भाजप प्रवेश झाला आता सुजय विखेंसमोर आहे ‘हे’ आव्हान.

अहमदनगर :- दक्षिण लोकसभा मतदार संघात डॉ. विखेंना उमेदवारी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी शहर भाजपमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातून मोठे मताधिक्य मिळवण्याचे आव्हान डॉ. विखेंसमोर असणार आहे. पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधून डॉ. विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप उघड नाराजी व्यक्त केली जात नाही. उलट युवा नेतृत्व असलेल्या सुजय … Read more

जिल्ह्याच्या राजकारणात आमदार शिवाजी कर्डिले ‘किंगमेकर’

राहुरी :- डाॅ. सुजय विखे यांना भाजपत घेण्यात किंगमेकर ठरले ते आमदार शिवाजी कर्डिले. तनपुरे कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभप्रसंगी डाॅ. विखे यांना भाजपत येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले होते.  तुम्ही भाजपत आलात, तर खासदार झालात म्हणून समजा, घाटावर रहायला या असे ते म्हणाले होते. सुरुवातीला डाॅ. विखे आपण अपक्ष उमेदवार आहोत, असे सांगत होते.  मात्र, राहुरीत … Read more

लष्करी अधिकाऱ्याकडून विनयभंग.

अहमदनगर :- लष्करी भागातील अधिकाऱ्यांचे निवासस्थान येथे लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी कॅप्टन जे. सुरेश यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  लष्करातील अधिकाऱ्याच्या पत्नीने याबाबत फिर्याद दिली आहे. अधिकारी निवास असलेल्या ऑफिसर एन्क्लेव्ह, जे. के. रोड येथे हा प्रकार घडला. फिर्याद देणारी महिला सोमवारी सांयकाळी आपल्या घरातील बाल्कनीमध्ये बसली होती. … Read more

कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत डॉ सुजय विखे यांचा निषेध !

पाथर्डी : डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाचे मंगळवारी शहरात पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत डॉ. विखे यांचा निषेध केला.  मंगळवारी (१२ मार्च) डॉ. सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश करताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी विखे यांच्या निषेधाच्या घोषणा देत फटाके फोडले. या वेळी बोलताना नगरसेवक बंडू बोरुडे म्हणाले की, ‘विखे कुटुंबाने … Read more

सुजय विखेंच्या प्रवेशाने खासदार दिलीप गांधी अस्वस्थ !

अहमदनगर :- डॉ सुजय विखे यांचे संभाव्य भाजप प्रवेशाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला असतानाच , खासदार दिलीप गांधी हे दिल्लीत तळ ठोकून होते त्यांनतर आता ते मुंबईत आले आहेत.   येत्या दोन दिवसांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिलं यादी जाहीर होणार आहे. या यादीत आपल्या नावाच्या समावेशासाठी खा . गांधी हे दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत … Read more

राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्षनेते पद सोडणार?

अहमदनगर :- सूजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता असताना पक्ष आपल्यासाठी एक जागा मिळवू शकत नसेल तर अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढील भुमिका ठरवावी लागेल, असा इशारा ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाला दिला आहे.  डॉ.सुजय यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चुकीचे चित्र मतदारांसमोर जाईल. त्यामुळे … Read more

पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ !

अहमदनगर :- डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ राधाकृष्ण विखे पाटलांवर येवू शकते.  ‘काहीही झाले तर मी निवडणूक लढवणारच. कोणताही पक्ष मिळाला नाही तर अपक्ष म्हणून उभा राहणार,’ असा हट्‌ट सुजय विखे यांनी कायम ठेवला असल्याने राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली होती. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडावी … Read more

…म्हणून गेले सुजय विखे भाजपात !

अहमदनगर :- ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला असलेली नगर लोकसभेची जागा आपल्याला सोडण्यात येईल, अशी खात्री विखे-पिता पुत्रांना होती पण खा. शरद पवार यांनी नगरची जागा ‘राष्ट्रवादी’लाच राहील, असे वारंवार स्पष्ट केल्यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वर्तुळापर्यंत मजल मारली; मात्र नगरची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही. त्यावर सुजय यांनी ‘राष्ट्रवादी’त जाण्याचीही तयारी दर्शविली; परंतु त्यांना पक्षात घेण्यासही … Read more

….आणि महाजन व विखे पाटील एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईला गेले !

अहमदनगर :- जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले डॉ. सुजय विखे यांनी शनिवारी सायंकाळी नगर शहराजवळील विखे फौंडेशनच्या आवारातून एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईकडे उड्डाण केले. राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर डॉ. विखे यांनी काल, शुक्रवारी महाजन यांची जळगावमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर लगेच महाजन शनिवारी दुपारी नगरमध्ये आले होते, … Read more

संत निंबराज महाराज यांच्या वेबसाईटचे प्रकाशन संपन्न.

श्रीगोंदा :- तालुक्यातील देवदैठण येथे निंबराज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ह.भ.प श्री. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या हस्ते संत निम्बराज महाराज यांच्या वेबसाईटचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी संत निंबराज देव देवस्थानाचे सर्व ट्रस्टी मंडळी व समस्त ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. सारंग दंडवते यांच्या संकल्पनेतून बनविलेल्या ह्या वेबसाईट वर संत निंबराज महाराज यांच्याबाबत माहिती तसेच बातम्या, कथा,आरती,पारायण,संतवानी, देवस्थान … Read more

आ.राहुल जगताप यांना चार वर्षांत काही करता आले नाही !

श्रीगोंदे :- चार वर्षांत भाजप सरकारने तालुक्यात आपली सत्ता नसतानासुध्दा मागेल तेथे निधी देऊन विकासाला गती दिली. या विकासकामांमुळे लोकप्रतिनिधीची पोटदुखी वाढली, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे सांगितले. रस्ते, पथदिवे, नळपाणी, संरक्षक भिंत अशा दीड कोटीच्या कामाचा प्रारंभ पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झाला. जि. प. सदस्य सदाशिव पाचपुते, माउली पाचपुते, सुनील दरेकर, बबनराव … Read more

लोकसभेच्या तिकिटासाठी सुजय विखे पाटील आता भाजपच्या दारात !

मुंबई :- विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आहे. भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये काल बैठक झाली … Read more

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून अरुणकाका जगताप यांच्या नावावर शिक्का मोर्तब ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या नगर दक्षिणच्या जागवेरुन तिढा कायम असून आता पुन्हा अरुण काका जगताप यांचा नावाची चर्चा सुरु आहे. निवडणूका जाहीर होण्या अगोरदच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नगर दक्षिणच्या जागवेर चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. नगर दक्षिणच्या जागेसाठी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. त्या … Read more

लोकसभेआधीच युवा नेते डॉ.सुजय विखे बनले ‘खासदार’!

अहमदनगर :- लोकसभेसाठी इच्छुक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत असलेले विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर निवडणुकीच्या आधीच खासदार म्हणून घोषित केलय. दररोज वेगवेगळ्या पक्षातून तिकीट मिळण्याबाबत बातम्या येत असताना ठोस काही निर्णय होत नसल्याने विखे समर्थकांची घालमेल वाढली असून विखे पाटील हाच एक पक्ष आहे, … Read more

आठ दिवसांत सुरू न झाल्याने ६ छावण्यांची मान्यता रद्द

अहमदनगर :- परवानगी मिळूनही आठ दिवसांत चारा छावणी सुरू न केल्याने सहा संस्थांची छावणीची परवानगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केली. एका गावात दोन-तीन छावण्यांना मान्यता दिली आहे. मान्यता मिळूनही छावण्या सुरू केल्या नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात १५१ चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसांत छावणी सुरू होणे बंधनकारक … Read more

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात पंधरा दिवसांआड पाणी !

जामखेड :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावाने सध्या तळ गाठला असून तलाव कोरडा पडल्याने तलावातून पाण्याच्या मुख्य टाकीत पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे सध्या मोटारी लावून पाणी चारीत सोडले जाते व चारीतून टाकीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शहराला पंधरा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा … Read more

लोकसभेसाठी मोनिका राजळेचां खा. दिलीप गांधीना पाठिंबा.

पाथर्डी :- ताई, तुम्हाला लोकसभेसाठी शुभेच्छा मतदारांमध्ये तुमची इमेज खूप चांगली आहे. लोकसभा, विधानसभा सगळीकडे वातावरण चांगले आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पालवे म्हणताच आमदार मोनिका राजळे यांनी लोकसभेची इच्छा नाही, मी आहे तेथेच बरी आहे. राजकारणात मी नवीन आहे, अजून शिकू द्या, असे सांगत लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेत नसल्याचे सांगत विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवण्याची … Read more

अनुराधा नागवडेंच्या उमेदवारीस काँग्रेसच्याच नेत्यांचा विरोध

श्रीगोंदे :- नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यास तालुक्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा विरोध असून ते डॉ. सुजय विखे यांच्यासाठी शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. नगरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने शरद पवार व अजित पवार यांनी मागील आठवड्यात नागवडे यांना प्रचाराला लागा, असे सांगितल्याने नागवडे समर्थकांचा जनसंपर्क दौरा सुरू झाला. १ मार्चला … Read more