स्थापत्य अभियंता लाचेच्या जाळ्यात

पाथर्डी  – जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी पाथर्डी पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता पंढरीनाथ उत्तम आव्हाड यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्याची तक्रार केल्यानंतर आव्हाड यांना लाचलुचपत पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नवीन बसस्थानका शेजारील चहाच्या दुकानात सायंकाळी आव्हाड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले आहे. याबाबत … Read more

‘रोहित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री’ !

कर्जत :- ‘रोहित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील, मात्र यासाठी जनतेने त्यांच्यामागे उभे राहण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन अरण येथील सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांनी केले. पंढरपूर येथे आषाढीवारीला जाऊन आलेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व वारकऱ्यांचा व दिंडी प्रमुखांचा सृजन वैष्णव पूजन कार्यक्रम येथील श्रीराम मंगल कार्यालयात झाला. कार्यक्रंमाचे अयोजन … Read more

पंचवीस वर्षीय तरुणाची रेल्वे खाली आत्महत्या

अहमदनगर :- नगर – कल्याण रोडवरील उड्डाणपुलाखाली सागर छबूराव साळवे (रा.बुऱ्हाणनगर) या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. गोवा एक्‍सप्रेस रेल्वेखाली सापडून साळवेचा मृत्यू झाला. सागर याने आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा झाला नाही. सागर याचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला एक दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, 1 भाऊ पत्नी असा परिवार … Read more

दुसऱ्याचं वैभव पाहून आपले पोट भरणार नाही – ना.प्रा.राम शिंदे

मतदार संघातील आपल्या संर्वांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावरच कर्जत-जामखेड मतदार संघाला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आणि मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यासह कर्जत-जामखेडकरांची इमाने-इतबारे सेवा केली. केवळ वैयक्तिक संस्था, कारखाने न काढता संपूर्ण मतदार संघालाच परिवार मानून आजवर विकासापासून वंचित राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकासाचा अनुशेष मोठ्याप्रमाणावर भरून काढण्यात यशस्वी झालो. कधीकाळी विरोधात असलेले विरोधक देखील आज सोबत आहे … Read more

केडगाव हत्याकांडप्रकरणी आ. जगताप व आ. कर्डिले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

नगर : केडगाव हत्याकांड दरम्यान संदीप कोतकरला मोबाईल फोन वापरू दिल्याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले. पण त्याच्याशी आ. संग्राम जगताप व आ. शिवाजीराव कर्डिले या दोघांनीही मोबाईलवरुन संपर्क साधल्याचे स्पष्ट झालेले आहे तर मग या आमदारांवर निलंबनाची कारवाई का झाली नाही असा सवाल मयत वसंत ठुबे यांचे बंधू प्रमोद ठुबे यांनी विचारला … Read more

उपनगरात अद्यावत आरोग्य सुविधांची गरज -खा.डॉ.सुजय विखे

अहमदनगर ;- शहर छपाट्याने वाढत असताना उपनगरात अद्यावत आरोग्य सुविधांची गरज आहे. सर्व तज्ञ डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी पुढाकार घेऊन सुरु केलेले लोटस हॉस्पिटलचा लाभ सर्वसामान्यांना होणार असल्याची भावना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. केडगाव येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोटस हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटरचे शुभारंभाप्रसंगी डॉ.विखे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प … Read more

दुसरी बायको करुन दे, असे म्हणत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ

अहमदनगर :- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात चोमेवाडी परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी रोहिणी नवनाथ निंबाळकर (चोमे) हिने माहेरचे नातेवाईक मामा यांच्याकडून शेतीचे कामाकरिता व दुकानासाठी पैसे आणावेत म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करुन तुला घरातील काम नीट येत नाही. तू येथे राहू नको, तसेच नवरा नवनाथ सुभाष निंबाळकर याला दुसरी बायको करुन दे, असे … Read more

संडास बांधण्यासाठी विवाहितेचा छळ

नगर :- तालुक्यातील खातगाव टाकळी येथील सौ. वृषाली निलेश मेढ, वय २१ वर्ष ही सासरी नांदत असताना तिने माहेरच्या लोकांकडून संडास बांधण्यासाठी १ लाख रुपये आणावेत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. वेळोवेळी पैशाची मागणी करत तू आयटीआय कोर्स करायचा नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन धमकी दिली. उपाशीपोटी ठेवले. या त्रासास कंटाळून वृषाली निलेश … Read more

भूमिपुत्र संघटनेची माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरासमोर घोषणाबाजी

श्रीगोंदा ;- साईकृपा व कुकडी साखर कारखान्यानी श्रीगोंदा, आष्टी,दौंड,जामखेड,कर्जत, या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे करोडो रुपयाचे बिल थकवले असून, यामुळे शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे व ऊस वाहतूकदारांचे थकीत पैसे, साखर कामगारांचे थकीत वेतन लवकर देण्यात यावे, या मागणीसाठी साखरसाम्राट आणि पारंपरिक राजकीय नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते व श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप … Read more

माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी शिक्षिकेचा छळ

अहमदनगर :- हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी शिक्षिकेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिक्षिका दीपाली रवींद्रकुमार घुमटकर यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर पती रवींद्रकुमार घुमटकर, सासू संजीवनी तुकाराम घुमटकर, हेमंत तुकाराम घुमटकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी छळाचा हा प्रकार घडला आहे. … Read more

…तर निवडणुकीला उभा राहणार नाही : पालकमंत्री राम शिंदें

जामखेड :- १२ खाती मी सांभाळल्यामुळे जिल्ह्यात कोणत्याच तालुक्याला मिळाला नाही इतका निधी कर्जत-जामखेड तालुक्यात आणला. सावरगाव येथे सव्वासहा कोटींचा निधी विविध कामांसाठी दिला. काम न केल्याचे सिद्ध केले, तर निवडणुकीला उभा राहणार नाही. असे वक्तव्य पालकमंत्री राम शिंदें यांनी जामखेड येथे बोलताना केले. पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात प्रत्येक गावात विकासकामांसाठी निधी दिला. केलेल्या कामाचा … Read more

अ‍ॅड. प्रताप ढाकणे विधानसभा निवडणूक लढविणार !

पाथर्डी :- राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुलाखत देणारे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी काल कार्यकर्ता मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे. संस्कार भवनात आयोजित करण्यात आलेल्या या निर्धार मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडून दुसर्‍या पक्षातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला.  तर अनेकांनी भाजपा, शिवसेना किंवा बहुजन वंचित … Read more

जगताप परिवाराला भाजप मध्ये ‘नो एन्ट्री’ !

अहमदनगर :- अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड येत्या दोन-तीन दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदा मतदारसंघातील आमदार राहुल जगताप हेही भाजपामध्ये जाण्यास उत्सुक आहेत. मात्र पिचड यांना ‘एन्ट्री’ दिलेल्या भाजपातून दोन्ही जगतापांना मात्र ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शहराचे आमदार संग्राम … Read more

‘राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम या युती सरकारने केले – आ.डॉ सुधीर तांबे

पारनेर :- ‘राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम या युती सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकारला शेतीमालाच्या भावाविषयी काही देणेघेणे नाही. साखर कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत. मोदी सरकारला जनसामान्यांच्या व देशाच्या प्रश्नांविषयी काही देणेघेणे नाही अशी टीका आ.सुधीर तांबे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर केली.पारनेर तालुक्यातील … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होतेय – सुजित झावरे

पारनेर :;- यापुढील काळात पक्षापेक्षा जनतेची कामे करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्याचे सूचित करत माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. ढवळपुरी येथे वाघवाडी ते गावाडे वाडी रस्त्याचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना राजकीय भाष्य केले. विधानसभा निवडणुकीसाठी झावरेे यांच्यासह … Read more

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत बलात्कार

पाथर्डी – तालुक्‍यातील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत पीडित मुलगी व तिच्या पित्याच्या जबाबावरून पाथर्डी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्‍यातील 17 वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत होती. पोकलेन … Read more

आदित्य ठाकरेंनी लावलेले ‘ते’ झाड काही तासात गायब !

पारनेर – राज्यभरात नेतेमंडळी, सेलिब्रिटी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत नागरिकांचा जोश वाढवत आहेत. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे जनआशिर्वाद यात्रेनिमित्त पारनेर तालुक्यात आले होते. दौऱ्या दरम्यान ठाकरे यांच्या हस्ते काळेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. परंतु त्यांचा ताफा टाकळी ढोकेश्वरकडे रवाना होताच झाडच गुडब् झाले !. ठाकरेंनी लावलेले ते झाड गेले कुठे ? कोणी गायब केले … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीला आ. जगताप – पिचड यांची गैरहजेरी !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक दिलीप वळसे व अंकुश काकडे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी दि. २५ जुलै रोजी घेण्यात आल्या. कर्जत – जामखेड मतदार संघासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुलाखत दिली. तर या मुलाखतीला आ. संग्राम जगताप व आ. वैभव पिचड … Read more