त्यावेळी कै.बाळासाहेब विखेंचे म्हणणे ऐकले आणि सुजय विखे आज खासदार झाले….

अहमदनगर :- नगर दक्षिणेतून सुजय विखे यांनी अडीच लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयाकडे वाटचाल करत आहेत. सुजय विखे यांनी हा विजय त्यांचे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण केला. नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद, … Read more

99115 मतांनी सुजय विखे आघाडीवर ! Sujay Vikhe Vs Sangram Jagtap Live Updates

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे सातत्याने आघाडीवर असून 9 व्या फेरीत सुजय विखे यांनी 99115 मतांनी आघाडी घेतली आहे. 99115 मतांनी सुजय विखे आघाडीवर आहेत,भाजपचे डॉ सुजय विखे यांना 252927 मते तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना 153812 मते मिळालीत. नगर दक्षिण निकाल पहाण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा https://www.ahmednagartimes.com/2019/05/loksabha-results-sujay-vikhe-vs-sangram-jagtap-live-updates.html फेसबुक पेज वर निकाल पहाण्यासाठी https://www.facebook.com/ahmednagarlive24 ट्विटर अकाऊन्ट वर निकाल पहाण्यासाठी https://twitter.com/ahmednagarlive

Live-updates : संग्राम जगताप Vs सुजय विखे कोण होणार खासदार ?

Loksabha Elections 2019 Results : लोकसभा निवडणूक निकाल येण्यास अवघ्या काही क्षणात सुरुवात होईल. निकालाचे अचूक आणि सुपरफास्ट अपडेट्स देण्यासाठी आमची टीमही सज्ज आहे.  वेबसाईट,मोबाईल App,Whatsapp फेसबुक, ट्विटर आणि पासून  नोटिफिकेशनद्वारे अहमदनगर Live24 व अहमदनगर Times Group तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नगर दक्षिण निकाल पहाण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा https://www.ahmednagartimes.com/2019/05/loksabha-results-sujay-vikhe-vs-sangram-jagtap-live-updates.html फेसबुक पेज वर निकाल पहाण्यासाठी https://www.facebook.com/ahmednagarlive24 ट्विटर अकाऊन्ट वर … Read more

अशी असेल मतमोजणी प्रक्रिया

अहमदनगर :- सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील. अहमदनगर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून क्रमाने मतमोजणीसाठी नेण्यात येतील. मतमोजणीच्या ठिकाणी सीआरपीएफचे सुरक्षा कडे असणार आहे. बाहेरील बाजूस एसआरपी आणि पोलीस बंदोबस्त राहील.37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 18 लाख 54 हजार 248 … Read more

मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइलवर बंदी !

अहमदनगर :- निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्या कामासंबंधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त मोबाइल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणचे २०० मीटरचे आतील परिसरात घेऊन जाता येणार नाही.  तसेच २०० मीटरच्या आतील परिसरात पीसीओ चालू ठेवता येणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोणीही व्यक्ती … Read more

मतमोजणीच्या परिसरात जमावबंदी

अहमदनगर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी ८ वाजेपासून वखार महामंडळ गोदामात होणार आहे.  त्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केला आहे. या परिसरात उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर राहण्याची शक्यता आहे.  तसेच मतमोजणी प्रक्रियेत खीळ घालण्याचे उद्देशाने व बाधा निर्माण करण्याच्या … Read more

उद्या दारूची दुकाने बंद !

राहुरी | नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी २३ मे रोजी कोरडा दिवस पाळण्याचा आदेश दिला. या दिवशी जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, परवाना कक्ष, देशी-विदेशी दारु दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येतील. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास … Read more

ब्रेकिंग : कर्जत तालुक्यात राजकीय भूकंप

कर्जत : पंचायत समितीच्या होणाऱ्या सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या साधना कदम यांना गळाला लावून भाजपाने राष्ट्रवादीला सुरुंग लावला. कर्जत तालुक्यात ना.प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवून देत राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक केले असून, सभापतीपदावर कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे. कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड असून, यावेळी बहुमतातील … Read more

गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

जामखेड :- येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील शिक्षिका विजया नितीन वराट (वय ४०, माहेरचे नाव विजया सीताराम गुजर) यांनी बुधवारी मध्यरात्री तपनेश्वर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शिक्षण विभागात व परिसरात खळबळ उडाली. अंत्यविधी गुरूवारी सकाळी झाला. त्यांच्यामागे पती, मुलगी, मुलगा, सासू-सासरे, आई-वडील,भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले … Read more

आनंदाची बातमी : 11 जूनला महाराष्ट्रात मान्सून धडकणार !

मुंबई :- दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत आपला अंदाज वर्तवला असून मान्सून यंदा 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण पाच दिवसांमध्ये म्हणजे 11 जूनला महाराष्ट्रात धडकणार, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याने विकसित केलेल्या सांख्यिकी प्रारूपाच्या आधारावर हा अंदाज वर्तवण्यात आला … Read more

जमीन विकण्यास विरोध केल्याने पत्नीवर केले चाकूने वार !

अहमदनगर : जमीन विकण्यास हरकत घेणाऱ्या पत्नीस शिवीगाळ करून तिच्या हातावर चाकुने वार करून तिला जखमी केले. ही घटना विळद घाट येथील इंजिनिअरींग कॉलेजवळ शनिवारी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, सुवर्णा सुभाष सानप (रा.विळदघाट, इंजिनिअरींग कॉलेजवळ) या घरी असताना त्यांचा पती सुभाष बाजीराव सानप हा त्यांना म्हणाला की, मी माझी जमीन विकणार आहे. तू … Read more

कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित

जामखेड : साहेब रोहितदादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ असे साकडे जामखेडमधील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांना घातले. यावर पवारांनी दिलेली दिलखुलास दाद कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो संदेश देणारी ठरली. यावेळी गाडीत मागे बसलेल्या रोहितकडे कटाक्ष टाकत ‘तुझी मागणी झाली’ असे पवार म्हणताच कार्यकर्त्यांना कामाला लागा असाच संदेश गेला. पवारांची भेट अन् कार्यकर्त्यांच्या मागणीवर पवारांनी दिलेली … Read more

प्रेमीयुगुलाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत सापडले

शेवगाव :- तालुक्यातील हिंगणगाव येथील प्रेमीयुगुुलाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गावातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला, याबाबत दोन्ही कुटुंबीयांकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांना काहीही हालचाल करता आली नाही. शवविच्छेदनही होऊ शकले नाही. हा प्रकार रविवारी रात्री विहीरमालक संपत मिसाळ यांच्या लक्षात आला. सोमवारी पोलिस व ग्रामस्थांनी … Read more

श्रीगोंद्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध,पाचपुतेंच्या पराभवासाठी जगताप – नागवडे एकत्र

श्रीगोंदा :- तालुक्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. जि. प. महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत नुकतेच पत्रकार परिषदेत दिले. आमदार राहुल जगताप यांनीही नागवडे आणि आमच्यात कुठलेही मतभेद नसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार आम्ही एकत्र राहून बबनराव पाचपुते यांचा पुन्हा पराभव करू, असे ‘बोलताना शुक्रवारी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने … Read more

…तर विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू : अनुराधा नागवडे

श्रीगोंदा :- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवारी दिल्यास विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू. शरद पवार जेव्हा सांगतील, त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू, असे जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी बुधवारी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाल्या, पिण्याच्या पाण्यासाठी कुकडीचे आवर्तन सुटले आहे. मात्र, त्यातून संपूर्ण … Read more

धक्कादायक : पित्याने नव्हे तर नराधम पतीनेच तिला अंगावर पेट्रोल ओतून मारले ? पारनेर तालुक्यातील निघोज प्रकरणाला वेगळेच वळण…

अहमदनगर :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलींग प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे.  अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानीया, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन … Read more

दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीर पणे उभे – पालकमंत्री राम शिंदे

कर्जत : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता मंत्र्यांचे  दुष्काळी दौरे सुरु झाले आहेत . पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर, श्रीगोंदा, कर्जत आणि  जामखेड या तालुक्यात दुष्काळी दौरा केला.  ‘दुष्काळात कोणत्याही प्रकारे उपायोजना करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही. पिण्याचे पाणी, तसेच पशूधन वाचवण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. टंचाईची स्थिती असली, तरी काळजी … Read more

लग्न करण्याच्या वादातून चक्क तिने प्रियकरावरच केला ॲसिड हल्ला!

अहमदनगर : आपण युवकाने युवती वर ॲसिड हल्ला केल्याचे बऱ्याच वेळा ऐकले असेल. पण नगर मध्ये मात्र युवतीने युवकावर ॲसिड फेकण्याची घटना घडली.  नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये युवकावर ॲसिड हल्ल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.  बुरखाधारी व्यक्तीने हा हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार … Read more