डॉ सुजय विखेंची उमेदवारी जनतेची

पारनेर :- पवार साहेबांचे ऐकणारे पाहिजेत, म्हणून विखे यांना विरोध करायचा, हा राष्ट्रवादीचा एककलमी कार्यक्रम आहे. विखे हे कधीच आपल्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, हे पवार साहेबांना माहीत असल्याने त्यांनी या निवडणुकीत आपल्याला विरोध करण्याचे धोरण घेतले. त्यांना बस म्हटले की बस व उठ म्हटले की उठणारा खासदार पाहिजे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे … Read more

पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांची भीती

अहमदनगर :- नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थानचे राज्य चालवायचे … Read more

सुजय विखे पाटलांसाठी स्मृती इराणी,मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंच्या सभा

अहमदनगर : महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री ना.स्मृती इराणी यांची जामखेड येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० एप्रिल रोजी कर्जत येथे तर ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची २० एप्रिल रोजी शेवगांव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे संयोजक प्रसाद ढोकरीकर यांनी दिली. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नगर … Read more

लोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा – डॉ. सुजय विखे

जामखेड :- निवडणूक विचाराची आहे. मतदान करताना विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करा. दोन्ही उमेदवारांची कौटुंबिक पाश्र्वभूमी तपासा, समोरच्या उमेदवाराची सखोल माहिती घेऊनच मतदान करा. कुणाची दहशत आणि गुंडगिरी आहे हे पहा आणि लोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा, असे आवाहन भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केले. जामखेडमधील प्रचारसभांमध्ये ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे … Read more

श्रीगोंद्यातील युवतीला फसवणाऱ्या तरुणाचा शोध सुरू

श्रीगोंदे :- अजूनज परिसरातील युवतीस फसवून शारीरिक संबंध ठेवणारा गार येथील विनायक पांडुरंग मगर याचा शोध दौंड पोलिस घेत आहेत. दरम्यान, आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पीडित मुलगी बारामती येथील खासगी कंपनीत नोकरी करत असताना मगर याने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. गर्भवती राहिल्यावर ती माझ्याशी लवकर लग्न कर … Read more

माजीमंत्री पाचपुते आणि आमदार कर्डिलेंकडून खासदार गांधींना टोमणे

अहमदनगर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते व आमदार शिवाजी कर्डिले यांनी खा.दिलीप गांधीना टोमणे मारले. माजी मंत्री पाचपुते यांनी साकळाईसाठी आपण कसे प्रयत्न केले, याचा पाढा वाचला. मागील सभेत खासदार गांधी यांनी डॉ. विखेंना मतदान करा एवढे म्हटले असते, तरी लोकांनी डोक्यावर घेतले … Read more

महिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवून मारहाण

अहमदनगर :- भांडण झालेल्या तरुणास घरात लपवून ठेवल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका महिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवत मारहाण केली. केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुप्रिया महेश गाडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. फिर्यादीच्या घरासमोर मोठ्याने आरडाओरड सुरू होती. ते … Read more

सुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल !

श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार? सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, … Read more

…म्हणून राष्ट्रवादीने सुजयला उमेदवारी नाकारली

श्रीगोंदे :- पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे ऐकेल अशांनाच ते उमेदवारी देतात. यापूर्वी बाळासाहेब विखे यांनी पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष केला. उद्या सुजय विखे शेतकऱ्यांसाठी पुणेकरांशी दोन हात करेल. म्हणूनच मी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही सुजयला त्यांनी उमेदवारी नाकारली. असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कुकडी आणि घोड धरणासह भीमा नदीला पाण्यासाठी … Read more

प्रेमप्रकरणातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म; तरुणाविरुद्ध गुन्हा.

श्रीगोंदे :- तालुक्यातील अजूनज परिसरात युवती व गार येथील विनायक पांडुरंग मगर यांच्या प्रेमप्रकरणात प्रियकराने लग्न न करताच शारीरिक संबंध ठेवल्याने प्रेयसीने एका बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाला विनायक मगरने स्वीकारण्यास तयार नसल्याने पीडित कुमारी मातेने याबाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल केला. ही घटना दौंड परिसरात घडली असल्याने गुन्हा दौंड पोलिसात वर्ग करण्यात आला, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे पुन्हा डोके वर.

अहमदनगर :- जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा ज्वर वाढू लागला आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ३३ संशयीत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संशयित रुग्णांवर तातडीने उपाय करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठ ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती … Read more

दोन युवकांना तरी नोकरी दिली का?

पाथर्डी :- शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काहीच बोलत नाही. फक्त कागदावरच कर्जमाफी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख आदी फसव्या घोषणांची गाजरं दाखविण्याचे काम केले. दोन कोटीऐवजी दोन युवकांना तरी या सरकारने नोकरी दिली का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, असा खोचक सवाल आमदार संग्राम जगताप यांनी … Read more

सात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक.

पारनेर | गेल्या सात महिन्यांपासून अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी अटक करत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पारनेर शहराजवळील उपनगरात ही घटना घडली. सतीश बन्सी उमाप (३५, राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे. अत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, १२ सप्टेंबर २०१८ रोजी लहान मुलांच्या मंडळाची गणपती बसवण्याची तयारी करत असताना सतीशने … Read more

‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर :- एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची एकांगी, एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल, अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीने नोटिस बजावली होती. त्याचा खुलासा विखे यांनी शनिवारी सादर केला आहे. … Read more

सुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही !

अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे. भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला. तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी … Read more

Live : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र मोदी.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांचे लाज वाटणारे वक्तव्य, ही विरोधकांची ओळख – मोदी इतिहास साक्षी आहे, भारतात स्वराजाची संकल्पना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवली – मोदी जो पैसा मध्य प्रदेश सरकारला कुपोषण निर्मुलनासाठी दिला, तोच पैसा काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे – मोदी काँग्रेस हटाव, तरच देश पुढे जाईल – मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर … Read more

Live Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होत आहे. Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल? – मोदी जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत … Read more

छगन भुजबळ यांची श्रीगोंद्यात सभा.

श्रीगोंदे :- माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांची सभा १५ ला श्रीगोंद्यात होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती विकास आघाडी, आरपीआय कवाडे गट व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ दुपारी ३ वाजता संत शेख महंमद महाराज पटांगणात ही सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष … Read more