अहमदनगर ब्रेकिंग : श्रीपाद छिंदमसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  अहमदनगर मध्ये एका टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान … Read more

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र …

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र मागील पाच वर्षांत शिवसेनेला मित्रपक्षाकडून कटू अनुभव आल्याचे सांगत काही पक्ष निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करत असतात. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवल्याने प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. श्रीरामपुरात … Read more

वाढत्या कोराेना संक्रमणामुळे नागरिक त्रस्त !

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  पारनेर तालुक्यात काेरोना संसर्गाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतानाही तालुक्यातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १३६ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. यातील ५६ करोना बाधित निघोज येथील आहेत.नगर शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत ही रुग्ण संख्या मोठी … Read more

खरीप पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळावी

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- कोपरगाव शहर | चालू वर्षी मान्सून उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरण्यांना वेळ लागला. त्यामुळे त्यांना मुदतीत पीक विमा भरता आला नाही. शासनाने खरीप पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यांनी आपल्या निवेदनात … Read more

पुढील काळात जनतेला उपाशीपोटी रहावे लागण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- पंतप्रधान मोदी सरकारने केंद्रात सत्तेत येण्यासाठी जनतेला वेगवेगळ्या भूलथापा मारल्या. परंतु प्रत्यक्षात हे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र सर्व सामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आला. त्यामुळे मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. श्रीगोंदे काँग्रेसच्या वतीने देखील बुधवारी सकाळी ११ वाजता श्रीगोंदे शहरातील जोतपूर … Read more

टायरचे शोरूम फोडून तीन लाखांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- कोल्हार भागवतीपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून थंडाववलेले चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी येथील सुरेश रामनाथ निबे यांचे एमआरएफ टायर शोरूमचे शटर तोडून सुमारे ३ लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल चोरल्याची घटना घडली. सदर दुकानात सलग तिसऱ्या वेळेस चोरीची घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सदर शोरूमच्या शटर खालील फरशी काढली. … Read more

घरात निघालेल्या ०६ नागाच्या पिल्लांना सर्पमित्राने दिले जीवदान

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- राहुरी शहरातील एका घरात आढळून आलेल्या ६ नागाच्या पिल्लांना सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी निर्सगाच्या सानिध्यात सोडले. शाहूनगर परिसरात डॉ. गायकवाड यांच्या घरी त्यांचा मुलगा घरात किचनच्या बाहेर काही वस्तू घेण्यासाठी गेला असताना त्याला एक छोटा साप आढळून आला तेव्हा त्याने आपल्या वडिलांना ही खबर दिली असता डॉ. गायकवाड यांनी … Read more

पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोरांच्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- शहर पोलिसांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत असून, यापुढेही कारवाईचा सिलसिला चालूच ठेवून दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे, पोलीस … Read more

विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील – ब्रिजलाल सारडा

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  हिंद सेवा मंडळाचे जिल्ह्यातील सर्वच शाळेत विद्यार्थ्यांना सर्व समावेशक असे शिक्षण दिले जाते समाजाच्या शेवटच्या घटकातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशापासून ते त्यांच्या शैक्षणिक गरजा कशी पूर्ण होतील हे आवर्जुन पाहिले जाते. यासाठी संस्था, पदाधिकारी, शिक्षक, शाळा प्रयत्नशील असते. केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वच प्रयत्नशिल … Read more

वेळ पाळा अन्यथा; होऊ शकते ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-अहमदनगर महानगरपालिकेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी शासकीय कामकाजांच्या वेळा पाळने गरजेचे आहे. अनेक  अधिकारी व कर्मचारी कामकाजाचे वेळ पाळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. जर यापुढे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळ पाळली नाही, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. असा इशारा उपमहापौर भोसले यांनी दिला. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अचानकपणे उपमहापौर … Read more

गावठी कट्ट्यासह एकास पकडले

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन परिसरामध्ये असणाऱ्या जैनब मस्जिद जवळ सरफराज बाबा शेख उर्फ सर्फ्या (रा.-वॉर्ड नंबर 2,श्रीरामपूर)याला एक गावठी कट्टा व राऊंडसह पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडे मिळालेल्या कट्टयाची किंमत सुमारे 25 हजार रुपये इतकी असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात … Read more

सर्वात मोठी बातमी : उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल ! तुमचा निकाल तपासण्यासाठी ही माहिती वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:००वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा करोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावच्या महिला म्हणतात आम्हाला पोलिसांची वर्दी द्या …

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  पोलीसांना पोलीसांना जर दारु अड्डे सापडत नसतील तर तुमची वर्दी आम्हाला द्या आम्ही सर्व महिला ३ तासात सर्व दारु आड्डे उध्वस्त करुन दाखवतो. छापा मारण्यापुर्वी पोलीस ठाण्यातुन दारू विकणाऱ्याना फोन येतो, हप्ते घेण्यासाठी पोलीसांना दारु अड्डे सापडतात मग कारवाईसाठी का नाही. प्रसादनगर भागातील दारु अड्डे बंद न झाल्यास … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं योगी सरकारचं कौतुक !

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कोरोना नियंत्रणाबद्दल योगी सरकारचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, कोरोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तरप्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय … Read more

बिग ब्रेकिंग : ह्या भारतीय क्रिकेटपटूला झाली कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- भारतीय क्रिकेट संघाला करोनाचा फटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला करोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घऱी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर ऋषभ पंत पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान पंतशिवाय भारतीय संघ डरहॅममध्ये बायो बबलमध्ये … Read more

नगरसेविका पल्लवी जाधव यांचा कोरोनायोद्धा सन्मानाने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  शहरातील प्रभाग क्रमांक 6 च्या नगरसेविका पल्लवी जाधव यांना आय लव्ह नगर परिवारातर्फे कोरोना योद्धा सन्मानाने गौरवण्यात आले. जाधव यांनी कोरोना काळात सर्व प्रकारे जनतेची सेवा करुन गरजूंना अन्न-धान्य, रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे अर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटाइजरचे वाटप केले. रक्ताचा तुडवडा भासत असताना भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज वाढ केली आहे. मागील दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. अशातच आज चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 31-39 पैसे आणि डिझेल 15-21 पैसे प्रति लिटरपर्यंत महागले आहे. या दरवाढीनंतर आता देशभरातील इंधनांचे दर नव्या उंचीवर पोहोचले आहेत.आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे नवे दर 101.54 … Read more

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यच्या वाटा, आशा आणि आनंदाच्या वेबीनारचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  कोरोनाच्या संकटकाळात शैक्षणिक क्षेत्रात संभ्रमावस्था निर्माण झाली असताना, उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या वतीने दि.17 व 18 जुलै रोजी भविष्यच्या वाटा, आशा आणि आनंदाच्या या दोन दिवसीय मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. … Read more