीवर पाच महिने वेळोवेळी अत्याचार केले. ही मुलगी गर्भवती राहिल्याचे आईच्या निदर्शनास येताच बेलवंडी पोलिस ठाण्यात तिने शुक्रवारी फिर्याद दिली. भानुदास गंगाराम भिसे (३०) व नामदेव अंबू आडागळे (६५, दोघेही चिंभळे, धारकरवाडी) ही या  नराधमांची नावे आहे.  पोलिसांनी या नराधमांविरूध्द गुन्हा दाखल करत आडागळे याला अटक केली आहे.  तू मला … Read more

VIDEO NEWS : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

अहमदनगर :- मोबाइलमध्ये असलेले मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून प्रवीण दिलीप जाधव याच्या विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित मुलगी व आरोपी हे शेजारी-शेजारी रहायला आहेत. ते एकमेंकाचे ओळखीचे असल्याने मुलीबरोबर आरोपीने फोटो काढले होते. याच फोटोंचा … Read more

VIDEO NEWS : नगर जिल्ह्याच्या पाण्याची चिंता मिटली !

अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून … Read more

VIDEO NEWS : राम शिंदेंच्या फ्लेक्‍सबाजीवर सोशल मीडियातून टीका

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील कर्जत-जामखेड तालुक्‍यातील गावागावात विकास कामांचा हिशोब देणारे फ्लेक्‍स लावले आहेत.  यामध्ये गेल्या दोन टर्ममध्ये केलेल्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे. मात्र अपूर्ण कामे, कामांचा निकृष्ट दर्जा आदी मुद्दे घेत या फ्लेक्‍सबाजीवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. ना. शिंदे यांनी गावागावातील विविध कामांवर कोट्यवधी रुपयांच्या … Read more

व्याजाच्या पैशासाठी लाथाबुक्क्याने मारहाण करून, पळवून नेवून धमकी

नगर  – नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा येथे राहणारे शेतकरी प्रशांत मारुती शिंदे, वय ३४ यांनी आरोपी जगदाळे यांच्याकडून घेतलेल्या पैशावरील व्याजाच्या पैशाच्या कारणावरुन आरोपींनी प्रशांत शिंदे या शेतकऱ्यास बोलावून घेतले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करून धमकी देवून दुचाकीवर बसवून पळवून नेले. शेतकऱ्याच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले व जिवे ठार मारण्याची धमकी … Read more

गल्लीत राहणाऱ्याकडून घरात घुसून बलात्कार

नगर  – नगर शहरात काटवन भागात एका गल्लीत राहणाऱ्या १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर ती घरी एकटी असताना गल्लीतच राहणारा आरोपी प्रविण दिलीप जाधव हा घरात आला व शरीरसंबंधाची मागणी केली. त्यावेळी अल्पवयीन तरुणीने विरोध करत आरडाओरडा केला. मात्र आरोपी प्रविण जाधव याने मोबाईलमध्ये असलेले दोघांचे फोटो मी व्हायलर करील, अशी धमकी देवून बळजबरीने अल्पवयीन … Read more

मुलाकडून आईचा खून

राहुरी – राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल ६८ वर्षीय वृद्ध मातेची पोटच्याच मुलाने दारुच्या नशेत डोक्यात टणक वस्तुने प्रहार करुन हत्या केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील तांभेरे येथिल जगताप कंन्ट्रकशन्स या भागात ईदुबाई गोविंद लांडे, वय वर्ष ६८ व त्यांचा मुलगा राजेद्र गोविंद लांडे, वय वर्ष ४२ असे दोघे मायलेक राहत होते. राजेद्रचे लग्न … Read more

पिचड यांना पवार साहेबांनी खूप काही दिले तरी त्यांनी पक्षांतर केले

पारनेर :- पिचड साहेबांनी पक्षप्रवेश केला कारण त्यांच्या पत्नीविरोधात फसवणुकीचे प्रकरण आहे. पिचड यांच्या पत्नी ज्या बिगर आदिवासी आहेत. त्यांनी खोटे आदिवासी सर्टिफिकेट दाखवून आदिवासी शेतकऱ्यांची जमीन लाटली आणि समृद्धी महामार्गाच्या नावावर सरकारकडून १४ कोटी ५० लाख रुपयांचा मोबदला घेतला. त्यामुळे पिचड यांनी भाजपत प्रवेश केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी … Read more

कारवाई होऊनही जुगार सुरूच

शेवगाव – येथील इंदिरानगर भागातील हनुमान मंदिराच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्याकडून 16 हजार 110 रुपयांची रक्कम, 85 हजार रुपयांच्या तीन दुचाक्‍या व साहित्य असा एकुण एक लाख एक हजार 110 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी रात्री उशिरा केली. याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.कॉं. प्रकाश वाघ यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. … Read more

पूरग्रस्त भागातील लोकांना सर्व प्रकारे मदत करणार : रोहित पवार

कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले. कर्जत तालुक्‍यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्‍यातील खेड, औटेवाडी, … Read more

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज माफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार !

अहमदनगर :- दुष्काळामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडल्याने त्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील ग्रामस्थांनी दिला आहे. बाबुर्डी बेंद येथे शनिवारी झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव करण्यात आला आहे. या ग्रामसभेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्याबाबतचे … Read more

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कर्जत  – भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, कर्जत तालुक्‍यातील सिद्धटेक पूल पाण्याखाली गेला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्याने रविवारी (दि. 4) रात्री सात वाजल्यापासून दौंड पोलिसांनी पुलावरून सुरू असलेली वाहतूक बंद केली आहे. खेड-भिगवणमार्गे वाहतूक करण्याचे प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे. चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भीमा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. … Read more

हर्षदा काकडे पुन्हा जनशक्‍ती संघटनेकडून निवडणूक रिंगणात

शेवगाव – शेवगावच्या राजकीय पटलावर घुलेंपाठोपाठ काकडे यांचे नाव घेण्यात येते. वर्षानुवर्ष घुलेंच्या विरोधात राजकारण करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतरही पक्षाकडून त्यांचा कोणताही विचार होत नसल्याने सध्या त्या कोणता पक्ष तिकिट देणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीची तयारी त्यांनी सुरु केली आहे. पण … Read more

आ. औटींची विधानसभेची उमेदवारी अडचणीत

पारनेर :- तालुक्याचे शिवसेनेचे आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात नगर आणि पारनेर तालुक्यातील पदाधिका-यांसह शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर तक्रारीचा पाढा वाचला. त्यानंतर ठाकरे यांनी आ. औटी यांच्यावर नाराजी व्यक्त करत समज दिला. शिवसैनिकांची वाढती नाराजीमुळे आ. औटींची विधानसभेची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसैनिकांची वाढती नाराजीमुळे आ. … Read more

गोळीबारातून डॉक्टर बचावले, धाडसामुळे खंडणीखोर पकडले !

अहमदनगर :- शहरातील साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश उत्तम चहाळ यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघा जणांना डॉक्टर चहाळ यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गजांआड केले. खंडणी म्हणून दिलेल्या पैशांच्या बॅगेमध्ये रद्दी कागद आढळल्यानंतर खंडणी मागणाऱ्या एकाने डॉक्टरवर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली. डॉक्टर चहाळ यांनी प्रसंगावधान दाखवून गोळी हुकवून स्वतःला … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली

पारनेर ;- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली असून, त्याचाच परिपाक म्हणजे बाजार समितीच्या नऊ संचालकांचे सामूहिक राजीनामे होय. हे राजीनामा धक्कातंत्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्‍यात संघर्ष करावा लागेल. झावरे गटातील बाजार समितीच्या उपसभापतिंसह नऊ संचालकांच्या राजीनाम्यामुळे झावरे हे इतर पर्यायांच्या शोधात असल्याची चर्चा असून, तालुक्‍यात राजकीय भूकंप … Read more

पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन आवश्‍यक

शेवगाव- पावसा अभावी परिसरातील पीके जळून चालली आहेत. सध्या पन्नास टक्‍क्‍यांच्यावर भरलेल्या मुळा धरणातून आव्हाणे परिसरातील टेलच्या गावांना किमान पिण्यासाठी एकतरी आवर्तन सुटावे अन्यथा हेच हक्काचे पाणी नंतर मराठवाड्यात निघून जाईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वेळीच जागे होण्याची गरज आहे, पाण्यासाठी तरी राजकारण व्हायला नको असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले. तालुक्‍यातील आव्हाणे बु. येथे … Read more