पुढील काळात जनतेला उपाशीपोटी रहावे लागण्याची शक्यता…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- पंतप्रधान मोदी सरकारने केंद्रात सत्तेत येण्यासाठी जनतेला वेगवेगळ्या भूलथापा मारल्या. परंतु प्रत्यक्षात हे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र सर्व सामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आला.

त्यामुळे मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.

श्रीगोंदे काँग्रेसच्या वतीने देखील बुधवारी सकाळी ११ वाजता श्रीगोंदे शहरातील जोतपूर मारुती चौकातून सायकल व पायी रॅली काढण्यात आली. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील केले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, खाद्यतेल, डाळी, औषधे, खते, बि-बियाणे यांच्या किंमती प्रचंड वाढल्या असून गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले.

स्वयंपाकाचा गॅस ८५० रुपयास विकत घेणे मुश्किल झाले असून पुढील काळात जनतेला उपाशीपोटी रहावे लागण्याची शक्यता आहे.

जीवनावश्यक वस्तुंचे दर तत्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा, या हेतूने सरकारचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील भोसले, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, शहराध्यक्ष मनोहर पोटे, जिल्हा सरचिटणीस बाळाप्पा पाचपुते,

नागवडे कारखान्याचे व्हॉईस चेअरमन युवराज चीतळकर, माजी व्हॉईस चेअरमन सुभाष काका शिंदे, अप्पासाहेब काकडे, नगरसेवक गणेश भोस, राजेंद्र लोखंडे, सीमा गोरे, निसार बेपारी आदी उपस्थित होते.