बिग ब्रेकिंग : ह्या भारतीय क्रिकेटपटूला झाली कोरोनाची लागण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- भारतीय क्रिकेट संघाला करोनाचा फटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला करोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घऱी क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

कोरोनातून बरं झाल्यानंतर ऋषभ पंत पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान पंतशिवाय भारतीय संघ डरहॅममध्ये बायो बबलमध्ये परतला आहे. पंतला घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली असता पॉझिटिव्ह आली.

दरम्यान पंतच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. बुधवारी, मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची कोलकात्यात भेट घेतली.

पण या बैठकीत झालेल्या चर्चेची कोणतीही माहिती त्यांनी बाहेर येऊ दिली नाही. इंग्लंड क्रिकेट संघावर करोनाचं सावट असतानाच भारतीय खेळाडूलाही करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

इंग्लंड संघाची नुकतीच पाकिस्तानविरोधात एकदिवसीय मालिका पार पडली. मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्याआधीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने संघातील सात सदस्यांना करोनाची लागण झाली असून यामध्ये तीन खेळाडू आणि चार कर्मचारी असल्याची माहिती दिली होती.

यामुळे इंग्लंड संघात बदल करण्यात आले आणि बेन स्टोक्सकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती.